Pandharpur Live

Latest Post

Pandharpur LIVE 26 March 2019
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांनी काल सोलापूर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी दोन्ही पक्षातील हजारो तरुणांची रॅली काढून शक्तीप्रदर्शन केले. 
आंबेडकर कोणत्या मतदार संघातून निवडणूक लढणार याचीच चर्चा सुरु होती. अखेर काल आंबेडकरांनी सोलापूर मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेसतर्फे माजी केंद्रीयमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना उमेदवारी मिळाली आहे. सोमवारी सोलापूर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथून रॅलीला सुरुवात करण्यात आली होती. आंबेडकर आणि शिंदे यांनी काढलेल्या रॅलीमध्ये हजारो समर्थक सहभागी झाले होते.
आंबेडकरांनी सोलापुरातून उमेदवारी अर्ज भरून या मतदार संघात शिंदेंपुढे कडवे आव्हान निर्माण केले आहे. तर दुसरीकडे भाजपने जयसिद्धेश्वर स्वामी यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या ठिकाणी होणारी तिरंगी लढत जास्त चुरशीची होणार आहे. मात्र, दोन्ही नेत्यांच्या शक्तीप्रदर्शनाचीच चर्चा काल सुरु होती.


📲 पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन. https://play.google.com/store/apps/details…
➡️ पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165 कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूर Mail- livepandharpur@gmail.com Pandharpur LIVE 26 March 2019


मराठा क्रांती मोर्चाचा कुठल्याही पक्षाला पाठिंबा नसेल, असे स्पष्ट करीत मोर्चासाठी परिश्रम घेणारा कुणी समाजबांधव निवडणुकीत अपक्ष उभा असल्यास त्याच्या मागे उभे राहा, असे आवाहन येथे करण्यात आले. अन्य कोणत्याही मोर्चाचा क्रांती मोर्चाशी संबंध नाही, असेही या वेळी स्पष्ट करण्यात आले.
आगामी निवडणुकीत क्रांती मोर्चाची भूमिका काय असावी, याबाबत चर्चा करून निर्णय घेण्यासाठी रविवारी (ता. २४) येथे बैठक झाली. या वेळी उपस्थितांनी मते मांडली. कुठल्याही पक्षाने समाजाचे प्रश्न सुटावेत, यासाठी प्रयत्न केले नाहीत. मोर्चात समाज म्हणूनच विविध पक्षांच्या पदाधिकारी, नेत्यांनी सहभाग नोंदविला; मात्र प्रश्न सुटले नाहीत. ही लाजिरवाणी बाब आहे, अशी खंत समन्वयकांनी मांडली.
मोर्चाचा कुणीही वैयक्तिक स्वार्थासाठी वापर करू नये, समाजाच्या प्रश्नांची दाहकता सरकारला कळावी म्हणून अनेकांनी बलिदान दिले. बलिदान दिलेल्या बांधवांच्या कुटुंबाला सरकारकडून मदत मिळाली का, असा प्रश्न विचारला, तर त्याचे उत्तर नाही असेच आहे. त्यामुळे कुठल्याही राजकीय पक्षाला, संघटनेला, उमेदवाराला मराठा क्रांती मोर्चाचा पाठिंबा नसेल.📲 पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन. https://play.google.com/store/apps/details…
➡️ पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165 कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूर Mail- livepandharpur@gmail.com पंढरपूर लाईव्हच्या सर्व वाचक व जाहिरातदार बंधु-भगिणींना रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!

Pandharpur LIVE 25 March 2019


 
📲 पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन. https://play.google.com/store/apps/details…
➡️ पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165 कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूर Mail- livepandharpur@gmail.com Pandharpur LIVE 24 March 2019

मयत सचिन शिंदे

पंढरपूर येथील सचिन शिंदे (वय ३१), (रा. घनश्याम सोसायटी, एल.आय.सी. कार्यालयामागे, पंढरपूर) या युवकाच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी काल रात्री एकास अटक केली आहे. सचिन शिंदे यांनी २० मार्च २०१९ रोजी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास आपले राहते घरी ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

यासंदर्भात पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे.  तपास अधिकारी पीएसआय डी.एस. निकम यांनी तपासाची चक्रे अतिशय वेगाने फिरवून सचिन शिंदेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दिपक माणिक चव्हाण (४९) , (रा. घनश्याम सोसायटी, एल.आय.सी. कार्यालयामागे, पंढरपूर) यास काल रात्री ताब्यात घेतले आहे. संशयित आरोपीस आज न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे समजते.📲 पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन. https://play.google.com/store/apps/details…
➡️ पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165 कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूर Mail- livepandharpur@gmail.com Pandharpur LIVE 24 March 2019


कोल्हापूर : देश चालवण्यासाठी ५६ पक्षांची नाही तर ५६ इंचाच्या छातीची गरज असते अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूरात प्रचारशुभारंभ सभेत महाआघाडीवर केली. मुख्यमंत्री म्हणाले, हिंदुत्ववादी पक्षांची युती असल्याचा अभिमान आहे. आघाडीत ५६ पक्ष असल्याचे आठवले यांनी सांगितले. पण हे पक्ष रजिस्टर तरी आहेत का, कोणत्याही रस्त्यावरील संघटनेला उचलले आणि व्यासपीठावर बसविल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
मुख्यमंत्री म्हणाले, शरद पवारांनी कॅप्टनशीप मागे घेतली. नावात राष्ट्रवादी असून कामाचे नाही, मनात राष्ट्रवाद असावा लागतो. त्यांना उमेदवार सापडत नाहीय. या निवडणुकीतही एनडीएची सत्ता येणार. गरिबाची गरीबी कधी हटली नाही, काँग्रेसच्या सग्यासोय-यांची गरीबी हटल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला.
राष्ट्रीय लोकशाही आघाडीने जनधन खाती, शौचालये उभारली. महिलांना विचारा त्यांना किती वाईट वाटत होते, जेव्हा त्यांना बाहेर जावे लागत होते. शेतक-यांच्या खात्यात थेट पैसे गेले. आम्हाला साखर सम्राटांचे भले करायेचे नव्हते. चार वर्षाच्या काळात कोणालाही एफआरपीसाठी आंदोलन करावे लागले नाही. मोदींनी पॅकेज दिले. ३१ रुपयांचा कमीतकमी दर दिला.यावेळी राज ठाकरे यांचे नाव न घेता मुख्यमंत्री म्हणाले, मोदी सुर्यासारखे आहेत. सुर्याकडे पाहून थुंकल्यास आपल्याच चेह-यावर पडते. यामुळे सावध असा. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या टीकेला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, आम्ही इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आहोत तर तुम्ही भ्रष्टाचार मॅनेजमेंट कंपनी आहे. काही लोक राष्ट्रवादाचा कंपू सोडून चोरांच्या कंपूत सामिल झाले आहेत, असे राजू शेट्टी यांचे नाव न घेता फडणवीस यांनी टीका केली.
यावेळी भारतीय जनता पक्षाचे नेते चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले, रासपचे महादेव जानकर, विनायक मेटे यांच्यासह महायुतीतील नेते उपस्थित होते. यावेळी सातारा मतदारसंघासाठी भाजपने नरेंद्र पाटील यांना शिवसेनेत पाठवले आणि उमेदवारी मिळवली.


📲 पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन. https://play.google.com/store/apps/details…
➡️ पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165 कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूर Mail- livepandharpur@gmail.com Pandharpur LIVE 24 March 2019


कराड : भाजप सरकारच्या काळात राज्यात १२ हजार शेतक-यांनी आत्महत्या केल्या. या सरकारने जनतेला धोका दिला आहे. भाजपच्या काळात शेतकरी उध्वस्त झाला असल्याचे म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारवर निशाणा साधला.
भाजपच्या काळात धंदे बुडाले, तरुणांमध्ये बेकारीचे प्रमाण वाढल्याचेही पवार म्हणाले. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी चालू झाली आहे. प्रत्येक पक्षाने आपापल्या जाहीर सभा घेण्यास सुरूवात केली आहे. सातारा लोकसभेचे उमेदवार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ आज कराडमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रसेचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत महाआघाडीची सभा झाली.
यावेळी शेतमालाला दर नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी स्वत:ला कांद्यात गाडून घेत आहे. शेतक-याला मदत करण्याची या सरकारची भूमिका नाही. जवानांनी दाखवलेल्या शौर्याचा लाभ पंतप्रधान नरेंद्र मोदी घेत असल्याचे म्हणत शरद पवारांनी भाजपवर निशाणा साधला. मोदींकडे ५६ इंचाची छाती आहे तर कुलभुषण जाधव यांना पाकिस्तानातून सोडवून आणण्यासाठी ती छाती का पुढे येत नाही. या सरकारने मराठा समाजाला, धनगर समाजाला, दलितांना फसवले असल्याचेही पवार म्हणाले. फसवेगिरी हेच राज्य सरकारचे वैशिष्ट्य असल्याचेही पवार म्हणाले.

शेतक-यांची बीकट अवस्था
या सभेत अच्छे दिन आले नाहीत. स्वप्न दाखवली पण ती भाजपने पूर्ण केली नाहीत. शेतकरी अवमान योजना आणली. कुणाचेही भले झाले नाही.शेतक-यांची बीकट अवस्था भाजपने केल्याचे राजू शेट्टी म्हणाले.
भाजपने वाटेल ती आश्वासने दिली – उदयनराजे भोसले
भाजपने वाटेल ती आश्वासने दिली. त्याला जनता बळी पडली. तळागाळातल्या लोकांना गाळात घालण्याचे काम सरकारने केले असल्याचे सातारा लोकसभेचे उमेदवार उदयनराजे भोसले म्हणाले. काँग्रेस व राष्ट्रवादीत स्थानिक संदर्भानुसार मतभेद जरुर आहेत. चुकाही झाल्या आहेत. पण आता समज-गैरसमज विसरुन शेतकरी, कामगार व गरिबांना उद्ध्वस्त करणारे भाजप आघाडीचे सरकार दिल्लीतून घालवायचे आहे. यासाठी शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांना मानणा-या कॉंग्रेस-राष्ट्रवादी मित्रपक्षांच्या उमेदवारांना निवडून आणूया, असा निर्धार रविवारी कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या संयुक्त बैठकीत सर्व नेत्यांकडून करण्यात आला.
भाजप सरकारने पाच वर्षात फक्त थापा मारल्या- जयंत पाटील
देशाची राज्यघटना न मानणा-या भाजप सरकारने पाच वर्षात फक्त थापा मारल्या आहेत. शेतक-यांच्या खात्यावर दोन हजार रुपये जमा करुन त्यांची चेष्टा केली आहे. पुन्हा भाजप सरकार सत्तेवर आले तर चातुर्वण्य व्यवस्थेकडे देशाची वाटचाल होणार असल्याचा इशारा यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिला. संयुक्त बैठकीस कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पी. एन. पाटील, जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे, आमदार हसन मुश्रीफ, विद्यमान खासदार धनंजय महाडिक, महापौर सरिता मोरे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, आमदार संध्यादेवी कुपेकर आदी मान्यवर उपस्थित होते.


📲 पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन. https://play.google.com/store/apps/details…
➡️ पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165 कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूर Mail- livepandharpur@gmail.com Pandharpur LIVE 24 March 2019बेळगाव: श्री.ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज पाटील  बेळगावकर, यांना हृदयविकाराचा झटका आला होता. आत्ता त्यांना पुढील उपचारासाठी दिल्ली येथील गंगाराम हॉस्पीटल मध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच वर उपचार सुरू आहेत. सध्या त्यांचे प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती त्यांच्यावर उपचार करणार्‍या डॉक्टरांनी दिली.
📲 पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन. https://play.google.com/store/apps/details…
➡️ पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165 कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूर Mail- livepandharpur@gmail.com Pandharpur LIVE 24 March 2019

 माजी केंद्रीय मंत्री, सोलापूर लोकसभेसाठीचे काँग्रेस आय चे उमेदवार सुशिलकुमार शिंदे यांनी आज पंढरीतून निवडणुकीचे रणशिंग फुंकले असून पंढरीतील ह.भ.प.तनपुरे महाराज मठामध्ये आयोजित केलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्यांनी काँग्रेस व मित्रपक्ष राष्ट्रवादी व इतर घटकपक्षांच्या कार्यकर्त्यांशी सुसंवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपाच्या राज्यकारभारावर कडाडून टीका केली.  शरद पवार यांच्यासारख्या नेत्यांना माढ्यातून कांही अडचणी निर्माण केल्या असतील व त्यांना कांही तरी खटकले असेल म्हणून त्यांनी माढ्यातून माघार घेतली असेल. त्यांच्या माढ्यातील माघारीमुळे काहीही फरक पडणार नाही.  ‘ही इज द नॅच्युरल लिडर ऑफ द कंट्री’ असे मत माजी सुशीलकुमार शिंदे यांनी पंढरीत पत्रकारांशी सुसंवाद साधताना व्यक्त केलंय.


या मेळाव्यास पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेचे आमदार भारत भालके, विधान परिषदेचे आमदार रामहरी रुपनवर, सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांच्यासह सोलापूर महानगरपालिकेचे नगरसेवक चेतन नरोटे, अमोल बंगाळे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील, जिल्हाध्यक्ष प्रकाश शामराव पाटील, राष्ट्रवादीचे श्रीकांत शिंदे, माजी जिप अध्यक्षा जयमाला गायकवाड, राजूबापू पाटील, युवराज पाटील, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन नागणे, साधनाताई उगले, अशोक डोळ, सुहास भाळवणकर, अ‍ॅड.राजेश भादुले, अमर सुर्यवंशी, साधना राऊत, जोगेंद्र कवाडेगटाचे तालुकाध्यक्ष महेंद्र जाधव आदींसह काँग्रेस-राष्ट्रवादी व मित्रपक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मेळाव्यानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये श्री.शिंदे यांनी पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्‍नांना उत्तरे देताना भाजपावर निशाना साधला.

 पत्रकार परिषदेवर दृष्टीक्षेप:-
वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. आंबेडकर यांच्याशी युती न झाल्याचे कारण सांगताना ते म्हणाले की, केवळ 24 सीट असताना त्यांना 22 सीट हव्यात असा हट्ट त्यांनी धरला होता, मग आम्ही काय दोन जागेवरच समाधान मानावं का? 

वंचित बहुजन आघाडी व भाजपाने निर्माण केलेल्या आव्हाहनाबाबत बोलताना ते म्हणाले की, लढाईत उतरलोय आणि लढाई करत असताना आव्हाहनं झेलायची असतात आणि त्या आव्हाहनांना खतम करायचं असत. 

वंचित बहुजन आघाडीसंदर्भात पुढे बोलताना ते म्हणाले की,  माझी स्पष्ट भुमिका आहे की, धर्माच्या नावावर  ते लढाई लढत आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी जी सेक्युलर घटना लिहीली त्या घटनेचा खुन होतोय. डॉ.बाबासाहेबांच्या त्यागातून जी घटना घडली, जी घटना लिहिण्याकरता 3 वर्ष लागली, ज्या घटनेच्या माध्यमातून आज आपला देश चांगल्या पध्दतीने जातोय त्याला बाधा आणण्याचं काम होतंय. एमआयएम आणि वंचीत बहुजन आघाडीची जिथं युती झाली याचाच अर्थ घटनेला बाधा आणण्याचं काम त्यांच्याकडून होतंय. 
मोदींनी मिडीया विकत घेतलाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 

फायदा आणि तोटा निवडणुकीमध्ये आम्ही बघत नाही, जनता हुशार झाली आहे. तरुण पिढीमध्ये भावी नेतृत्व आहे, त्यांनी वरवरच्या वक्तव्याला भुलू नये, तरुणांच्या हातामध्ये संपुर्ण देश जायचा आहे. तरुण वर्गाला त्यांनी विनंती केली की, आपण व्यक्त होताना देशाला स्वातंत्र्य कुणी मिळवून दिलं, देशाची डेव्हलपमेंट कुणी केली याचा विचार करावा, कारण तरुण मंडळी गेल्या 25 वर्षाचाच विचार करतात, 25 वर्षापुर्वी काय घडलं हे त्यांना माहिती नाहीय. त्यामुळे तरुणांनी सर्व डिटेल्स माहिती घ्यावी अशी विनंती त्यांनी तरुण पिढीला केली. 

''एकदा एखादी कमिटमेंट केल्यानंतर ती पुर्ण केली पाहिजे या मताचा मी आहे. सर्व धर्मांना समान मानुन सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा काँग्रेस हा पक्ष आहे. आणि आमचा विजय निश्‍चित आहे. असा विश्‍वास त्यांनी या पत्रकार परिषदेत व्यक्त केला.''

📲 पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन. https://play.google.com/store/apps/details…
➡️ पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165 कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूर Mail- livepandharpur@gmail.com Pandharpur LIVE 24 March 2019


परळी वैजनाथ (प्रतिनिधी)  ः-     रासायनिक खतांच्या मार्‍यातुन शरिराला घात ठरत असलेल्या धान्यानपासुन सुटका होण्याच्या दृष्टीने नैसर्गीक शेती हा प्रर्याय यशस्वी होतांना दिसत आहे. अशा प्रकारचा यशस्वी प्रयोग नंदनज येथील विश्वांभर गुट्टे या शेतकर्‍याने करुन दाखविला आहे. अगदी झिरो बजेट शेतीतुन ऊस पिक घेत या पिकातुन अंतरपिकाचेही दुहेरी उत्पन्न काढत दुष्काळी परिस्थतीत इतर शेतकर्‍यांना आदर्श घालून दिला आहे. एवढेच नाहीतर या नैसर्गीक शेतीतुन विषमुक्त गुळ व पाक (काकवी) ग्राहकांच्या मोठ्या पसंतीला उतरल्याचे दिसुन येत आहे. 

    
परळी तालुक्यातील नंदनज येथील शेतकरी विश्वांभर गुट्टे यांनी आपल्या शेतात 5 एकर ऊसाची लागवड केली. त्याचे वडील विठ्ठलराव गुट्टे भाऊ हनुमंत गुट्टे हे सर्व कुटुंबिय अतिश निष्टने शेती करतात. हा ऊस कोणत्याही कारखान्याला देण्याऐवजी त्यांनी पारंपरिक पध्दतीने स्वतःच या ऊसाचे गुळनिर्मिती करण्यासाठी आपल्या शेतातच गुर्‍हाळ सुरु केले आहे. या माध्यातुन शंभर टक्के नैसर्गिक पध्दतीने घेण्यात आलेल्या पिकांपासुन विषमुक्त गुळ व काकवी निर्माण केली जात आहे. या गुळाला प्रचंड मागणी असुन या शेतकर्‍यांने बाजारपेठेत व्यापार्‍यांना गुळविक्री करण्याऐवजी शेतकरी ते थेट ग्राहक ही संकल्पनाही यशस्वी करुन दाखविली आहे. गेल्या 16 वर्षापासुन परळी परिसरात ऊसाचे गुर्‍हाळ लावणारे शेतकरी म्हणुन ते प्रसिध्द आहेत. 

📲 पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन. https://play.google.com/store/apps/details…

➡️ पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165 कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूर Mail- livepandharpur@gmail.com MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget