लक्ष्मी दहिवडीत महात्मा फुले यांना अभिवादन

पंढरपूर LIVE 30 नोव्हेंबर 2018


महात्मा फुले युवा मंच कडून पत्रकार प्रमोद बनसोडे, दिलीप पाटील,
 रविकिरण बनसोडे. महादेव बनसोडे व महेश माने सन्मानित
मंगळवेढा (प्रतिनिधी) क्रांती सुर्य महात्मा फुले यांच्या १२८ वा स्मृतिदिनाचे औचित्य साधून लक्ष्मी दहिवडी (ता.मंगळवेढा) येथे महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे ट्रस्टी डॉ. प्रभाकर माळीसोलापूर जिल्हा अध्यक्ष तुकाराम कुदळे,उपाध्यक्ष व मळी समाजभूषण सोमनाथ राऊतअॅड. भारत बनकरनगरसेवक गजानन बनकरप्रा. निलकंठ लिंगे,राष्ट्रवादीचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस  शिवानंद पाटीलसंतोष बनसोडेमहात्मा फुले युवा मंच चे संस्थापक अध्यक्ष अनिल बनसोडेआदी मान्यवरांच्या उपस्थितीत महात्मा फुले यांना अभिवादन करण्यात आले.
                   

शैक्षणिक क्षेत्रात होत असलेले वारंवार बदल यामुळे पालक व विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम अवस्था आहे. सर्व-सामान्य जनतेवर होत असलेला अन्याय यावर आज विचार करण्याची नितांत गरज आहे. शिक्षण हे वाघिनीचे दुध आहे तो जो कोणी पिल तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही. आज ही आपल्या देशातील ग्रामीण भागात अनेक मुल शिक्षणापासुन वंचित आहेत. केवळ कागदोपत्री आकडेवारी ने आपला देश सुशिक्षित असुन चालणार नाही तर त्यासाठी महात्मा फुले यांचे विचार सर्व सामान्य जनतेच्या घरा-घरात पोहचविले तर महात्मा फुले यांचे विचार सर्व-सामान्य जनतेला न्याय मिळवून देतील  असे मत महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रा. निलकंठ लिंगे यांनी लक्ष्मी दहिवडी येथील महात्मा फुले यांच्या स्मृतिदिनाच्या दिवशी व्यक्त केले.
    
    

या कार्यक्रमाच्या दरम्यान महात्मा फुले युवा मंचाच्या वतीने पञकार प्रमोद बनसोडे यांना समता गौरव पुरस्कार जाहीर झाल्याबद्दलदिलीप पाटील यांना जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कारजिल्हा सञ न्यायालयात लिपिक पदी निवड झाल्याबद्दल रवीकुमार बनसोडे, शिपाई पदी महादेव बनसोडे निवड झाल्याबद्दल तसेच लक्ष्मी दहिवडीच्या कोतवाल पदी विकास माने या सर्वांचा उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते शालश्रीफळहारफेटा व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
     


हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नवनाथ बनसोडेअवधुत घोडकेअविनाश बनसोडेसयाजी बनसोडेमाजी ग्रामपंचायत सदस्य संतोष बनसोडेविठ्ठल टाकळेनितीन टाकळेउद्योजक दत्ताञय बनसोडे आदीसह महात्मा फुले युवा मंचाच्या कार्यकर्त्यांना परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सुञसंचलन प्रा. बाळासाहेब बनसोडे यांनी केले तर उपस्थिती मान्यवरांचे आभार संस्थापक अध्यक्ष अनिल बनसोडे यांनी मानले.महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget