रक्तदान ही लोकचळवळ होण्यासाठी कामटे संघटनेचे कार्य कौतुकास्पद-प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड

पंढरपूर LIVE 28 नोव्हेंबर 2018

131 रक्तदात्यांनी रक्तदान करुन श्रध्दांजली अर्पण केली
सांगोला/प्रतिनिधी :
    रक्तदान म्हणजे राष्ट्रीय कर्तव्याची परिपूर्ती असून शहीद अशोक कामटे सामाजिक संघटनेमार्फत दहा वर्षापासून 26/11 दिनी दरवर्षी रक्तदान शिबिर आयोजित करुन रक्तदानही लोकचळवळ होण्यासाठी सांगोल्यातील कामटे संघटनेचे कार्य कौतुकास्पद असून संघटनेचा रक्तदान हा उपक्रम सोलापूर जिल्ह्यात आदर्शवत उपक्रम असल्याचे प्रतिपादन मंगळवेढा विभागाचे प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड यांनी केले.
    प्रारंभी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते या भव्य रक्तदान शिबिराचे पूजन मान्यवरांच्या उपस्थितीत करुन शहीदांना आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी उपस्थितांकडून भारत माता की जय, शहीद जवान अमर रहे या घोषणा देवून शहीद अशोक कामटे, विजय साळसकर, हेमंत करकरे, तुकाराम ओंबाळे, संदीप उन्नीकृष्णन, राहूल शिंदे यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.
    

यावेळी तहसिलदार संजय पाटील, नगराध्यक्षा राणीताई माने, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुभाष लऊळकर, नगरसेवक गजानन बनकर, सूत गिरणीच्या संचालिका श्रीमती कौशल्यादेवी शिंदे, आशाताई सलगर, राजलक्ष्मी शिंदे, दादासाहेब खडतरे, ऍड.विजयसिंह चव्हाण, डॉ.महादेव जगताप, डॉ.प्रभाकर माळी, यांच्यासह अनेक प्रतिष्ठित नागरिक यावेळी उपस्थित होते. 
    सदर रक्तदान शिबिरास माढा लोकसभा मतदार संघाचे खा.विजयसिंह मोहिते-पाटील यांनी शहीदांना श्रध्दांजली अर्पण केली व संघटनेचे कार्य सर्वांसाठी आदर्शवत असून राबवीत असलेल्या उपक्रमांचे कौतुक केले.
    
    

यावेळी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुभाष लऊळकर म्हणाले, मानवाने विविध क्षेत्रात संशोधन करुन प्रगती केली असली तरी आतापर्यंत कृत्रीम रक्ताचा थेंबही तयार करता आलेला नाही. आपतकालीन, अपघातग्रस्त, कॅंन्सरग्रस्तांना लागणारा रक्तपुरवठा वेळेवर होण्यासाठी अशोक कामटे संघटना रक्तदान ही लोकचळवळ करण्याचे सातत्याने जिल्ह्यात प्रयत्नशील व कार्यरत असल्याचे सुभाष लऊळकर यांनी गौरवोद्‌गार काढले. भारतीय संविधान दिना बरोबरच 26/11 हा दिवस शहीद दिन साजरा करणे हे कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगोला पोलीस स्टेशनचे उपनिरिक्षक विलास भुजबळ यांनी सांगितले. 
    


गेल्या दोन वर्षापूर्वी बामणीचे थोर सुपुत्र बाबासाहेब मल्हारी वाघमोडे हे देशसेवेत शहीद झाले होते. त्यांच्या सन्मानार्थ वीरपत्नी शितल बाबासाो वाघमोडे व वीरपिता मल्हारी वाघमोडे, आई फुलाबाई वाघमोडे यांना संघटनेच्या वतीने तहसिलदार संजय पाटील यांनी शहीद दिनी सन्मानित केले. यावेळी या वीरपित्याला अश्रु अनावर झाले. 
    कार्यक्रम यशस्वीतेसाठी अध्यक्ष संदीप बनकर, चारुदत्त खडतरे, तौसिफ शेख, संतोष महिमकर, चैतन्य राऊत, ओंकार देशपांडे, प्रकाश खडतरे, शहाजी पाटील, विठ्ठलपंत शिंदे, सुरज माळी, ओंकार सपाटे, यांनी परिश्रम घेतले. एकूण 131 रक्तदात्यांनी रक्तदान करुन शहीदांना श्रध्दांजली अर्पित केली. रक्त संकलनासाठी रेवनील ब्लड बॅंक सांगोला यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन निलकंठ शिंदे-सरकार व आभार अच्युतराव फुले यांनी मानले.

महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget