नारायण चिंचोली च्या ग्रामसेवकास निलंबीत करण्याच्या मागणीसाठी 'जनहित' चे धरणे आंदोलन

पंढरपूर LIVE 28 नोव्हेंबर 2018नारायण चिंचोली ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक खवळे यांनी ग्रामसभेचा कायदा व नियम पायदळी तुडवून ग्रामसभेला बदनाम करणेचा प्रयत्न केला आहे. असा आरोप करुन संबंधित ग्रामसेवकांना त्वरीत निलंबीत करावे व इतर कांही मागण्यांसंदर्भात महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेच्या वतीने पंढरपूर पंचायत समितीसमोर धरणे आंदोलन सुरु केले आहे.

दि. 17 डिसेंबर 2018 रोजी नारायण चिंचोली (ता.पंढरपूर) ग्रामपंचायतीची ग्रामसभा होती. या ग्रामसभेत सामाजिक कार्यकर्ते महेश गुंड यांनी ग्रामसभेतील मंजुर ठराव ग्रामस्थांना वाचुन दाखवावे. अशी विचारणा केली. परंतु ग्रामसेवक खवळे यांनी याचे कोणतेच उत्तर दिले नाही.  याउलट गावातील पुढारी लक्ष्मण गोरख धनवडे यांनी महेश गुंड यांना कोणतीही माहिती देऊ नये असे सांगत गुंड याच्यावर शासकीय कामात अडथळा आणला म्हणुन गुन्हा दाखल करा असे ग्रामसेवकांना सुचवले. त्यानुसार महेश गुंड यांच्यावर पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला. असा आरोप जनहित शेतकरी संघटनेकडून करण्यात आला आहे. तसेच धनवडे यांनी महेश गुंड यांना शिवीगाळ देऊन जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचा आरोपही जनहितने निवेदनाद्वारे केला आहे. 

तसेच माजी सरपंच लक्ष्मण धनवडे व त्यांचे बंधु ग्रामपंचायत सदस्य बळवंत धनवडे व महावीर जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करावा व ग्रामसेवकांना निलंबीत करावे या मागणीसाठी मंगळवार दि. 28 नोव्हेंबर पासून पंढरपूर पंचायत समितीसमोर जनहितच्या वतीने धरणे आंदोलन सुरु आहे.      

महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget