हिवाळी अधिवेशन... महत्वाच्या शासकीय बातम्या... गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

पंढरपूर LIVE 28 नोव्हेंबर 2018


वृ.वि. 3756                                                                             6 मार्गशीष 1940 (दु.12.50 वा.)                                                                                                दि. 27 नोव्हेंबर2018
गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ
गोवर रुबेला मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी नागरिकांनी सक्रिय सहभागी व्हावे
मुख्यमंत्री
            मुंबईदि. 27 : गोवर-रुबेला सारख्या घातक आजारांपासून महाराष्ट्राला मुक्त करण्यासाठी सामान्य नागरिकांनी लसीकरणामध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा आणि मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
            विधानभवनाच्या प्रांगणात झालेल्या कार्यक्रमात गोवर-रुबेला प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी विधानपरिषद सभापती राजराजे नाईक-निंबाळकरविधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडेशालेय शिक्षण मंत्री विनोद तावडेमुंबईचे पालक मंत्री तथा उद्योग मंत्री सुभाष देसाई,आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंतआदीवासी विकास मंत्री विष्णू सवरासार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरण मंत्री रामदास कदम आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी लसीकरण करण्यात आलेल्या 14 बालकांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.
            मुख्यमंत्री यावेळी म्हणालेगोवर आणि रुबेला आजारामुळे देशात दरवर्षी हजारो बालके मुत्यूमुखी पडतात. आपल्या बालकांमधील प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी लसीकरण आवश्यक असून युवा पिढी सुदृढ व्हावी यासाठी पालकांनी लसीकरण मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवून आपल्या मुलांना लस द्यावी. ही मोहीम सार्वजनिक आरोग्य विभागनगरविकास विभागमहिला व बालकल्याण विभागआदिवासी विकास विभागवैद्यकीय शिक्षण विभाग आदी विभागांच्या समन्वयातून सुरु करण्यात आली आहे. प्रत्येक विभागाने आपले योगदान देऊन मोहीम यशस्वी करावी असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. या मोहिमेचे यशस्वी नियोजन केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी आरोग्य मंत्री तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी यांचे अभिनंदन करीत लसीकरण केलेल्या बालकांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्रात झिरो मिझेल्स व झिरो रुबेला करण्यासाठी
या मोहिमेत सहभागी व्हा - आरोग्यमंत्री
            आरोग्य मंत्री यावेळी म्हणालेकेंद्र शासनाच्या साहाय्याने गोवर रुबेला लसीकरण हा महत्वाकांक्षी प्रकल्प आपण शहरी व ग्रामीण भागात सुरू केला आहे. 9 महीने ते 15 वर्षाखालील सुमारे 3 कोटी 38 लक्ष बालकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ही लस सुरक्षित आहे. तसेच यापूर्वी ही लस घेतली असल्यास देखील या मोहिमेत लस टोचून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे कोणतेही दुष्परिणाम होणार नाहीत. सध्या ही मोहीम 20राज्यांमध्ये राबविली जात असून प्रथम सत्रात शालेय स्तरावर लसीकरण करण्यात येणार आहे. शिक्षकांनी व पालकांनी कर्तव्यदक्ष आणि जागरूक होऊन आपल्या बालकांचे  लसीकरण झाले असल्याची खात्री करावी असे आरोग्यमंत्री या वेळी म्हणाले.
            राज्यात सर्वत्र सरकारीखासगी शाळांमध्येअंगणवाडीसरकारी दवाखानेआरोग्य उपकेंद्रे यांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. गोवर चे उच्चाटन व रुबेला वर नियंत्रण असे २०२० पर्यंतचे लक्ष्य समोर ठेऊन ही राज्यव्यापी मोहीम सुरु करण्यात आली आहे.
अशी आहे लसीकरण मोहीम
·       आजपासून सहा आठवडे राज्यात सर्वत्र लसीकरण मोहीम
·       9 महिने ते 15 वर्ष वयोगटातील बालकाचे लसीकरण करणे आवश्यक
·       शाळासरकारी दवाखानेप्राथमिक आरोग्य केंद्रे यांवर मोफत लसीकरण उपलब्ध
·       या आधी गोवर/ एम आर / एमएमआर लस दिली असल्यास पुन्हा या मोहिमेत लसीकरण करणे आवश्यक.
·       पुन्हा लसीकरणाने कोणतेही दुष्परिणाम होणार नाही.
·       एक गोवर-रुबेला लस करतेदोन आजारांवर मात
000


विधान परिषद इतर कामकाज : लक्षवेधी  
अधिष्ठाता यांच्या औषध खरेदीच्या अधिकारात वाढ
– वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन
मुंबईदि. 27 : स्थानिक स्तरावर तातडीच्या प्रसंगी औषधे उपलब्ध व्हावी व रुग्णसेवेत खंड पडून नयेत यासाठी अधिष्ठाता (डीन) यांना स्थानिक औषध खरेदीचे अधिकार आहेत. ही मर्यादा आता पाच हजार रुपयांवरून एक लाख रुपये प्रतिदिन इतकी वाढविण्यात आली आहे. तसेच मंजूर वार्षिक अनुदानाच्या 10 टक्के स्थानिक खरेदीची मर्यादा  20 टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आली असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी विधान परिषदेत सांगितले.
विधान परिषद सदस्य प्रकाश गजभिये यांनी राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये औषधांचा तुटवडा असल्याची लक्षवेधी सूचना विधानपरिषदेत मांडली होती. यावर उत्तर देताना श्री. महाजन बोलत होते.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या 26 जुलै 2017 च्या आदेशानुसार राज्यातील विविध रुग्णालयात लागणारी औषधे व शल्योपचार साहित्यांची खरेदी हाफकीन जीव औषध निर्माण महामंडळाच्या खरेदी कक्षाकडून खरेदी करण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. 2018-19 या वर्षामध्ये औषधे व शल्योपचार सामुग्रीसाठी 339 कोटी 50 लाख रुपये इतका निधी अर्थसंकल्प‍ित करण्यात आला आहे. यापैकी औषधांची प्रलंबित देयके अदा करण्यासाठी सुमारे 116 कोटी 58 लाख इतका निधी हाफकीन महामंडळामार्फत औषध खरेदी करण्यासाठी वितरित करण्यात आला आहे. तसेच उर्वरित निधी वितरित करण्याबाबताचा प्रस्ताव वित्त विभागास सादर करण्यात आला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालये यांचा औषध पुरवठा सुरळीत राहून रुग्णसेवेत खंड पडू नये यासाठी उपाययोजना करण्यात येत असून यासाठी पुरेशी वित्तीय तरतूद करण्यात आली असल्याचे श्री. महाजन म्हणाले.
      राज्यात अधिष्ठाता (डीन) यांची रिक्त असलेली पदे भरण्याची कार्यवाही सुरू आहे. लवकरच प्रक्रिया पूर्ण करून रिक्त पदे भरण्यात येतीलअसे श्री. महाजन एका उपप्रश्नाला उत्तर देताना पुढे म्हणाले.
यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री सतेज पाटीलकिरण पावसकरअशोक उर्फ भाई जगतापभाई गिरकरसुरेश धस यांनी भाग घेतला.
0000
विभागीय स्तरावर चौकशी करून कारवाई
– शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे
मुंबईदि. 27 : दहिसर मुंबई उपनगरातील रुस्तमजी टुपर्स स्कूल या शाळेची नियमबाह्य शुल्क आकारणी प्रकरणी महानगरपालिका स्तरावर चैाकशी करण्यात आली आहे. या शाळेची आता विभागीय स्तरावर चैाकशी करून चौकशीअंती योग्य ती कारवाई करण्यात येईलअसे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधानपरिषदेत सांगितले.
विधानपरिषद सदस्य विलास पोतनीस यांनी रुस्तमजी ट्रुपर्स स्कूल या शाळेची नियमबाह्य शुल्क आकारणीविषयीची लक्षवेधी विधानपरिषदेत उपस्थित केली होती. यावर उत्तर देताना श्री. तावडे बोलत होते.
रुस्तमजी टुपर्स स्कूल ही मनपा मान्याताप्राप्त इंग्रजी माध्यमाची विना अनुदानित शाळा आहे. चालू शैक्षणिक वर्षात या शाळेने केलेल्या शुल्कवाढीसंदर्भात काही विद्यार्थ्यांच्या पालकांनी महानगरपालिकेकडे तक्रारी दाखल केल्या होत्या या तक्रारीच्या अनुषंगाने मनपा शिक्षण विभागाच्या संबंधित अधीक्षक (शाळा) व विभाग निरीक्षक (शाळा) यांनी शाळेला भेट देऊन पडताळणी केली आहे. आता या शाळेची विभागीय स्तरावर चैाकशी करून  चौकशीअंती योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे श्री. तावडे यांनी सांगितले.
000
वृ.वि. 3759                                                                             6 मार्गशीष 1940 (दु. 2.35 वा.)                                                                                                दि. 27 नोव्हेंबर2018
विधानपरिषद अल्पकालीन चर्चा 
सेवाज्येष्ठतेबाबत न्यायालयाच्या निर्देशानुसार कार्यवाही
– शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे
मुंबईदि. 27 : राज्यातील मान्यताप्राप्त खाजगीमाध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील कार्यरत शिक्षकांच्या सेवाज्येष्ठतेबाबत न्यायालयाच्या निर्देशानुसार कार्यवाही करण्यात येईल. यासाठी विधी विभागाचे तसेच विधान परिषदेतील शिक्षक सदस्यांची मते जाणून घेण्यात येतीलअसे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी विधानपरिषदेत सांगितले.
विधानपरिषद नियम 92 अन्वये सदस्य नागोराव गाणार यांनी  राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी,माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील कार्यरत शिक्षकांच्या सेवाज्येष्ठतेबाबत उपस्थित केलेल्या चर्चेला उत्तर देताना श्री. तावडे बोलत होते. राज्यातील मान्यताप्राप्त खासगीमाध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील कार्यरत शिक्षकांच्या सेवाज्येष्ठतेविषयीच्या अनेक याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. त्यामुळे न्यायालयाच्या निर्देशानुसार सेवाज्येष्ठतेबाबत निर्णय घेण्यात येईलअसे श्री. तावडे यावेळी म्हणाले.
यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य विक्रम काळे यांनी भाग घेतला.
0000
केंद्रीय आश्रमशाळांना अनुदान देण्याविषयी शासन सकारात्मक
– दिलीप कांबळे
मुंबई, दि. 27 : राज्यातील केंद्रीय आश्रमशाळांना अनुदान देण्याविषयी शासन सकारात्मक आहे. अनुदान देण्यासंदर्भातील प्रश्न हा डिसेंबरअखेरपर्यंत निकाली निघेलअसे सामाजिक न्याय व विशेष सहाय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी विधानपरिषदेत अल्पकालीन चर्चेला उत्तर देताना सांगितले.
विधानपरिषद नियम 92 अन्वये सदस्य सतीश चव्हाण यांनी राज्यातील अनुदानास पात्र शाळांना अनुदान देण्याविषयीची चर्चा उपस्थित केली होती. यास उत्तर देताना श्री. कांबळे बोलत होते.  गोरगरीबमागास विद्यार्थ्यासाठी केंद्रीय आश्रमशाळा कार्यरत आहेत. त्यामुळे या आश्रमशाळांच्या अनुदान देण्याविषयी शासन सकारात्मक असल्याचे श्री. कांबळे यांनी यावेळी सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री नागो गाणारभाई गिरकरविक्रम काळे यांनी भाग घेतला.
००००


वृ.वि. 3760                                                                              6 मार्गशीष 1940 (दु. 3.05 वा.)                                                                                                दि. 27 नोव्हेंबर2018
'जय महाराष्ट्र'कार्यक्रमात खासदार अमर साबळे यांची मुलाखत
'संविधान सप्ताह विशेष कार्यक्रम'
    मुंबईदि. 27 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'जय महाराष्ट्रकार्यक्रमात खासदार अमर साबळे यांची यांचा भारताचे संविधानया विषयावर  विशेष कार्यक्रम दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून  बुधवार दि.२८ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ७.३० ते ८.०० या वेळेत प्रसारित होणार आहे. या कार्यक्रमाचे निवेदन नरेंद्र बेडेकर यांनी केले आहे.
राज्य शासनातर्फे राज्यात २६ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०१८ या कालावधीत संविधान सप्ताह साजरा केला जात आहे. जगातील सर्वश्रेष्ठ संविधान म्हणून भारताची असलेली ओळखसंविधान सप्ताहाचे महत्व,घटनेने दिलेल्या अधिकारांबद्दल प्रत्येकाने कशा प्रकारे जागरूक राहून संवेदनशील असले पाहिजे,राज्यघटनेतील तत्वांची सर्वांना माहिती होण्यासाठी कशा प्रकारे प्रयत्न व्हायला पाहिजेत याबाबत सविस्तर माहिती खासदार अमर साबळे यांनी 'जय महाराष्ट्रकार्यक्रमातून दिली आहे.
*****
वृ.वि. 3757                                                                             6 मार्गशीष 1940 (दु.12.50 वा.)                                                                                                दि. 27 नोव्हेंबर2018
भारतरत्न पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार
बासरी वादक पं. केशव गिंडे यांना घोषित
मुंबई दि. २७ : राज्य शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या भारतरत्न पं.भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार २०१८ साठी ज्येष्ठ बासरी वादक पं. केशव गिंडे यांच्या नावाची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी आज मुंबई येथे केली.
प्रतिवर्षी राज्य शासनातर्फे शास्त्रीय गायन व वादन या क्षेत्रात प्रदीर्घ काळ उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कलाकारास भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या नावे शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. या पुरस्काराचे स्वरुप रु. ५ लाख रोखमानपत्रसन्मानचिन्ह असे आहे.  सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली उस्मान खानसदानंद नायमपल्लीशाम गुंडावारश्रीमती भारती वैशंपायनबाळ पुरोहित आणि श्रीमती शुभदा पराडकर यांच्या समितीने या पुरस्कारासाठी ज्येष्ठ बासरी वादक पं. केशव गिंडे यांची शिफारस केली होती.  यापूर्वी हे पुरस्कार गानसरस्वती किशोरी आमोणकरपं.जसराजश्रीमती प्रभा अत्रेपं.राम नारायण,श्रीमती परवीन सुलताना आणि श्रीमती माणिक भिडे यांना प्रदान करण्यात आलेला आहे.
पं.केशव गिंडे यांचा जन्म ५ सप्टेंबर१९४२ साली पुणे येथे झाला.  संगीतामध्ये त्यांनी पी.एच.डी केलेली आहे. त्यांना बासरी वादनामध्ये अधिक रस होता. बासरी वादनाचे शिक्षण त्यांनी गुरु स्व. पं. देवेंद्र मुर्डेश्वरपं. हरिपद चौधरी यांच्याकडे घेतले. पं. केशव गिंडे यांनी देशात आणि परदेशात आयोजित होणाऱ्या संगीत मैफिलीत तसेच आकाशवाणी आणि दूरदर्शन वर अनेक राष्ट्रीय संगीत सभेत सहभाग घेतला. तसेच परदेशातील विद्यापीठात मास्टर डिग्रीच्या मुलांना शास्त्रीय संगीताचे प्रात्याक्षिकासह व्याख्याने  दिलेली आहेत.
पं.केशव गिंडे यांनी वेदकाळापासून चालत आलेल्या बासरीमध्ये अभूतपूर्व परिवर्तन केलेले आहे. आणि त्यांनी आपल्या दादागुरु पं.पन्नालाल घोष यांच्या पाऊलखुणांवर चालत "केशव वेणू" या बासरीची निर्मिती १९८४ सालीकेली आहे. या बासरीची नोंद "लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्" तसेच "गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्" मध्ये घेण्यात आली आहे. ही बासरी "सात सप्तकात" वाजवण्याचा "गोल्डन बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड" त्यांच्या नावावर आहे. रसिक जनसंगीत तज्ञसमीक्षक तसेच बासरी वादकांनी या नव्या संशोधनाचा गौरव केला आहे आणि येणाऱ्या बासरी वादकांसाठी ही बासरी आदर्श राहील असे वर्णन केले आहे.
पं.केशव गिंडे यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे.  पं.केशव गिंडे हे अमुल्य ज्योती पब्लिक ट्रस्ट चे अध्यक्ष असून संगीत आणि बासरी चा प्रचार-प्रसार-प्रबोधनसंशोधन व सवंर्धन याचे कार्य अनेक बासरी वादक शिष्यांच्या सहकार्याने करत आहे.  
श्री. गिंडे यांना भारत सरकारद्वारे सिनियर फेलोशिपसहारा इंडिया यांच्याकडून जीवनगौरव पुरस्कार जगदगुरु शंकराचार्य श्रृंगेरी महपीठ यांनी वेणू विद्वान पदवी देऊन गौरविले आहे. 4 तपाहून अधिक काळात श्री. गिंडे यांच्याकडे हजारों विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले आहे.
0000


वृ.वि. 3757                                                                             6 मार्गशीष 1940 (दु.12.50 वा.)                                                                                                दि. 27 नोव्हेंबर2018
विधानसभा इतर कामकाज :
शेतीला दिवसा विजेसाठी
सौर कृषीपंप योजनेला गती
-  ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
मुंबई, दि. 27 : आगामी दोन-तीन वर्षात राज्यातील कृषीपंप मोठ्या प्रमाणात सौर ऊर्जेवर वळविण्यात येतील. त्यामुळे शेतीसाठी दिवसा वीज उपलब्ध होऊ शकणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेला गती देण्यात येत आहेअसे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत सांगितले.
परभणी जिल्ह्यातील  कृषीपंपांना वीज पुरवठ्यासाठी उच्च दाब वितरण प्रणाली (H.V.D.S.)योजनेअंतर्गतची कामे सुदर्शन इलेक्ट्रिकल्स इंजिनिअरिंग वर्क्स या एजन्सीला दिल्याबद्दल लक्षवेधी सूचना सदस्य विजय भांबळे यांनी उपस्थित केली. त्यास उत्तर देताना श्री. बावनकुळे बोलत होते. त्यांनी पुढे माहिती दिली कीया सुदर्शन इलेक्ट्रिकल्स इंजिनिअरिंग वर्क्स एजन्सीला पायाभूत आराखडा टप्पा क्र. 2 योजनेंतर्गत यापूर्वी फुल-टर्न-की निविदा क्र. टी-72 अंतर्गत महावितरण कंपनीकडून कार्यादेश देण्यात आले होते. या कंत्राटदाराच्या कामाच्या संथ गतीमुळे मुख्य अभियंता (पायाभूत आराखडा) मुंबई यांनी दिलेले कंत्राट रद्द केले. मात्र नियमातील तरतुदीनुसार हा कंत्राटदार महावितरणच्या इतर निविदा प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी अपात्र ठरत नाही. परभणी मंडळातीलH.V.D.S. योजनेंतर्गतची कामांसाठी महावितरणने नियमानुसारच निविदा प्रक्रिया राबविली.  त्यांची निविदा सर्वात कमी किंमतीची (एल-1) ठरल्याने त्यांना काम देण्यात आले आहे. तथापिकंपनीला देण्यात आलेली कामे विहित वेळेत पूर्ण होतील यासाठी महावितरणकडून काळजी घेण्यात येईल असेही श्री. बावनकुळे म्हणाले.
चर्चेदरम्यान उपस्थित एका मुद्द्याला उत्तर देताना ते म्हणालेपूर्व विदर्भातील चंद्रपूरगडचिरोलीवर्धा,भंडारा आदी जिल्ह्यांतील कृषीपंपाना काही कालावधीसाठी 12 तास वीज पुरवठा करण्यात आला. या जिल्ह्यांमध्ये पावसाने खंड दिल्यामुळे धान पीक वाळून चालले होते. सुमारे चार हजार कोटी रुपयांचे धान पीक वाचविण्यासाठी 65 कोटी रुपयांची अतिरिक्त वीज या कालावधीमध्ये पुरवण्यात आली. सध्या या जिल्ह्यात कृषीपंपांना आठ तास वीज पुरवठा करण्यात येत आहे. महापारेषण आणि महावितरण ने केलेल्या विविध उपाययोजनांमुळे  राज्यात वीज वितरण हानी 15 टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे, असे असले तरी हे प्रमाण पाच टक्क्यांपर्यंत कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यासाठी जुनाट वीज वितरण प्रणाली बदलणेवीज चोरी रोखणे आदी आव्हाने आहेत. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.
या लक्षवेधी वरील चर्चेत  सदस्य सर्वश्री अमित देशमुखयोगेश सागरदीपक चव्हाणअतुल भातखळकर,भारत भालकेहर्षवर्धन सपकाळश्रीमती मनीषा चौधरी यांनी भाग घेतला.    


महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget