.
.
.

वाखरी आश्रमशाळेतील 16 वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या... अनोळखी मुलाने चिठ्ठी देऊन बदनाम करण्याचा प्रयत्न केल्याने काजलची आत्महत्या...

पंढरपूर LIVE 23 जानेवारी 2019

मृत काजल पोरे
पंढरपूर तालुक्यातील वाखरी येथील आश्रमशाळेत शिक्षण घेत असलेल्या कु. काजल दत्तात्रय पोरे (वय 16) रा. वाखरी, ता.पंढरपूर या  विद्यार्थिनीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची करुण घटना आज घडली आहे. या घटनेमुळे पंढरपूर तालुक्यात खळबळ उडाली असून पंढरपूर तालुक्यातील ग्रामीण भागातही रोडरोमियोंनी उच्छाद मांडलेला असल्याचे अधोरेखीत झाले आहे. दहावी मध्ये शिक्षण घेत असलेल्या काजलच्या या आत्महत्येमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत सदर विद्यार्थिनीचे वडिल दत्तात्रय गजेंद्र पोरे, रा.वाखरी, ता.पंढरपूर यांनी पंढरपूर ग्रामीण पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार मुलीच्या वडिलांना शाळेतील शिक्षक पी.जी. गायकवाड यांनी फोन करुन बोलावले होते व तुमच्या मुलीला एक लहान मुलगा मोबाईल नंबरची चिठ्ठी देत होता. लक्ष ठेवा असे सांगितले होते. यासंदर्भात मुलीच्या वडिलांनी मुलगी काजलला दि. 22 जानेवारी 2018 रोजी विचारणा केली होती व आपली परिस्थिती गरीबीची आहे. चांगले वाग वगैरे समज दिली होती. तेंव्हा शाळेमध्ये अनोळखी मुलाने चिठ्ठी देऊन विनाकारण मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती काजलने आपल्या वडिलांना दिली होती. आज दि. 23 जानेवारी रोजी काजलने घराच्या किचनरुमचे दार आतुन लावुन घेतले व ती उघडत नाही अशी माहिती मुलीच्या वडिलांना घरातून मिळाली. त्यानुसार ते घरी आले व काजलला किचनचा दरवाजा उघडण्यास सांगितले परंतु आतुन कोणताही प्रतिसाद आला नाही. यावेळी त्यांनी आपल्या त्यांचे मेहुणे राहुल सुरेश चव्हाण यांच्या सहाय्याने पहारेने दरवाजा उघडला तेंव्हा काजलने घराच्या छताला असलेल्या लोखंडी पाईपला बांधलेल्या ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला होता. काजलला उपचारासाठी पंढरीतील डॉ.पाचकवडे यांचे दवाखान्यात नेले असता त्यांना उपजिल्हा रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले. तिथे डॉक्टरांनी तिची तपासणी केली असता ती मृत झाली असल्याचे सांगितले.

यानंतर मुलीच्या वडिलांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली व आपली मुलगी काजल हिला कोणीतरी अनोळखी मुलाने फोन नंबरची चिठ्ठी देण्याचा प्रयत्न करुन तिची बदनामी व्हावी म्हणून छेड काढुन तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले असल्ययाची फिर्याद पंढरपूर ग्रामीण पोलिस ठाण्यात दिली आहे. गुन्ह्याची नोंद पोलिस ठाण्यात झाली असुन अधिक तपास चालु आहे.

महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget