मानसिक व शारिरीकदृष्ट्या खंबीर राहून विद्यार्थ्यांनी परीक्षेला सामोरे जावे- पत्रकार भगवान वानखेडे ; नेपतगाव माध्यमिक विद्यालयातील 10 वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न

Pandharpur LIVE 27 February 2019


दहावीच्या विद्यार्थ्यांनी शाळेस टेबल व महापुरुषांच्या प्रतिमांची भेट दिली.

पंढरपूर (प्रतिनिधी):- ‘‘दहावीच्या विद्यार्थ्यांनी मानसिक व शारिरीकदृष्ट्या खंबीर राहून परीक्षेला सामोरे जावे.’’ असे मत पंढरपूर लाईव्ह चे संपादक भगवान वानखेडे यांनी व्यक्त केले. देशभक्त बाबुरावजी बागल शिक्षण प्रसारक मंडळ गादेगाव संचलित माध्यमिक विद्यालय नेपतगाव, ता.पंढरपूर येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते.दे.भ.बाबुरावजी बागल यांच्या प्रतिमा पुजनाने कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. यावेळी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार झाला. दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन परीक्षेतील यशासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. दहावीच्या विद्यार्थ्यांनी शाळेस टेबल व महापुरुषांच्या प्रतिमांची भेट दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मच्छिंद्र सावंत सर यांनी केले तर आभार रमेश घोडके सर यांनी मानले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंढरपूर लाईव्हचे संपादक भगवान वानखेडे हे होते तर संस्थेचे अध्यक्ष शांतीनाथदादा बागल, खरेदी विक्री संघाचे संचालक रामकृष्ण जवळेकर, अंकुश येडगे, सरपंच अशोक कदम, ग्रा.पं. सदस्य घोडके, तंटामुक्त समिती अध्यक्ष हेगडकर, सुखदेव बागल आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.

➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com 

पुढे बोलताना वानखेडे म्हणाले की, ‘‘परीक्षा तोंडावर आल्यामुळे विद्यार्थी कांहीसे तणावात आढळतात. ऐन परीक्षेच्या आदल्या रात्री जागुन अभ्यास करणे, वेळच्यावेळी जेवण न करणे, झोप व्यवस्थित न होणे यामुळे विद्यार्थ्यांचे मानसिक व शारिरीक स्वास्थ्य बिघडते. हे टाळण्यासाठी परीक्षा काळात विद्यार्थ्यांनी पुरेशी झोप घेणे वेळच्यावेळी जेवणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी आपले मन प्रसन्न ठेवत आत्मविश्‍वासानं परीक्षेला सामोरं जावं. दहावीनंतर पालकांच्या तुमच्याकडून अनेक अपेक्षा असतात परंतु इंजिनिअर, डॉक्टर वगैरेच व्हावं असं कांही नसतं स्वत:चा व्यवसाय, पत्रकारिता किंवा इतर अनेक क्षेत्र तुमच्यासाठी खुली आहेत. तुम्हाला आवडेल ते आणि तुम्हाला झेपेल ते क्षेत्र तुम्ही निवडू शकता. या शाळेतून बाहेर पडताना एवढं कायम ध्यानात ठेवा, आयुष्यभर गुरुजनांना व तुमच्यासाठी खस्ता खाणार्‍या तुमच्या आईवडीलांना विसरु नका. असे सांगुन त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना दहावीच्या परीक्षेसाठी व उज्जवल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या.


यावेळी बोलताना शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शांतीनाथदादा बागल म्हणाले की, ‘‘अतिशय प्रतिकुल परिस्थितीत ही संस्था चालु केली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आपल्या परिसरात शिक्षण घेता यावे हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवुन ही संस्था सुरु केली. दहावीच्या विद्यार्थ्यांकडून एवढीच अपेक्षा आहे की, या शाळेतून आज तुम्ही बाहेर पडत आहात परंतु पुन्हा येथील शिक्षणाचा योग्य वापर करत उच्चशिक्षीत होऊन अधिकारी, डॉक्टर, इंजिनिअर असं काहीतरी बनून या शाळेत नक्की या.’’ यावेळी विद्यार्थी, शिक्षक, प्रमुख पाहुणे व स्वत: संस्थेचे अध्यक्ष शांतीनाथदादा बागल हे भावनीक झालेले आढळले. प्रमुख पाहुणे खरेदी विक्री संघाचे संचालक रामकृष्ण जवळेकर, अंकुश येडगे, नेपतगाव तंटामुक्त समितीचे अध्यक्ष हेगडकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कांही विद्यार्थ्यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget