18 वर्षीय तरुणीचे एकतर्फी प्रेमातून अपहरण... 12 वीची परीक्षा देऊन गावाकडे परतताना पखालपूर गणपती मंदिराच्या पुढे झाले अपहरण.. गुन्ह्यातील बोलेरो गाडीसह 5 आरोपी पोलिसांच्या ताब्यात... मुलगी सुखरुप!

Pandharpur LIVE 24 February 2019

गुन्ह्यात वापरलेली बोलेरो जीप


गुन्ह्यात अटक केलेले आरोपी. सदर आरोपींना उद्या न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.

लग्न करित नाही म्हणुन जबरदस्तीने अपहरण पंढरपूर तालुक्यातील एका 18 वर्षाच्या मुलीचे अपहरण केल्याची घटना काल घडली होती. सदर मुलगी 12 वीची परीक्षा देऊन आपल्या नातेवाईका सोबत मोटारसायकलवरुन आपल्या गावी परतत असताना पखालपूर गणपती मंदिराच्या पुढे कांही अनोळखी इसम व उंबरगाव , ता.पंढरपूर येथील दोघेजणांनी बोलेरो जीपमधून तिच अपहरण केले होते.याबाबत डीवायएसपी डॉ.सागर कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांनी तपासकामी तातडीने हालचाली करुन पथके तयार करून रवाना केली. रात्रभरात सर्च ऑपरेशन केले. अखेर सदर तरुणीला सातारा येथुन पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या गुन्ह्यात 5 आरोपींना अटक केली असून गुन्ह्यात वापरलेली बोलेरो आणी मोटार सायकल जप्त करण्यात आली आहे.

 हा गुन्हा नोंद केल्यानंतर दोन पथके तयार केली होती, मध्यरात्री सातारा तालुका पोलिसांनी फोन केला की, पंढरपुर येथील मुलीला चार मुलांनी जबरदस्तीने पळवुन आणले आहे, आणी नाकाबंदीमध्ये मुलीसह मुलांना ताब्यात घेतले आहे, यावर तातडीने पोलिसांचे पथक सातारा येथे पाठवुन आज पहाटे मुलीची सुटका करून आरोपींना ताब्यात घेतले.

या पथकामध्ये पो. हवालदार चव्हाण, पो. ना. भोसले, पो. ना. मोरे यांचा समावेश होता.

पो. हवालदार सुहास पवार सातारा तालुका पो. ठाणे.

अटक आरोपींची नावे:-
1. सुधाकर उर्फ जनार्धन दत्तात्रय साळुंके वय 26 वर्ष
2.  हनुमंत दत्तात्रय साळुंके वय 22 वर्ष
दोन्ही रा. उंबरगाव
3.रोहित संजय भोसले वय 20 वर्ष रा. शेगाव ता. जत
4. परमेश्वर दाजी शिंदे वय 23 वर्ष रा. आंबे ता. पंढरपूर
5. अकबर मदार मकानदार वय 23 वर्ष रा. सीदापुर ता. मंगळवेढा

फरार आरोपी
6. आबा उर्फ भगवंत प्रताप साळुंखे रा. उंबरगाव

याबाबत पंढरपूर तालुका पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, दि. 23 फेब्रुवारी रोजी जाधववाडी, ता.पंढरपूर येथील एक मुलगी 12 वीची परीक्षा देण्याकरिता पंढरपूरमध्ये आलेली होती. पेपर संपल्यानंतर सदर मुलीला तिचे नातेवाईक हे जाधववाडीकडे मोटारसायकलवरुन परत नेत असताना पखालपूर गणेश मंदिराच्या पुढे एका पांढर्‍या रंगाच्या बुलेरो गाडीत आलेल्या सुधाकर साळुंखे व हणमंत साळुंखे (रा.उंबरगाव, ता.पंढरपूर),  अनोळखी इसमांनी मोटारसायकल अडवून सदर मुलीला मोटारसायकलवरुन जबरदस्तीने ओढून बोलेरो जीप गाडीत बसवून तिचे अपहरण केले. यावेळी  हिने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला असता, जीपमध्ये आलेले सुधाकर साळुंखे व हणमंत साळुंखे (रा.उंबरगाव, ता.पंढरपूर) यांनी व इतर अनोळखी लोकांनी तिला दमदाटी करत गप्प बसवले. व गाडीत घालून तिला जबरदस्तीने नेले. ही घटना काल दि. 23 फेब्रुवारी 2019 रोजी दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबतची फिर्याद मुलीचे नातेवाईक  यांनी पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात दिली होती.


पोलिसांनी अवघ्या कांही तासात आरोपींचा छडा लावून सदर मुलीस सुखरुपपणे तिच्या आई-वडिलांच्या स्वाधीन केल्याने पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. 
📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.
 https://play.google.com/store/apps/details…

➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com 

Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget