पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीतर्फे शहीद जवानांच्या कुटुंबीयांना 20 लाखांची मदत

Pandharpur LIVE 18 February 2019


पंढरपूरता. 18 : जम्मू-काश्मीर येथील पुलवामा येथे झालेल्या दहशतवाद्यांच्या हल्ल्यात महाराष्ट्रातील दोन जवान शहीद झाले आहेतया शहीदांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 10 लाख रूपये अशी एकूण 20 लाखांची मदत पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्यावतीने करण्यात येणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष नाडॉअतुल भोसले यांनी दिली आहे.


📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.https://play.google.com/store/apps/details…➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com 


याबाबत प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहेकी पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात 42भारतीय जवान शहीद झालेया दुःखद घटनेमुळे सर्व देश हळहळला असूनदेशभरात शोककळा पसरली होतीया हल्ल्यात देशासाठी प्राणाची बाजी लावणारे लढाऊ सैनिक आपण गमावले असूनयामध्ये महाराष्ट्राच्या बुलढाणा जिल्ह्यातील नितीन शिवाजी राठोड आणि संजयसिंह राजपूत या दोन वीरपुत्रांचा समावेश आहेत्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे सर्व पदाधिकारीकर्मचारी व महाराष्ट्रातील तमाम विठ्ठलभक्त वारकरी सहभागी असूनया शहीद जवानांच्या कुटुंबीयांना मानवतावादी भूमिकेतून व सामाजिक उत्तरदायित्व म्हणून मंदिर समितीमार्फत प्रत्येकी 10 लाख रूपये अशी एकूण 20 लाख रूपयांची मदत करण्याचा निर्णय घेतला आहे


शासनाच्या योग्य निर्देशानुसार हा निधी मंदिर समितीमार्फत शहीदांच्या कुटुंबियांकडे सुपूर्द केला जाणार असल्याचे डॉअतुल भोसले यांनी या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget