वसमतमध्ये इयत्ता दहावीतील सवंगडी 30 वर्षानंतर एकत्र आले... दुसरा जन्म वसमत नगरीतच मिळावा- अविनाश पाटील

Pandharpur LIVE 21 February 2019Video Advertवसमत :- बहिर्जी स्मारक विद्यालय वसमत 1990 च्या बॅचचे 30 व्या वर्षी स्नेहसंमेलन नुकतेच वसमत येथील वर्धमान मंगल कार्यालय येथे पार पडले. दहावीतील संवगड़ी 30 वर्षांनी पुन्हा एकत्रित आणुन विद्यालय व शिक्षकवृंदाप्रति ऋण व्यक्त करण्याची संयोजकांची संकल्पना अगदी स्त्युत्य आहे. अनेक वर्षानी सर्व संवगड़ी एकत्र येणार या भावनेंन सर्व मित्रांचा आनंद द्विगुणीत होत होता. 

1990 च्या बॅचचे विद्यार्थी व वसमतर अतोनात प्रेम आसनारे साखर विश्व प्रतिष्ठान महाराष्ट् राज्यचे सचिव अविनाश मनोहर कुटे पाटील यांनी मनोगत व्यक्त केले की , माझे गांव नेवासा (अहमदनगर) महान ग्रंथ ज्ञानेश्वरी च्या लेखनाने जगप्रसिद्ध असूनही ,माझे बालपन पूर्णा साखर कारखाना कॉलनी व शिक्षण बहीर्जी स्मारक विद्यालय वसमत येथे पुर्ण झाल्याने माझी कर्मभूमी वसमतच् असून ख-या अर्थाने माझी नाळ वसमतकरांशी जोडली गेलेली आसल्याने एक अनोखे जिव्हाळयाचे ऋणानुबंध वसमत नगरीशी निर्माण झाले आहे.


📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.https://play.google.com/store/apps/details…➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com 
बहीर्जी स्मारक विद्यालय व सर्व गुरुजन वर्गासह वसमतकर व पूर्णा साखर कारखाना परिवार यांचे संस्कार आदरणीय काकाजी कै.गगांप्रसादजी अग्रवाल यांच्या प्रेरनेमुळे मी जेष्ठ समाज सेवक बाबाजी आमटे,ग.प.प्रधान,अनिस चे नरेंद्र दाभोळकर,ग्राहक चळवळीचे बिंदु माधवजी जोशी,स्वादध्यायी आठवले दादा,अनाथाची माई सिंधुताईं,जेष्ठ समाजसेवक अन्नासाहेब हजारे,यांचे कार्यात सहभागी होण्याचे भाग्य मला वसमतच्या कर्मभूमीमुळेच् लाभले.या मातीच्या थोर उपकारामुळेच साखर कामगार व शेतकरी बांधवासाठी मी साखर विश्व प्रतिष्ठानचे अधिष्ठान महाराष्ट् राज्यत उभे करु शकत आहे त्यामागे वसमतकराचे आशीर्वाद सदैव माझे पाठीशी आहेत.


विजयभाउ दगड़ू,प्रमोद शातलवार,चद्रकांत देवने,संजय बेडके,इसहाख पठान ,सलीम शेख,मकरंद पांगरकर यांचेसह  अल्पकाळ मी पत्रकारितेतही रमलो दै. गांववाला, दै. दलितवाणी,श्रमिक एकजुट ,सा. तांबट, आदि स्थानिक वर्तमान पत्रात लेखन केले.सदर वेळी जेष्ठ पत्रकार उत्तमरावजी दगड़ू काका,दत्ताजी वसमतकर, मुळे सर, प्राचार्य रावसाहेब पतंगे सर ,अँड. रामचंन्र्द बागल,रमेशजी अंबेकर, अरुण अंबेकर,स.गो. शिंदे सर,ताटेवार सर,बोचकरी ,कार्ले,कापूसकरी,सातपुते, बोरिवाले, टेहरे ,कुल्थे,लोळगे,जैन,बालाजी वाघमारे, भोसले,महावीर अंडमाने,अँड.कानेश्वरकर ताई,वाघीले,डॉ. गुडेवार,सोकळवार,कड़तन,कातोरे, हरबळे, नवघरे,क-हाळे,बेले, गुडाळे,माचेवार,प्रकाश नाकोड़ा,आदि परिवार,आलमजी वकील,अंन्वेकर मामा, पातेकर ,पालमकर मामा ,अजिठा प्रेस फोटो नबाब भाई,राजकुमार स्वामी यांचे सहकार्य लाभले म्हनुन आजही थोडेफार लेखन करत असतो.या सर्वाचे फलित म्हणजे वसमतकरांचे प्रेम मी आपले सदैव वसमतकरांचे ऋनात राहनेच पसंद करेन व दूसरा जन्म मला वसुमती नगरितच् मिळो अशी प्रार्थना करेंन.

30 वर्षा नंतर ब.स्मा.वि.सर्व तत्कालीन शिक्षकवृन्द व सर्व मित्र मैत्रीन एकत्र आनन्याचे काम संयोजक कृष्ण चाटनकर,प्रा. विशाल पतंगे सर,अशोकजी गुजराथी,शैलेश,कुटूरवार,कार्ले,नावंदर,मंगेश दंडे, पंकज, श्याम टाक,मोटरवार व त्यांचे सर्व सहकारी टिमने खुप कष्ट,चीकाटी, कौशल्यातुन  केले त्या सर्वाचे खुप खुप आभार .एसएससीचे गेटटुगेदर /स्नेहसमेलन व्हावे याची वसमत येथे मुळ संकल्पना सचिन टेक्सटाइल्सचे मालक कापुसकरी,प्रभाकर कुल्थे आदिनी रुजवली तीआत्ता चांगली बहरतेय भविष्यात इडत ची 1990 ते 1995 अशी मोठी टीम एकत्र जमवुन मोठे स्नेहसमेलन आयोजन करण्याचे बळ सयोजकाना मिळो असे मनोगत कुटे पाटील यांनी व्यक्त केले

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget