पुलवामा : कट्टरवाद्यांशी पुन्हा चकमक, 4 जवानांनी प्राण गमावले

पंढरपूर LIVE 18 फेब्रुवारी 2019

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातल्या पिंगलेना भागात सोमवारी पहाटे झालेल्या गोळीबारात लष्कराचे चार जवान ठार झाले. या जवानांमध्ये एका मेजरचाही समावेश आहे. चकमकीत एक जवानही जखमी झाला आहे. दोन्ही बाजूकडून होणारा गोळीबार थांबला असला तरी सेनेची या भागातील शोधमोहीम अजूनही सुरू आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लष्कराच्या 55 राष्ट्रीय रायफल्स, CRPF आणि SGO यांनी पिंगलेना भागात संयुक्तपणे एक मोहीम हाती घेतली होती.



इथे कट्टरवादी लपले असल्याची माहिती लष्कराला मिळाली होती. कारवाई सुरू झाल्यानंतर कट्टरवाद्यांकडूनही गोळीबार सुरू झाला. या गोळीबारातच लष्कराचे जवान ठार झाले.
मेजर डीएस ढोंढियाल, हेड कॉन्स्टेबल सावे राम, शिपाई अजय कुमार आणि हरी सिंह अशी ठार झालेल्या जवानांची नावं आहेत. शिपाई गुलजार मोहम्मद हे जखमी झाले आहेत. त्यांना लष्कराच्या हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं आहे.
या चकमकीत आपणही जखमी झालो, असा दावा एक नागरिक मुस्ताक अहमद यांनी केला आहे.







महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 36 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

-: कार्यालय :-

शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget