.
.
.

तारापूर आश्रमशाळेतील 6 वर्षाच्या विद्यार्थ्याचे अपहरण... 5 तासात पोलिसांनी लावला शोध... अकलुजमधील 6 वर्षाचा चिमुरडा वेदांत सुखरुप

पंढरपूर LIVE 14  फेब्रुवारी 2019

  
तारापूर, ता. पंढरपूर येथील आश्रमशाळेतील 6 वर्षाच्या विद्यार्थ्याचे काल दुपारी अपहरण झाले होते. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून सदर मुलाचा शोध 5 तासात लावला असुन अकलुजमधील 6 वर्षाचा चिमुरडा वेदांत सुखरुप आहे.

याबाबत पंढरपूर तालुका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांच्याकडून समजलेल्या माहितीनुसार काल दि. 13 फेब्रुवारी 2019 रोजी तारापूर येथील आश्रम शाळेत वास्व्यास असलेला विद्यार्थी वेदांत सतपाल वायकर (वय-6, इयत्ता पहिली)  याचे अपहरण झाले असल्याची फिर्याद विजय सुखदेव घोडके (वस्तीगृह अधिक्षक) यांनी पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात दिली होती.


सदर मुलाची आई काजल वायकर रा. जोशी गल्ली, अकलुज व राहुल भोसले , रा. करकंब, ता. पंढरपूर हे नेहमीच वेदांत ला भेटावयास आश्रमशाळेत येत असत. काल दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास राहुल भोसले व एक अनोळखी इसम आश्रमशाळेत आले व वेदांतला वडापाव खाऊ घालुन आणतो म्हणाले, राहुल भोसले हा मुलाच्या आईसोबत नेहमीच येत असल्याने  त्याचेसोबत वेदांतला पाठवले. परंतु बराच वेळ झाला तरी वेदांत परत आला नाही. त्याचा शाळेच्या परिसरात शोध घेतला तरी तो आढळून आला नाही. याबाबतची माहिती मुख्याध्यापक सुधीर शंकर कड्डी यांना दिली. याचदरम्यान वेदांत ची आई काजल वायकर यांचा वर्गशिक्षक चिनगुंडे यांच्या मोबाईलवर कॉल आला. त्या म्हणाल्या की, ‘‘राहुल भोसले याचा मला फोन आला होता. त्याने वेदांत ला नेले आहे व त्याला खलास करतो अशी धमकी मला दिली आहे. त्याला तुम्ही त्याच्यासोबत का पाठवले?’’ यानंतर आश्रमशाळेतील प्रशासनाचे वतीने तीन रस्ता परिसर, सरगम चौक आदी ठिकाणी वेदांत ची शोधाशोध करण्यात आली परंतु तो कुठेच आढळला नाही. झाल्या प्रकाराची गंभीरता लक्षात घेऊन वस्तीगृह अधिक्षकांनी पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात धाव घेतली व फिर्याद नोंदवली. सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी या गुन्ह्यासंदर्भात गोपनीयता बाळगली होती. 

पंढरपूरचे उपविभागीय पोलिस अधिक्षक डॉ.सागर कवडे, पंढरपूर तालुका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांनी तपासाची दिशा ठरवली, आधुनिक तपास प्रणालीचा वापर करत तपासाची चक्रे वेगाने फिरवली. पंढरपूर-मोहोळ, सोलापुर, नान्नज, बार्शी आदी भागात कसून शोधल्यानंतर  5 तासाच्या प्रयत्नांती वेदांत सुखरुप मिळाला. आरोपीसही पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील कार्यवाही सुरु आहे. 

बार्शी पोलिस ठाण्याचे पी.एस.आय. वसगडे,  पोना.आरकिले, पोकॉ. माने, बार्शी पथक करकंब पोलिस ठाण्याचे पोना. शिंदे, पोना. मुळे यांनी या कामगिरीमध्ये अत्यंत महत्वाची भुमिका बजावली असुन पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

-: कार्यालय :-

शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget