शिवजंयती निमित्त स्वेरीतील १९४ विद्यार्थ्यांनी केले ऐच्छीक रक्तदान

Pandharpur LIVE 22 February 2019


स्वेरीच्या राष्ट्रीय सेवा योजनेचा स्तुत्य उपक्रम
पंढरपूर- गोपाळपुर (ता.पंढरपूर)येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयुट संचलित इंजिनीअरिंग व फार्मसी अंतर्गत असलेल्या व सोलापूर विद्यापीठ संलग्नित असलेल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३८९ व्या जयंतीचे औचित्य साधून आयोजिलेल्या रक्तदान शिबीरात त अभियांत्रिकीच्या १६२ विद्यार्थ्यांनी तर फार्मसीच्या ३२ विद्यार्थ्यांनी असे मिळून स्वेरीच्या एकूण १९४ विद्यार्थी, विद्यार्थींनी व प्राध्यापकांनी ऐच्छीक रक्तदान केले.
📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.
 https://play.google.com/store/apps/details…

➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165

कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूर
 Mail- livepandharpur@gmail.com 

शिवजयंती’ म्हणजे तरुणांच्या अंगात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते. सर्वजण शिवजयंती साजरी करताना अनेक विधायक उपक्रम राबवितात. यामध्ये स्वेरी देखील मागे नाही. स्वेरी अंतर्गत असलेल्या अभियांत्रिकी व फार्मसी मधील राष्ट्रीय सेवा योजनेअतर्गंत ऐच्छीक रक्तदान शिबीर राबविण्यात आले. संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली अभियांत्रिकीचे रा.से.यो.कार्यक्रम अधिकारी प्रा. सहदेव शिंदे व डॉ.आर.एन. हरिदास तर फार्मसीचे रा.से.यो.कार्यक्रम अधिकारी प्रा. मिथुन मणियार व प्रा. व्ही.डी. चिपडे यांच्या नेतृत्वाखाली यंदाही शिवजंयतीच्या निमित्ताने रक्तदान शिबीर राबविले. स्वेरी अंतर्गत असणाऱ्या पदवी अभियांत्रिकीचे १६२ व बी. फार्मसीचे ३२ विद्यार्थ्यांनी असे मिळून एकूण १९४ विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्तपणे रक्तदान केले. अभियांत्रिकीकडे पंढरपूर ब्लड बँक व सोलापूर ब्लड बँक तर फार्मसीकडे दमाणी ब्लड बँक, सोलापूर अशा एकूण तीन रक्तपेढयांना स्वेरीमध्ये प्राचारण करण्यात आले होते. यावेळी प्राध्यापकशिक्षकेत्तर कर्मचारी यांनीही रक्तदान केले. रक्तदान केल्यानंतर रक्तदात्यांच्या आरोग्याची काळजी रक्तपेढीतील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी वर्ग घेत होते. रक्तदानाची प्रक्रिया सुरळीतपणे पार पडण्यासाठी स्वेरीचे विद्यार्थी विद्यार्थीनींनी परिश्रम घेतले. रक्तदानाच्या ठिकाणी शिवजयंतीचे प्रमुख पाहुणे विद्या प्रतिष्ठानचे प्रा. राजकुमार कदम व ‘मिशन मोदी अगेन पीएम’चे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष रामगोपाल काका,महाराष्ट्र राज्य टीचर एज्युकेटर्स असोशिएशनचे अध्यक्ष डॉ. प्रशम कोल्हे, संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे, जेष्ठ विश्वस्त दादासाहेब रोंगेविश्वस्त बी.डी.रोंगे, विश्वस्त प्रा. सुरज रोंगे, फार्मसीचे प्राचार्य डॉ. एस.डी. सोनवणे, उपप्राचार्य डॉ. अमित गंगवाल,विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात, इतर अधिष्ठाता,विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी आदींनी भेट दिली.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget