कुसुमाग्रजांनी मराठी भाषेला देश पातळीवर नेण्याचे कार्य केले – डॉ. रमेश शिंदे

Pandharpur LIVE 27 February 2019


स्वेरीमध्ये ‘मराठी राजभाषा दिन’ साजरा

पंढरपूर- (संतोष हलकुडे )‘ भाषा ही आपल्या जन्माबरोबर येते आणि मृत्यूबरोबरच जाते परंतु भाषेचे सौंदर्य पाहत असताना मात्र जेव्हा विनोदाची भाषा आपण गांभीर्याने घेतो तेव्हाच मराठी भाषेचे महत्व समजते. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ,कवी, साहित्यिक कुसुमाग्रजांनी खऱ्या अर्थाने मराठी भाषेला देश पातळीवर पोहचविले असून त्यांच्या साहीत्यांमधून मराठी भाषेबद्धलची तळमळ आणि आत्मियता दिसून येते. म्हणून आज प्रत्येकांनी मराठी भाषेकडे सजगतेने पाहणे गरजेचे आहे. भाषेचे प्रमुख कार्य हे वक्ता आणि श्रोता यांच्यातील परिणामकारक  संवाद यावर अवलंबून आहे.’ असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपूरचे मराठी विभागाचे प्रमुख डॉ. रमेश शिंदे यांनी व्यक्त केले.


📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.

➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com 

 मराठी साहित्य क्षेत्रात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे दुसरे साहित्यिक, प्रसिद्ध मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांच्या जयंतीच्या निमित्ताने स्वेरीत ‘मराठी राजभाषा दिन’ साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून के.बी.पी.चे डॉ. शिंदे मराठी भाषेचे महत्व पटवून देत होते. प्रास्तविकात विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात यांनी ‘मराठी भाषा दिवसा’चे महत्व विशद करताना ‘कुसुमाग्रजांच्या मराठीतील साहित्यामुळे महाराष्ट्रातच नव्हे तर भारताबाहेर देखील मराठी भाषेला महत्व प्राप्त झाले असून कुसुमाग्रजांच्या  साहित्य संपदेमुळे मराठी भाषा उच्च स्तरावर पोहचली आहे. आज मातृभाषेमुळेच भाषेची गोडी निर्माण होवून मनातील भावना अधिक उत्कट करता येतात. मराठी भाषेची आवड  निर्माण करण्यासाठी साहित्य क्षेत्रातील अवांतर वाचन करणे गरजेचे आहे.’ असे सांगितले. पुढे बोलताना डॉ. शिंदे म्हणाले की, ‘समाजाच्या विकासात भाषेला खूप महत्व असून भाषा ही समाज मान्य असते. यासाठी आपण कोणत्याही भाषेत शिक्षण घेताना मराठी भाषेचा मात्र न्यूनगंड बाळगू नका. सध्याचे युग ‘मोबाईल’ आणि ‘मालिका’ यांच्या मोहात गुंतलेले असताना मराठी भाषेसाठी  या मृगजळातून बाहेर येणे आवश्यक आहे.’ असे सांगून डॉ. शिंदे यांनी ‘रानात राबतो कुणबी माझा धनी गं.......’ हे भावगीत सुरात गाऊन उपस्थितांच्या टाळ्या मिळविल्या.

यावेळी पुलवामाच्या भ्याड हल्याचा बदला घेताना भारतीय हवाई दलाने १२ मिराज २००० या लढाऊ विमानांद्वारे पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या हल्ल्यात २०० ते ३०० दहशतवाद्यांना कंठ स्नान घातल्यामुळे भारतीय सैनिकांचे विशेष अभिनंदन करण्यास विद्यार्थी विसरले नाहीत. यावेळी ग्रामीण कवी गणेश गायकवाड, प्रवेश प्रक्रिया अधिष्ठाता डॉ. पी.एस. कचरे, सांस्कृतिक कार्यक्रम विभागप्रमुख प्रा. करण पाटील, प्राध्यापकवर्ग व आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. यशपाल खेडकर यांनी केले तर स्वेरी कॅम्पसचे इन्चार्ज प्रा. एम.एम. पवार यांनी आभार मानले.  
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget