प्रगल्भतेसाठी विद्यार्थ्यांनी आव्हानात्मक कार्य करावे– आय.इ.आय’चे सदस्य डॉ. प्रशांत पवार

Pandharpur LIVE 27  February 2019

 स्वेरीमध्ये ‘टॅलेंट-हन्ट २०१९’ या राज्यस्तरीय तांत्रिक उपक्रमाचे उदघाटन अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सिव्हील विभागाचे विभागप्रमुख आणि शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ.एन. डी. मिसाळप्राध्यापक वर्ग आदी  

स्वेरीज पॉलिटेक्निकमध्ये राज्यस्तरीय तांत्रिक उपक्रम ‘टॅलेंट-हन्ट २०१९’ चे थाटात उदघाटन

पंढरपूर: ‘आपण जे शिक्षण घेतो त्यामुळे मेंदूचा विकास होतो. यासाठी सतत आपल्या मेंदूला आव्हानात्मक कार्य द्यावे. यामुळे आपली बुद्धी प्रगल्भ होते. यासाठी कोणताही इगो न बाळगता आपले ध्येय निश्चित करून तसे वाटचाल करावे. आपण कुठे आहोत?’ यापेक्षा आपल्याला कुठे जायचे?’ हे करिअरच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे. आपण घेतलेल्या योग्य निर्णयावर काहीजण हसतात पण नंतर मात्र हसणारेच आपला गौरव करण्यासाठी सर्वात पुढे असतात.असे प्रतिपादन इन्स्टिटयूट ऑफ इंजिनिअर्स (इंडिया) अर्थात आय.इ.आय. (इंडिया) या महाराष्ट्र स्टेट सेंटरच्या एरोस्पेस इंजिनिअर्स डिव्हिजनचे  सदस्यडॉ. प्रशांत पवार यांनी केले.📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.

➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com 

येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅन्ड रिसर्च इन्स्टीट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पॉलिटेक्निक) मध्ये  ‘टॅलेंट-हन्ट २०१९’ या राज्यस्तरीय तांत्रिक उपक्रमाचे उदघाटन करण्यात आले.  यावेळी आय.इ.आय. सदस्य डॉ. पवार विद्यार्थ्याना मार्गदर्शन करत होते. कार्यक्रम समन्वयक प्रा. सुनील भिंगारे  व प्रा. सोमनाथ बागल यांनी प्रस्तावनेत टॅलेंट-हन्ट २०१९’ या तांत्रिक स्पर्धेचीसहभागी स्पर्धकांची बक्षिसाचे स्वरूप आणि स्पर्धेची नियमावली याबाबत सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या तंत्रज्ञानातील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी ‘स्वेरीमध्ये अनेक उपक्रमांचे आयोजन नेहमीच केले जातात. याच उपक्रमांचा एक भाग म्हणून ‘टॅलेंट-हन्ट २०१९’ चे आयोजन करण्यात आले आहे. या राज्यस्तरीय उपक्रमांत मेकॅनिकल इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर इंजिनिअरिंगसिव्हील इंजिनिअरिंगइलेक्ट्रिकल इंजीनिअरिंगइन्फर्मेशन टेक्नॉलॉजी आणि इलेक्ट्रोनिक्स अॅन्ड टेलेकम्युनिकेशन इंजिनिअरिंग या विभागांकडून आयोजित केलेल्या स्पर्धांमध्ये महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयांमधून जवळपास ९५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. त्यामध्ये पेपर प्रेसेंटेशनब्लाईन्ड सीरोबो रेसिंगपोस्टर प्रेसेंटेशनक्विझकॉम्पिटीशन अशा विविध उपक्रमांचा समावेश आहे. या प्रत्येक उपक्रमातील प्रथम व द्वितीय क्रमांकाच्या विद्यार्थांना बक्षीसेसन्मान चिन्हे व सहभागी विद्यार्थ्याना प्रशस्ती पत्रक देण्यात येणार आहेत. टॅलेंट-हन्ट २०१९’ कार्यक्रमावेळी सर्व विभाग आकर्षक व रंगीबेरंगी फुले,फुगेपताक्यांनी यांनी सजविले होतेठिकठिकाणी आकर्षक रांगोळीचा साज चढविला आहे तर परिसर सुगंधाने दरवळत आहे. बाहेरून आलेल्या स्पर्धक विद्यार्थ्यांची उत्तम सोय करण्यात आली आहे. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पॉलिटेक्निक)चे प्राचार्य प्रा.डॉ.एन.डी.मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली विभागप्रमुख कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व विभागप्रमुखप्रा. शरद कावळेप्रा. पी.टी.लोखंडे प्राध्यापकवर्ग व विद्यार्थी परिश्रम घेत आहेत. यावेळी विविध महाविद्यालयांचे स्पर्धकप्राध्यापक वर्गविद्यार्थी प्रतिनिधीविद्यार्थी उपस्थित होते.सूत्रसंचालन श्रुष्टी जगदाळे व ज्योती लिगाडे यांनी केले तर प्राचार्य डॉ.एन.डी.मिसाळ यांनी आभार मानले.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget