पंढरीत कर्नल भोसले चौक शिवजन्मोत्सव समितीचा शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात... मिरवणुकीत सामील झालेले खरेखुरे गजराज ठरले मिरवणुकीचे आकर्षण

Pandharpur LIVE 24 February 2019Video News 

सालाबादप्रमाणे पंढरीतील कर्नल भोसले चौक शिवजन्मोत्सव समिती व नागेशकाका भोसले मित्र मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 389 व्या जयंतीनिमित्त शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. दि. 19 फेब्रुवारी 2019 ते 22 फेब्रुवारी 2019 या कालावधीत विविध सामाजिक, शैक्षणिक व पारंपारिक कार्यक्रम राबविण्यात आले.

लहान मुलांसाठी चित्रकला व चित्र रंगभरण स्पर्धा, शिवचरित्रावरील व्याख्यान, समाजप्रबोधनासाठी सांस्कृतीक कार्यक्रम, लोकगीते, भारुड अशा अनेक कार्यक्रमांचा आस्वाद पंढरपूरवासियांना घेता आला. 


दि. 22 फेब्रुवारी 2019 रोजी सायंकाळी 7 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची भव्य मिरवणुक पंढरपूरमध्ये काढण्यात आली. मिरवणुकीची सुरुवात धैैर्यशील मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते महाराजांच्या पुतळ्याची पुजा करुन झाली.  या मिरवणुकीमध्ये घोडे, उंट या प्राण्यांसह हत्तीचा सहभाग असल्याने मिरवणुकीमध्ये डोलणारा गजराज हे अबालवृध्दांसाठी खास आकर्षण ठरला होता. या मिरवणुकीचे वैशिष्ट्ये म्हणजे मिरवणुकीमध्ये ढोल, ताशे, तुतार्‍या या पारंपारिक वाद्यांचा समावेश केला होता व लेझीमसारख्या पारंपारिक खेळाचा आस्वाद पंढरपूरकरांना घेता आला. या मिरवणुकीमध्ये पंढरपूर शहर व तालुक्यातील 2000 हून अधिक शिवभक्त सामील झाले होते. ही मिरवणुक पहाण्यासाठी पंढरपूरकरांनी मोठी गर्दी केली होती.
📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.
 https://play.google.com/store/apps/details…

➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com 
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget