.
.
.

‘व्हेलेंटाईन डे’ ला फाटा देत स्वेरीने साजरा केला ‘रोटी डे’

पंढरपूर LIVE 16 फेब्रुवारी 2019


मातोश्री वृध्दाश्रमातील आज्जीबाईने अशा रितीने स्वेरीच्या विद्यार्थिनीच्या चेहर्‍यावरुन मायेचा हात फिरवला... यावेळी विद्यार्थिनींचे डोळे पाणावले होते.

एम.बी.ए.विभागाने साजरा केलेल्या ‘प्रेम दिवसा’चीच सर्वत्र चर्चा !
पंढरपूर-(संतोष हलकुडे) पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करताना सध्याच्या पिढीची मात्र वाताहत होत आहे  हे पाहवेना. त्यामुळे नको त्या गोष्टींना सध्याच्या युगात नाहक महत्व दिले जात आहे. असे असतानाच स्वेरीच्या एम.बी.ए. विभागामधील विद्यार्थ्यांनी मात्र अनपेक्षितरित्या ‘रोटी डे’ साजरा करून सर्वांना सुखद धक्का दिला. विद्यार्थ्यांनी सांघीकरित्या केलेल्या कार्याची दखल आज सारा महाराष्ट्र घेत आहे. ‘खरंच अशा कौतुकास्पद कार्याचे अनुकरण केले पाहिजे.’ असाच सूर आता सर्वत्र उमटत आहे. एम.बी.ए. विभागातील प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना असा उत्कृष्ठ उपक्रम करण्याची प्रेरणा सर्वप्रथम सोशल मिडीयाद्वारेच मिळाली.

तंत्रशिक्षणाबरोबरच सामाजिक उपक्रमात देखील ‘स्वेरी’ अग्रेसर आहे याची कल्पना सर्वांनाच आहे. आजचा उपक्रम देखील असाच अदभूत होता. त्याचे झाले असे की, मागील संपूर्ण आठवडा सर्वत्र विविध ‘डे’नी साजरा झाला. फायदा काहीही नसला तरी क्षणिक आनंदासाठी अकारण पैशाची उधळपट्टी मात्र झाली. सोशल मीडियामधून या ‘डे’ चा महापूरच आलेला होता. यातून एक पोस्ट सतत व्हायरल होत होती. ती म्हणजे “ काश ‘रोटी डे’ भी होता, तो आज एक दिन के लिये गरीब भुके न रहते.’ बस्स! या वाक्याने अभियांत्रिकी महाविद्यालयाअंतर्गत असलेल्या एम.बी.ए.चे विभाग प्रमुख प्रा. करण पाटील यांची झोप उडाली. काहीतरी ‘हटके’ सामाजिक उपक्रम करावेसे मनात आले. त्यांनी संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली एम.बी.ए. मधील प्रथम व द्वितीय वर्ष मधील विद्यार्थ्यांजवळ आपल्या भावना व्यक्त केल्या. पाहता पाहता सर्वांनी प्रतिसाद दिला. ठरला तो दिवस, ठरले ते ठिकाण आणि निवडला तो ‘प्रेम’ दिवस ! अर्थात १४ फेब्रुवारी ! झालं! प्रत्येक विद्यार्थी योगदानांसाठी पुढे सरसावला. प्रत्येकांनी स्वतःच्या घरून कोणी ३० तीस चपात्या तर कोणी ३० भाकऱ्या आणल्या. दिवसभर वाटप केले तरी खराब होणार नाही अशी चमचमीत मटकीची उसळ तयार केली. 

वेळ न घालवता वसतिगृहातच काही पॅकेटमध्ये दोन तर काहीमध्ये तीन चपात्या, भाकरी व भाजी अशा स्वरूपात जवळपास ४०० पॅकेट तयार करून मोठ्या बॉक्समध्ये घेवून साधारण सव्वा आकराच्या सुमारास दोन कॉलेज बसमधून प्रथम वर्षाचे ६० आणि दुसऱ्या वर्षाचे ५० असे मिळून एकूण११० विद्यार्थी, प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी संभाजी वलटे यांच्यासह एम.बी. विभाग आपली मोहीम फत्ते करण्यास निघाले. प्रथम सर्वांनी गोपाळपुरातील ‘श्री संत तनपुरे महाराज मातोश्री वृद्धाश्रम’ गाठले. तेथील सर्व वृद्धांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक धनंजय राक्षे प्रास्तविकात म्हणाले, ‘आज ‘व्हेलेंटाईन डे’ जगभर साजरा करत असताना स्वेरीच्या विद्यार्थ्यांनी आगळ्या-वेगळ्या पद्धतीने ‘मातोश्री वृद्धाश्रमा’मध्ये भूकेलेल्यालांना ‘अन्नदान’ करून ‘रोटी डे’ साजरा करण्यासाठी आले असून स्वेरीची प्रत्येक वेळी सहकार्य लाभत असते.’ असे  ऐकताच अनेक वृद्धांचे डोळे पाणावले. ‘आमची मुले, आमचा नातू एवढीच मोठी झाली असावीत’ असे म्हणत. पदराने डोळे पुसत विद्यार्थ्यांनी आणलेले अन्न हसतमुखाने घेतले. याप्रसंगी वृद्धांसमवेत साधलेल्या संवादामुळे अनेक विद्यार्थी व विद्यार्थीनींना रडू कोसळले. 

प्रा. प्रवीण मोरे यांनी यावेळी मातोश्री वृद्धाश्रमाप्रमाणे मात्या पित्यांना वृद्धाश्रमात पाठविण्याची वेळ येणार नाही. असे सर्वांकडून वचन घेतले. जेवण होईपर्यंत तास दोन तास विद्यार्थी त्यांच्यासमवेत गुज-गोष्टी केल्या. यावेळी वृद्धांची कहाणी ऐकून अपूर्वा मोरे आणि प्रांजली इनामदार या विद्यार्थीनी अक्षरशः धाय मोकलून रडल्या. ‘असेही कठोर मुले असतात आणि असाही परिवार असतो की जो आपल्या जन्मदात्यांना अर्ध्यावर सोडतो.’ या वस्तुस्थितीने डोळे पाणावले. यावेळी मातोश्री वृद्धाश्रमात नाशिक, नांदेड पासून ते पंढरपूरपर्यंतच्या ३७ महिला आणि २५ पुरुष उपस्थित होते. ‘रोटी डे’च्या निमित्ताने तेथील जेष्ठ वृद्ध शाम करोडे यांच्या हस्ते विभागप्रमुख प्रा. करण पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यार्थी श्रीकृष्ण जोशी यांनी प्रत्येकी पाच किलो गहू व तांदूळ दिले. साधारण दोन तासात हा उपक्रम केल्यानंतर निर्माण झालेल्या प्रेमामुळे विद्यार्थ्यांचे पाय काही निघेना, पण अजून अन्नदान करायचे होते. पुन्हा मोर्चा वळविला रिद्धी-सिद्धी गणेश मंदिरामागे असलेल्या कुष्टरोगी वसाहतीकडे. तिथे प्रत्येक घरी अन्नदान करण्यात आले. ते देखील समाधानी झाले. पुढे सर्व विद्यार्थी आणि प्राध्यापक वर्ग वळाले दत्त घाटानजीकच्या पायरीकडे, तेथे असलेल्या सर्व भिक्षुकांना अन्नाचे पॅकेट देण्यात आले. पुढे सर्व विद्यार्थी पांडुरंगाचे मुख दर्शन घेऊन कॉलेजकडे परतली. आनंदाने केलेल्या कार्याने सर्वांचे चेहरे प्रफुल्लीत झाले होते. स्वेरीने ‘रोटी डे’ च्या रूपाने हा अदभूत कार्यक्रम साजरा केला. पैशाचा अपव्यय न करता वेळ आणि पैसा सत्कारणी लावला तो ‘स्वेरी’ने! याचीच चर्चा दिवसभर पंढरपूर पंचक्रोशीत होत आहे. खरंच, अनुकरण करण्यासारखे आणि प्रेरणादायी उपक्रम केला स्वेरीने ! आजकाल अफाट खर्च करून वाढदिवस साजरा करतात अशांना स्वेरीने केलेला हा उपक्रम खूप काही शिकवून जाईल हे मात्र नक्की!

महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

-: कार्यालय :-

शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget