गोवा येथील ज्ञानेश्‍वर माऊली सांप्रदायाच्या वारकर्‍यांनी चकाचक केले चंद्रभागेचे वाळवंट व मंदिर परिसर....

Pandharpur LIVE 26 February 2019


महाराष्ट्रातील कांही स्वार्थी ह.भ.प. महाराजांनी यांचा आदर्श घ्यावा-गणेश अंकुशराव
श्री ज्ञानेश्‍वर माऊली वारकरी सांप्रदाय गोवा या वारकरी मंडळातर्फे दि. 24 फेब्रुवारी 2019 रोजी चंद्रभागेचे वाळवंट व घाट परिसर व मंदिर परिसराची चकचकीत स्वच्छता करण्यात आली. आपल्या राज्यातील कांही स्वार्थी ह.भ.प. महाराजांनी यांचा आदर्श घ्यावा असे मत महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे व्यक्त केले आहे. 📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.
 https://play.google.com/store/apps/details…

➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूर Mail- livepandharpur@gmail.com 
डिचोली, गोवा येथून एकुण 108 वारकर्‍यांचा गट पंढरी नगरीत दाखल झाला होता. या वारकर्‍यांनी पंढरी नगरीत पाऊल ठेवताच चक्क हातात झाडु घेऊन चंद्रभागेचे वाळवंट गाठले आणि अख्खा दिवस सर्वांनी मिळुन चंद्रभागेचे वाळवंट, मंदिर परिसर आणि घाट परिसराची स्वच्छता केली. या स्वच्छतेमुळे चंद्रभागेचे वाळवंट व घाट तसेच मंदिर  परिसर चकचीत झाला. विठ्ठलाच्या दर्शनाआधी या वारकर्‍यांनी चंद्रभागेची स्वच्छता करण्याला प्राधान्य दिले. श्री ज्ञानेश्‍वर माऊली वारकरी सांप्रदाय गोवा चे अध्यक्ष देवानंद नाईक, उपाध्यक्ष सुरेंद्र गाड, खजिनदार मुकुंद लामगावकर, सल्लागार प्रभाकर नाईक, डॉ.संजय तांबे, भगवान परब, प्रकाश सांगोडकर, सचिव चंद्रकांत वसकर, रविराज च्यारी यांच्या प्रयत्नातून संघटीत झालेले हे वारकरी सेवाभावी वृत्तीने भक्तीमय अंत:करणाने हे बहुमोल कार्य करत आहेत.  आषाढी एकादशीपासून या वारकरी सांप्रदायातर्फे पंढरपूरची पायी वारी सुरु करण्यात येणार असून यासाठीची नावनोंदणी सुरु करण्यात येणार आहे. या सर्व वारकर्‍यांचा सत्कार महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीने करण्यात आला. यावेळी गणेश अंकुशराव, पंच हरिभाऊ नेहतराव, उत्तम परचंडे, संपत सर्जे, अप्पा करकमकर, राजु कोळी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. 

 गोव्यातील या वारकरी संघटनेचे कार्य महान आहेच व पुढील वाटचालही योग्य दिशेने सुरु झाली आहे. निश्‍चितच गोव्यातील या वारकरी मंडळींचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. आपल्या राज्यातील कांही वारकरी संघटना मात्र मंदिर समितीवर सदस्य म्हणून वावरण्यासाठी व स्वत:चा स्वार्थ साधण्यासाठी विठ्ठल भक्तीचं ढोंग करतात अशा आपल्या येथील वारकरी संघटनांचे नेतृत्व करणार्‍या कांही संधीसाधु लबाड ह.भ.प. महाराज मंडळींनी आत्तातरी आपला स्वार्थ बाजुला ठेवुन गोव्यातील या वारकर्‍यांचा आदर्श अंगी बाळगावा. असे मत गणेश अंकुशराव यांनी व्यक्त केले आहे. 
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget