पंढरपूर नगरपरिषद चे वार्षीक अंदाजपत्रक सादर

Pandharpur LIVE 27 February 2019


             
सभेच्या प्रारंभी राष्ट्रगीत घेवुन पुलवामा हल्यात शहीद झालेले जवांनांना श्रद्धांजली अर्पन करण्यात आली. तसेच भारत सरकारने पाकिस्तान स्थित दहशदवादी अड्डे, ठिकाणी यावर नियंत्रण रेषा ओलांडुन वायुदला मार्फत सर्जीकल स्ट्राईक करुन दहशदवादी अड्यांचे ठिकाणचे अश्रय स्थान यावर हल्ला करुन ती ठिकाणे नष्ट केली या अतुलनीय शौर्या बद्दल भारत सरकार भारताची वायु सेना यांचे पंढरपूर शहरातील नागरीक व नगरपरिषदे तर्फे  अभिनंदनाचा प्रस्ताव मंजुर केला.तसेच स्वच्छ भारत सर्वेक्षण 2019 या योजने मध्ये नगरपरिषद पंढरपूर ने  सातत्यपुर्ण कामगीरी केल्या बद्दल केंद्र शासनाकडुन सन्मान चिन्ह दिले जाणार आहेत त्याबद्दल लोकप्रिय नगराध्यक्षा सौ साधानाताई नागेश भोसले, मुख्याधिकारी श्री.अभीजीत बापट सो,व नपाचे आरोग्य खात्याचे सर्व कर्मचारी यांचे अभिनंदनाचा प्रस्ताव मंजुर करण्यात आला. व विषयांकित कामकाजास प्रारंभ केला.सुरवातिस विशेष सदर सर्वसाधारण सभा दि.27-2-2019 रोजी मा नगराध्यक्ष सौ साधनाताई भोसले यांनी अंदाजपत्रक सभागृहास सादर केले

पंढरपूर नगरपरिषद सन 2019-20 चे पंढरपूर नगरपरिषदेचे वार्षीक अंदाजपत्रक सन 2019-2020 चे वार्षीत उत्पन्न प्रारंभिक शिलकेसह र.रु.124,54,2890/- असून वार्षीक खर्च र.रु.124,51,99,235/- शिल्लकी अर्थसंकल्प अखेर शिल्लक  2,29,725/- चा शिल्लक अर्थसंकल्प  सादर केला यामध्ये  शासकीय परताव्याची वार्षीक मुद्दल व त्यावरील व्याजाचे हप्ते तरतूद केली आहे.चौदावा वित्त आयोग,वैशिष्ठ्यापूर्ण योजना विशेष वैशिष्ठ्यापूर्ण योजना नगरोत्थान (राज्य स्तर) नगरोत्थान(जिल्हा स्तर) रमाई आवास योजना श्रमसाफल्य योजना प्रधानमंत्री आवास योजना अग्निशमन सुरक्षा अभियान यमाई तलाव सुशोभिकरण,प्राथमिक सोयी सुविधा विकास योजना लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी सुधार योजना यांची तरतूद केली आहे.


📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.

➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com 

शहरात नागरीकांना आवश्यक सुविधा पुरविणेसाठी रस्ते दुरुस्ती नविन पाईप खरेदी रस्ते बांधणी नविन गटारे या कामासाठी  सन 2018-2019 मध्ये व सन 2019-20 मध्ये भरीव तरतूद करणेत आलेली आहे.तसेच शहर विकासासाठी नामसंकीर्तन सभागृह नाट्यगृहे बांधणे उद्यान विकास करणे पुतळ्यांची सुधारणा  व सुशोभिकरण करणे घनकचरा प्रकल्प राबविणे स्मशानभुमी सुधारणा करणे वाहन खरेदी करणे इत्यादीसाठी तरतूद करण्यात आलेली आहे.
सदर सभेस उपस्थित असलेले  गटनेते अनिल अभंगराव गुरुदास अभ्यंकर विरोधीनेते सुधीर धोत्रे  मुख्याधिकारी अभीजीत बापट व न.पाचे सर्व नगरसेवक कर्मचारीवर्ग  उपस्थित होते अंदाजपत्रकाबाबत  नगरसेवक यांनी सुचविलेल्या सुचनांचा निश्चितपणाणे अंतर्भाव करण्यांचा विचार केला जाईल असे मा.अध्यक्ष यांनी सभागृहास निवेदीत करुन,अशा प्रकारे चर्चाहोवुन अंदापत्रकास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.
सभेच्या विषयाचे वाचन श्री राजेंद्र देशपांडे व  अंदाजपत्रकाचे वाचन श्री गणेश धारुरकर यांनी केले.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget