यशस्वी नाही होता आले तर चालेल पण आई-वडीलांच्या नजरेत चांगला पुत्र व्हा - भुषण जगताप

Pandharpur LIVE 21 February 2019 

 
पंढरपूर सिंहगड मध्ये आयोजित व्याखानाचे व्याख्याते शिवश्री भुषण जगताप यांचा सन्मान करताना प्राचार्य डॉ. कैलाश करांडे
   पंढरपूर सिंहगड मध्ये 
“जगाव तर शिवबा सारखं मरावं तर शंभुराजे सारखं” या विषयांवर व्याख्यान
पंढरपूर (प्रतिनिधी) छत्रपती शिवाजी महाराजांच्या ४०० वर्षापूर्वीच्या माणसांमध्ये निष्टा होती. आज आपण थोर महापुरुषाच्या जयंत्या का साज-या करायच्या हा विचार आम्ही कधी करतो का? शिवजयंती साजरी एवढयासाठी साजरी करायची कि, शिवाजी महाराजाचे विचार हे समाजातील तळागाळातील लोकापर्यंत पोहले पाहिजेत. आज महाराष्ट्राची अवस्था खूप भयानक आहे हे आपल्या कोपर्डी प्रकरणावरून लक्षात येते. हाच का शिवबाचा महाराष्ट्र. अनेक अत्याचार होत आहेत. आधुनिक महाराष्ट्र आज असल्याचे दिसत नाही. महाराष्ट्र संस्कुतीचा विसर पडत चालला आहे. आपल्या महाराष्ट्राच्या मातीला फार मोठा इतिहास आहे. हे तुम्ही-आम्ही विसरून चालणार नाही. सद्या आरामात सुख लोकांना पाहिजे आहे. आरामी राहिलेला माणूस कधीच इतिहास घडवत नाही. जीवनात जे लोक यशस्वी होतात अश्या लोकांचा स्टो-या लिहल्या जातात, पूर्वीचा माणूस हा कष्टकरी होता म्हणून इतिहास घडला. शिवकालीन महाराष्ट्र आज नाही कारण शिवाजी महाराजांच्या काळात शेतक-यांना, मावळ्यांना सन्मान होता. म्हणून ते महाराजांसाठी मरण्यास तयार होते. काही नसताना स्वराज्य निर्माण केले. शिवाजी महाराज हे सर्वांबद्दल आदर असणारे राजे होते. ज्या जवानांनी भारत मातेसाठी बलिदान दिले आणि शेतक-यांमुळे आपणास अन्न मिळते यांचा आपण आदर केला पहिजे. झोपतानारोज संध्याकाळी सीमेवर आपल्या देशाचे संरक्षण करणा-या जवानांचे आणि शेतक-यांचे आभार मानले पाहिजेट कारण आज आपण त्यांच्या मुळेच सुखरूप आहोत. तुम्ही काहीही करा पण नीती सोडू नका. महाराष्ट्राच्या आत आत्मीतेसाठी  जीवन जगा. तुम्हाला कोणत्याही क्षेत्रात यशस्वी नाही होता आले तर चालेल तुम्ही तुमच्या आई-वडीलांच्या नजरेत चांगला  पुत्र व्हा असे मत पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात शिवश्री भुषण भास्कर जगताप यांनी व्यक्त केले.

📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.https://play.google.com/store/apps/details…➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com 
शिवजयंतीचे औचित्य साधून शिवव्याख्याते शिवश्री भुषण भास्कर जगताप (कराड) यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.  या व्याख्यानाचे उदघाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडेडॉ. रविंद्र व्यवहारेप्रा. अनिल निकमप्रा.नामदेव सावंतप्रा. शिवाजी पवार आदी मान्यवरांचे हस्ते सरस्वती पूजन करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
     
या व्याख्यानाच्या सुरुवातीस काश्मीर येथील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहिद झालेल्या जवानांना सिंहगड इन्स्टिट्यूट च्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. महाविद्यालयाच्या वतीने भुषण जगताप यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील प्रभाकर शिंदे, सतीश नवले सह सर्व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गुरुराज इनामदार यांनी केले तर उपस्थितांचे आभार कु. प्रशांत पाटील यांनी मानले.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget