पोलिस निरीक्षक दयानंद गावडे यांची पंढरपूर येथे नेमणूक करण्याची आदिम विकास परिषदेची मागणी

Pandharpur LIVE 23 February 2019




पंढरपूर (प्रतिनिधी)- पंढरपूर हे राज्यातील सर्वात मोठे तिर्थक्षेत्र आहे. त्याच बरोबर गुन्हेगारी क्षेत्र ही मोठ्या प्रमाणात आहे. यासाठी पंढरपूर शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी एका खमक्या पोलिस अधिकाऱ्याची पंढरपूर येथे नेमणूक होणे आवश्यक आहे. यापूर्वी पोलिस निरीक्षक दयानंद गावडे यांनी पंढरपूर शहर पोलिस स्टेशन, पंढरपूर तालुका पोलिस स्टेशन, श्री विठ्ठल मंदिर सुरक्षा विभाग येथे काम केलेले आहे.  त्यांनी पंढरपूर येथे नेमणूकीस असताना पंढरपूर शहरातील गुन्हेगारांवर कारवाई करीत चांगल्या प्रकारे कार्य केलेले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांची पंढरपूर येथे बदली करण्याची मागणी पंढरपूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.सागर कवडे यांच्याकडे आदिम विकास परिषदेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष नागेश अधटराव यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.
 https://play.google.com/store/apps/details…


➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com 


यावेळी नरेश जवंजाळ, उमेश साळुंखे, अक्षय कदम, विकी सगर, प्रकाश राऊत, धनंजय नांदरे, अनिकेत कांबळे यांच्यासह आदि उपस्थित होते.
निवेदनात असे म्हटले आहे की,   सध्या पोलिस निरीक्षक दयानंद गावडे यांची पुणे येथून सोलापूर ग्रामीण येथे बदली झालेली आहे. त्यामुळे पंढरपूर शहरात वाढलेली गुन्हेगारी, अवैध धंदे, रोडरोमिओ यासारखे अनेक प्रश्न आ वासून उभे आहेत. यासाठी पोलिस निरीक्षक दयानंद गावडे यांची पंढरपूर शहर पोलिस स्टेशन येथे नेमणूक होण्यासाठी आपल्या स्तरावरून प्रयत्न व्हावेत अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या निवेदनाची प्रत पोलिस अधिक्षक सोलापूर ग्रामीण यांना पाठविण्यात आली आहे.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget