भ्याड हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लष्कराला दिले पुर्ण स्वातंत्र्य... पाकिस्तानला सर्जिकल स्ट्राईकची धास्ती.. सीमेलगतच्या अतिरेकी अड्डे हलवले

पंढरपूर LIVE 17 फेब्रुवारी 2019


पुलवामा येथील भ्याड हल्ल्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लष्कराला पूर्णपणे स्वतंत्र्य दिले आहे. ये नया भारत है, हिशेब चुकता करणारच, पुलवामा हल्ल्याच्या गुन्हेगारांना शिक्षा मिळणारच, हा नवीन धोरण राबवणारा भारत आहे हे पाकिस्तानने विसरु नये, असे पाकिस्तानला ठणकावले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोकळीक दिल्यानंर लष्करानेही या भ्याड हल्ल्याचा बदला घेण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. भारताची तयारी पाहून पाकिस्तानमध्ये चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे धास्तावलेल्या पाकिस्तानने सीमेलगतच्या अतिरेकी अड्ड्यांना लष्कर कँपजवळ हलवलं आहे. दरम्यान, नियंत्रण रेषेपलिकडे असलेल्या दहशतवाद्यांच्या लॉन्च पॅडवर कारवाई करण्याचा भारताची इरादा नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

उरी हल्यानंतर संतापलेल्या भारताने पाकिस्तानमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक केला होता. आता पुलवामा हल्यानंतर पाकिस्तान आणि दहशतावाद्याविरोधात भारत कडक कारवाई करणार असे संकेत मिळत आहेत. त्यामुळे पाकिस्तानला सर्जिकल स्ट्राईकची चांगलीच धास्ती लागली आहे. सीमेलगतच्या अतिरेकी अड्ड्यांना लष्कर कँपजवळ हलवण्यात आल्याचे वृत्त आहे. सीमारेषेच्या दोन्ही बाजूला सध्या तणावाचे वातावरण आहे.


१४ फेब्रुवारी रोजी तब्बल ३५० किलो स्फोटकांनी भरलेल्या ट्रकद्वारे जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्याने पुलवामा जिल्ह्यात चढवलेल्या भीषण आत्मघातकी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ४० जवान शहीद झाले असून २० जखमी झाले आहेत. गेल्या दोन दशकांतील हा सर्वात मोठा हल्ला आहे.  पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारतामध्ये संतापाची लाट उसळली आहे तर जगभरात याचा निषेध केला जात आहे.

महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 36 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

-: कार्यालय :-

शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget