थ्रीडी फोटोकेमिकल मशीनचे स्वेरीत उदघाटन

Pandharpur LIVE 24 February 2019पंढरपूर-गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँण्ड रिसर्च इन्स्टिट्युट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी अधिष्ठाता म्हणून कार्यरत असलेले डॉ. अभय उत्पात यांच्या संशोधन प्रकल्पाला जून २०१८ मध्ये २७ लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. प्रकल्पाच्या संशोधनासाठी अत्यंत आवश्यक असणारे  थ्रीडी फोटोकेमिकल मशीन नुकतीच दाखल झाली असून मशीनचे उदघाटन बी.ए.आर.सी.चे शास्त्रज्ञ डॉ. बालासुब्रमन्यम यांच्या हस्ते  करण्यात आले.
📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.
 https://play.google.com/store/apps/details…

➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com 
केंद्र शासनाच्या डिपार्टमेंट ऑफ अॅटॉमिक एनर्जी (DAE)अंतर्गत बोर्ड ऑफ रिसर्च इन न्युक्लिअर सायन्स (BRNS) तर्फे श्री विठ्ठल अभियांत्रिकीच्या मेकॅनिकल इंजिनीअरिंगमधील संशोधक डॉ. अभय उत्पात यांच्या प्रकल्पाला जून २०१८ दरम्यान सुमारे २७ लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. डॉ. अभय उत्पात यांच्या बरोबर सहसंशोधक म्हणून संस्थापक सचिव आणि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे व डिप्लोमा अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. एन. डी. मिसाळ हे देखील कार्यरत आहेत . यासाठी एकूण तीन वर्षाचा  कालावधी लागणार असून साधारण आणखी दोन वर्षात हा प्रकल्प पूर्ण होईल. फोटोकेमिकल मशिनच्या सहाय्याने मेटलवर सूक्ष्म चॅनेल बनविता येतात, या मशीनद्वारे मेटलवर अत्यंत बारीक नक्षीकाम करता येते. आजपर्यंत टूडी चे बरेच प्रयोग झालेले आहेत. थ्रीडी पार्टवर फोटोकेमिकल मशिनिंग तंत्रज्ञान वापरून हा प्रकल्प पूर्ण करण्यात येत आहे. प्रायव्हेट कॉलेजमध्ये असा प्रयोग करण्याची ही देशातील पहिलीच वेळ आहे. याप्रसंगी स्वेरीचे संस्थापक सचिव आणि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे, संस्थेचे अध्यक्ष प्रा. सी. बी. नाडगौडा, विश्वस्त बी.डी. रोंगे, शैक्षणिक अधिष्ठांता डॉ. प्रशांत पवार, संशोधन अधिष्ठांता डॉ. ए.बी. शिंदे यांच्यासह महाविद्यालयाचे प्राध्यापक वर्ग उपस्थित होते.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget