उंबरे येथे शिवजयंतीनिमित्त साकारली किल्ले सिंहगडची भव्य प्रतिकृती... दुर्मिळ ऐतिहासिक चित्रे-पत्रांचे प्रदर्शन

Pandharpur LIVE 21 February 2019


पंढरपूर तालुक्यातील उंबरे येथे शिवजयंतीनिमित्त किल्ले सिंहगड ची भव्य प्रतिकृती साकारण्यात आली होती. जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा उंबरेपागे ता.पंढरपूर येथे शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या औचित्याने ऐतिहासिक चित्रं-पत्रं प्रदर्शन भरविण्यात आले होते. नानासाहेब इंगळे (तालुकाध्यक्ष प्रहार शेतकरी संघटना) यांच्या शुभहस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. भारतदादा वावरे  (मा.सरपंच), शहाजी मुळे (जिल्हा युवक उपाध्यक्ष,रा.काँ.) यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी दिपक ढोबळे,राहुल मुजमुले, सत्यवान मुळे,बापू कोठावदे, प्रमोद चिद्रेवार यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते. उपस्थित सर्वांचे आभार मुख्याध्यापक खाजप्पा बनसोडे सरांनी मानले.📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.https://play.google.com/store/apps/details…➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com 

विद्यार्थ्यांना इतिहासाची गोडी लागावी,सामाजिक सांस्कृतिक वारसा जोपासण्याची जाणीव जागृती व्हावी, गडकिल्ले हे प्रेरणास्थळे आहेत त्यापासून प्रेरणा घ्यावी. तसेच तत्कालीन महापुरुषांच्या दूरदृष्टीचा, राजनीतीचा,स्थापत्यशास्त्राचा विद्यार्थ्यांना परिचय व्हावा म्हणून भव्य अशी सिंहगडाची प्रतिकृती बनविण्यात आली. संतोष चव्हाण सर, संजय गर्जे सर यांनी  विद्यार्थ्यांच्या मदतीने दगड-मातीपासून हुबेहूब किल्याची प्रतिकृती बनविली. किल्ला बनविण्यासाठी तीन दिवस लागल्याची माहिती चव्हाण व गर्जे सरांनी दिली. सिंहगडावरील सर्व बाबी या किल्ल्यामध्ये प्रतिकृतीच्या रूपाने दाखविण्यात आल्यात. 

 ऐतिहासिक चित्रे-पत्रांचा अनमोल खजिना याठिकाणी पाहण्यासाठी उपलब्ध आहे. उपस्थित सर्वांना या उपक्रमाचा उद्देश सांगुन सिंहगडावरील पराक्रमाची माहिती,इतिहास विशद करण्यात आला. हे प्रदर्शन 23 तारखेपर्यंत खुले असणार आहे. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

मोलाचे सहकार्य-अमर इंगळे, उपाध्यक्ष भिमराव देशमुख, चांगदेव अधटराव

Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget