पंढरीत सुवर्ण उत्सवाचे थाटात उद्घाटन... चंदुकाका सराफ एक सुवर्ण विश्वास- सुधाकरपंत परिचारक,

Pandharpur LIVE 23 February 2019

प्रदर्शनाचे उद्घाटन आणि दीप प्रज्वलन करताना राज्य परिवहन मंडळाचे मा. अध्यक्ष मा. सुधाकरपंत परिचारक, आ. भारत नाना भालके, नगराध्यक्ष सौ. साधनाताई भोसले, चंदूकाका सराफ पेढीचे कार्यकारी संचालक किशोरभाई शहा, डॉ. राजेश फडे, पालवी संस्थेच्या सौ. डिम्पल घाटगे-शहा आणि उपस्थित मान्यवर

 पंढरपूर:- प्रतिनिधी महाराष्ट्रातील सोने चांदी आणि हिऱ्यांचे सुप्रसिद्ध व्यापारी चंदूकाका सराफ म्हणजे एक सुवर्ण विश्वास असल्याचे मत पंढरपूरचे माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांनी व्यक्त केले. चंदूकाका सराफ आणि सन्स यांनी पंढरपूर येथे आयोजित केलेल्या सोने व हिऱ्यांच्या लक्षवेधी दागिन्यांच्या प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते यावेळी आमदार भारत भालके पंढरपूरच्या नगराध्यक्ष सौ साधना भोसले चंदूकाका सराफ आणि सन्स चे चेअरमन किशोर शहा , डॉक्टर राजेश फडे आदी मान्यवर उपस्थित होते.  सोने,चांदी ,जडजवाहीर आणि हिर्‍यांचे प्रसिद्ध व्यापारी चंदूकाका सराफ यांनी पंढरपूर मध्ये सोन्याच्या आणि हिर्‍यांच्या दागिन्यांचे भव्य प्रदर्शन आणि विक्रीचा शुभारंभ केला आहे. येथील लक्ष्मी पथ रोडवरील डॉक्टर फडे नर्सिंग होम यांच्या भव्य इमारती मध्ये हे प्रदर्शन भरविले गेले आहे
📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.
 https://play.google.com/store/apps/details…

➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com 


या प्रदर्शनाचे उद्घाटन, शनिवार दिनांक 23 फेब्रुवारी रोजी मोठ्या थाटात करण्यात आले. दक्षिण काशी पंढरीत हे प्रदर्शन भरविले याबद्दल चंदूकाका सराफ आणि सन्स चे आमदार भालके यांनी यावेळी अभिनंदन केले. सुमारे दोनशे वर्षाकडे वाटचाल करून सुवर्ण व्यवसायाची परंपरा जपणाऱ्या चंदूकाका सराफ  पेढीने भरविलेल्या या प्रदर्शनात मनमोहक सुवर्ण  मोहनमाळ, चोकर, डायमंड अंगठी, सोन्याची अंगठी,विविध डिझाईनचे  मंगळसूत्राचे  कलेक्शन,  बांगडी, ठूशी,आदीं  तीन हजार रुपयांपासून सुमारे दोन लाख रुपये किंमती पर्यंतचे सोने तसेच डायमंडचे कलाकुसर असणारे दागिने उपलब्ध करून दिले आहेत.हे प्रदर्शन पाहण्यासाठी प्रदर्शनाच्या उद्घाटनापासून नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. या प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी चंदूकाका सराफ आणि संस्थेच्या वतीने येथील एड्स ग्रस्तांसाठी काम करणाऱ्या पालवी या संस्थेत 25 हजार रुपयांचा धनादेश शहा व भालके यांच्या वतीने  सुपूर्द करण्यात आला.  सुवर्ण व्यवसायातील अग्रगण्य असणाऱ्या चंदूकाका सराफ आणि सन्स यांनी भरवलेल्या या प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती नोंदवली. समारंभास पालवी संस्थेच्या सौ डिंपल घाडगे, सौ नेहा किशोर शहा,संचालक किशोर शहा,अतुल शहा, सौ.संगीता शहा,  डाॅक्टर सौ.सपना फडे, आदींसह शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चंदूकाका सराफ पेढीच्या सदस्यांनी परीश्रम घेतले.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget