मनाचे श्लोक सामुहिक पठणातून ११ हजार ६३१ विद्यार्थ्यांनी केला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डकरीता प्रयत्न

Pandharpur LIVE 23 February 2019


Video News


निनाद पुणे, ओरायन स्टुडियोज, समर्थ व्यासपीठ आणि द्वारिका साऊंड, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने श्री रामदास स्वामी यांनी लिहिलेल्या मनाच्या श्लोकांच्या सामुदायिक पठणाच्या अनोख्या उपक्रमाचे पुण्यात आयोजन ; पुण्यातील ६४ शाळांतील विद्यार्थ्यांचा सहभाग 

पुणे : मना सज्जना भक्ती पंथेची जावे... या मनाच्या श्लोकातील स्वरांनी ११ हजार ६३१ विद्यार्थ्यांनी मनाचे श्लोक सामुहिक पठणातून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डकरीता प्रयत्न केला. जय जय रघुवीर समर्थ... हा जयघोष आसमंतात दुमदुमला आणि जागतिक विक्रमाच्या या उपक्रमाचे साक्षीदार होण्याची संधी हजारो पुणेकरांनी अनुभवली. पुणे शहर आणि उपनगरांतील ६४ शाळांमधील विद्यार्थी सहभागी झाले होते.  

निमित्त होते, निनाद पुणे, ओरायन स्टुडिओज, समर्थ व्यासपीठ आणि द्वारिका साऊंड, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यातील टिळक रस्त्यावरील सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित ११ हजार ६३१ शालेय विद्यार्थ्यांच्या श्री मनाचे श्लोक पठणाच्या उपक्रमाचे. उपक्रमाचे मुख्य संयोजक निनाद पुणेचे अध्यक्ष उदय जोशी, ओरायन स्टुडियोजचे आशिष केसकर, समर्थ व्यासपीठ पुणेचे डॉ.राम साठये, द्वारिका साऊंड पुणेचे बाबा शिंदे यांनी आयोजन केले होते. 
📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.
 https://play.google.com/store/apps/details…

➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com 


समर्थ व्यासपीठ पुणेचे डॉ.राम साठये यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम झाला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी उपयुक्त निवडक २१ मनाचे श्लोक व पाठाची निर्मीती मनशक्ती संस्थेने केली. तसेच या संस्थेचे मयूर चंदने गिनीज विक्रमाचे साक्षीदार म्हणून उपस्थित होते. संगीतकार आशिष केसकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व  विद्यार्थ्यांनी २१ मनाचे श्लोक सादर केले. जागतिक विक्रमासाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड व संस्थांशी समन्वयक म्हणून मिलिंद वेर्लेकर यांनी काम पाहिले. यावेळी भगवे झेंडे हातात घेऊन विद्यार्थ्यांनी जय जय रघुवीर समर्थ... चा जयघोष केला. तसेच झेंडे हातात घेऊन पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यातील शहिदांना आदरांजली देखील अर्पण केली. 
सर्व सहभागी विद्यार्थ्यांना बसण्याकरीता खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली होती. तर, प्रत्येक विद्यार्थ्यांना लावलेले स्टिकर स्कॅन करुन आतमध्ये सोडण्यात येत होते. याद्वारे सहभागी विद्यार्थ्यांच्या संख्येची अचूक मोजणी करण्यात आली. गिनीज व्यवस्थापनाकडून या उपक्रमाबाबतचे अधिकृत पत्र प्राप्त झाले असून त्यातील नियम व अटींचे पालन करुन कार्यक्रमाचा आराखडा तयार करण्यात आला होता. याशिवाय अग्निशामक दल, रुग्णवाहिका, स्वच्छतागृहे यांसह प्रेक्षकांना बसण्याकरीता देखील स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात आली.  

Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget