२५ रोजी राज्यव्यापी इंग्रजी शाळा बंद आंदोलन

Pandharpur LIVE 21 February 2019


आरटीई प्रवेश शुल्क अदा करण्याची मागणी...

परभणी:- शिक्षण संचालनालयाने आरटीई प्रवेशासाठी २५ फेब्रुवारीपासून अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे. परंतु, इंडीपेंडन्ट इंग्लिश स्कूल असोसिएशन ( ईसा ) संघटनेशी सलग्नित शाळांनी थकीत फी परताव्याच्या मागणी करिता २५ फेब्रुवारीलाच राज्यव्यापी शाळा बंद आंदोलनाचा इशारा अप्रत्यक्षरित्या शिक्षण विभागाला आव्हान दिले आहे.

Video Advert


📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.https://play.google.com/store/apps/details…➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com 

राज्य शासन आरटीई २५ टक्के प्रवेशाचा फी परतावा करण्यात अपयशी ठरलेले आहे. गेल्या ४-५ वर्षात थकीत फी परतावा दिला नाही मात्र आता फी परतावा देताना त्यांची पात्रता तपासणी करणे म्हणजे इंग्रजी शाळावर अन्याय आहे. यासाठीचा शासनाने १ नोव्हेंबर १८ रोजी एका आदेशाद्वारे जाचक अटी लादलेला शासननिर्णय तात्काळ मागे घेण्यात यावा. त्याचप्रमाणे राज्यातील सर्व शाळासाठी शाळा सुरक्षा कायदा आणावा , १८ नोव्हेंबर २०१३ च्या शासन आदेशात दुरुस्ती करावी, शालेय वाहतुकीसंदर्भात मुख्याध्यापकांऐवजी वाहतूक व्यवस्थापकावर जबाबदारी सोपवावी , स्वयं अर्थ सहाय्यीत तत्वावर दर्जा वाढ प्रस्तावासाठी ऑनलाईन प्रक्रिया लवकरात लवकर सुरु करावी.
आदी विविध मागण्यासाठी २५ रोजी राज्यव्यापी शाळा बंद अनोदालन केले जाईल. यात राज्यातील ४४०० इंग्रजी माध्यमांच्या शाळा सहभागी होतील. या आंदोलनात परभणी जिल्यातील जास्तीत जास्त शाळांनी सहभागी व्हावे. असे आवाहन ईसा संघटनेचे कार्यकारणी सदस्य तथा प्री-स्कूल व अकॅडमीक प्रमुख डॉ. संजय रोडगे , ईसा संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पौळ, शाईन शैख, प्रेमचंद आच्छा व लीना चीलवंत यांनी केले.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget