वेडात मराठे वीर दौडले सात... नाट्यातून उलगडला इतिहास

Pandharpur LIVE 21 February 2019


श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळतर्फे शिवजयंतीनिमित्त जीवंत देखावा

Video News

पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म... त्यांचे बालपण... तानाजी मालुसरे-शिवाजी महाराज भेट... बहलोलखानाने स्वराज्यात घातलेला धुमाकुळ... बहलोल खानास धुळीस मिळवा महाराजांचे फर्मान... प्रतापराव गुजर यांनी केलेला गनिमीकावा... बहलोल खानाची शरणागती व प्रतापरावांनी पाळलेला शिपाईधर्म... बहलोल खानाला मारल्याशिवाय तोंड दाखवू नका महाराजांनी केलेला आदेश...  बहलोल खानची छावणी जवळच असल्याची खबर... आणि अशातच आपल्या सहा सरदांबरोबर प्रतापरावांनी केलेली चढाई... अशा चित्तथरारक प्रसंगातून 50 कलाकारांनी वेडात मराठे वीर दौडले सात हा देखावा प्रत्यक्ष उभा केला.

📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.https://play.google.com/store/apps/details…➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com 

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्यावतीने कोतवाल चावडी येथे शिवजयंती उत्सवानिमित्त वेडात मराठे वीर दौडले सात या जीवंत देखाव्याचे आयोजन करण्यात आले होते. उत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी दक्षिण प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर, ट्रस्टचे सुनील रासने, महेश सूर्यवंशी, हेमंत रासने, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, यतिश रासने, सचिन आखाडे, मंगेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते. उत्सवाचे 77 वे वर्ष होते. महानाटयापूर्वी नादब्रह्म ढोल-ताशा ध्वज पथक ट्रस्ट, पुणे यांचे ढोल-ताशा वादन रद्द करून ट्रस्टचे कार्यकर्ते व पथकातील वादकांनी पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफ जवानांना दीपमानवंदना दिली. 
रवींद्र सेनगावकर म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगी असलेला एक गुण जरी सर्वांनी आचरणात आणली तर ती त्यांना खरी आदरांजली ठरेल. नुकत्याच पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याबद्दल ते म्हणाले, सीआरपीएफ जवानांनी दिलेले हे सर्वोच्च बलिदान आहे. सर्वांनी एकत्र येऊन सरकार जे पाऊल उचलेल त्याच्या पाठिशी उभे राहणे आवश्यक आहे. शहिदांच्या बलिदानाचे विस्मरण होता कामा नये. 
 सुमारे 40 बाय 45 फूट आकाराच्या दुमजली रंगमंचावर सदाशिव पेठेतील श्रीमंत शिवसाई प्रतिष्ठानच्या कलाकारांनी आपली कला सादर केली. महेंद्र महाडिक या नाट्याचे लेखन, महेश रांजणे यांनी नेपथ्य आणि राहुल सुरते यांनी रंगभूषा केली. याकरिता प्रतिष्ठानचे संस्थापक गणेश लोणारे, अतुल दळवी यांनी विशेष मेहनत घेतली.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget