मराठा महासंघाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

Pandharpur LIVE 21 February 2019 


Video Advert

पंढरपूर-अखिल भारतीय मराठा महासंघ पंढरपूर शहर व तालुका यांच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी  करण्यात आली.  शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पंढरपूर-मंगळवेढा तालुक्याचे आमदार  भारत नाना भालके व माता भगिनींच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.तसेच आजी माजी सैनिकांचा सन्मान, कॉटेज हॉस्पिटलमधिल परिचारिकांचा(नर्स)सन्मान, नगरपालिका सफाई महिला कर्मचारी यांचा सन्मान, मराठा महासंघाच्या माजी शहराध्यक्ष व तालुकाध्यक्षांचा सन्मान,राष्ट्रकुल स्पर्धेत पदक मिळवले बद्दल मानसी महाडिक यांच्या सह उपस्थित प्रमुख पाहुणेंचा सन्मान करण्यात आला. 
📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.https://play.google.com/store/apps/details…➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com 

याप्रसंगी शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहून, दहशतवाद्यांचा(पाकिस्तानचा)जाहीर निषेध करण्यात आला. यानंतर माता, भगिनींसह, पुरुषांना,लहान शिवभक्तांना डोक्याला मानाचा भगवा फेटा बांधुन शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य पालखी सोहळा काढण्यात आला.यामध्ये *सनई,चौघडा,बैलगाडी,घोडे,पारंपारिक वाद्य,पारंपारिक वेशभूषा,मर्दानी खेळ, देखावे,हत्तीवर शिवरायांच्या वेशभूषेत शिवभक्त हभप रविंद्र महाराज काळे असून,महिला व पुरुष डोक्याला भगवा फेटा बांधून,शिवरायांच्या जयघोषात,शिवमय वातावरणात सहकुटूंब सहपरिवार भव्य दिव्य पालखी सोहळा  पंढरपूर शहरातून  काढण्यात आला.

पालखी सोहळ्याची  गांधी रोड येथून सुरवात  शिवाजी चौक,सावरकर पुतळा,इंदिरा गांधी चौक,भोसले चौक,अर्बन बँक,भादुले हौद,नाथ चौक ते गांधी रोड येथे समाप्त. 
याप्रसंगी आमदार भारतनाना भालके,मराठा महासंघाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष मा श्री अर्जुनराव चव्हाण,जिल्हाउपाध्यक्ष सचिन गंगथडे,मार्गदर्षक सतिश धनवे सर,जिल्हा सचिव गुरूदास गुटाळ,तालुकाध्यक्ष संतोष जाधव,तालुका उपाध्यक्ष प्रशांत नागणे,शहराअध्यक्ष अमोल पवार,शहर उपाध्यक्ष शामराव साळुंखे,शहर संघटक काका यादव,रिक्षा संघटना शहराअध्यक्ष नागेश गायकवाड,रिक्षा संघटना शहर उपाध्यक्ष यशवंत बागल,रिक्षा संघटना शहर सचिव प्रमोद कोडग,संतोष गंगथडे सर ,अनंत नाईकनवरे साहेब,महिला आघाडीच्या तालुका अध्यक्षा प्रा रजणी जाधव,तालुका उपाध्यक्षा सौ प्रभावती गायकवाड,शहराअध्यक्षा डॉ संगीता पाटील,युवती संघटना शहराअध्यक्षा अ‍ॅड प्राजक्ता शिंदे,सौ थोरवत,सागर सावंत,राहुल थिटे,अनिल बाबर, पांडुरंग शिंदे,महेश बोडके,प्रविण व्यवहारे, प्रणव गायकवाड,लखन चव्हाण, रोहित चव्हाण,जीवन गायकवाड,चरण गायकवाड, उमेश क्षीरसागर,सोमनाथ पवार,विकास चव्हाण, विलास मोरे,अजिंक्य पवार,अविनाश गिड्डे,अतुल काकडे,जगदाळे,शिंदे यांच्यासह या शिवजन्मोत्सव पालखी सोहळ्यात सहपरिवार सहकुटूंब,माता भगिनी,लहान मोठे  शिवभक्त तसेच बाल शिवभक्त छत्रपती शिवराय,शंभूराजे,राजमाता जिजाऊ यांच्या वेशभूषेत आले होते. शिवभक्त,मराठा महासंघाचे पदाधिकारी कार्यकर्ते  मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget