आमदार प्रशांत परिचारक यांचे निलंबन मागे...

Pandharpur LIVE 28 February 2019


सीमेवर लढणाऱ्या जवानांच्या पत्नींबाबत आक्षेपार्ह आणि संतापजनक वक्तव्य करणारे विधानपरिषदेतील भाजपाचे सहयोगी आमदार प्रशांत परिचारक यांचे बुधवारी निलंबन मागे घेण्यात आले आहे. स्थानिक स्वराज्य संस्था आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचारादरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरमधील भोसे येथे उमेदवाराच्या प्रचारसभेत, विरोधकांवर टीका करताना सीमेवर लढणाऱ्या जवानांबाबत परिचारक यांनी अपमानास्पद वक्तव्य केले होते.

📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.

➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com 


‘पंजाबमधील सैनिक एकदाही घरी न येता वर्षभर सीमेवर लढत असतो आणि त्याला फोन येतो तुला मुलगा झाला, त्या आनंदात तो पेढे वाटतो. राजकारणही तसंच आहे,’ असे वादग्रस्त वक्तव्य परिचारक यांनी केले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर त्यांना टीकेला समोरे जावे लागले होते. त्यामुळे त्यांना विधान परिषदेतून निलंबित करण्यात आले होते.


Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget