स्वराज्याची स्थापना करून लोकशाहीची संकल्पना शिवरायांनी रूजविली-जैनुद्दीन मुलाणी

Pandharpur LIVE 24 February 2019


पंढरपूर (प्रतिनिधी) - छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जातीधर्माच्या मावळ्यांना एकत्र करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली व खऱ्या अर्थाने लोकशाहीची संकल्पना समाजात रूजविली. यामुळेच एक आदर्श राजा म्हणून छत्रपती शिवरायांचा लौकिक साऱ्या जगात पहावयास मिळत आहे, असे प्रतिपादन समाजसेवक व सा.युवा राष्ट्रचेतनाचे संपादक जैनुद्दीन मुलाणी यांनी केले.
नवरे (ता.माळशिरस) येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुरेश (बापू) पाटील हे होते.

यावेळी नेवरे ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.सुरेखा सुरेश पाटील, उपसरपंच अजिनाथ (बापू) पाटील, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मारूती भगत, उपाध्यक्ष हुसेन शेख, पोलिस पाटील पांडुरंग पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष राजू व्यवहारे, व्यवस्थापक व ग्रामपंचायत सदस्य प्रमोद व्यवहारे (नंदूनाना), मुख्याध्यापक शामराव खंकाळ, वृत्तपत्र लेखक संघटनेचे अध्यक्ष धनंजय नाईकनवरे, कृषी सहाय्यक सुनिल व्यवहारे, मुकुंद पाटील, उत्तरेश्वर सावंत, हणमंत तळेकर, सुहास पाटील, आयपोद्दीन तांबोळी, संजय जाधव यांच्यासह छावा यंग ग्रुप, टायगर ग्रुप, शिवराय प्रतिष्ठान, यल्लाम्मा देवी ग्रुप यांचे पदाधिकारी व मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.
📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.
 https://play.google.com/store/apps/details…

➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com 
प्रारंभी काश्मीरच्या पुलवामा भागात झालेल्या अतिरेक्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व उपस्थित मान्यवरांच्याहस्ते करण्यात आले. या आधी नेवरे गावातून छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे भव्यदिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी भोसले व शेकदार या विद्यार्थ्यानी  शिवरायांचा पोवाडा सादर केला. याला संगीताची साथ लक्ष्मण साठे यांनी दिली. यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन व कार्य याविषयी शुवांगी खटके, शुभांगी सावंत, संकेत भोसले, अंकीता जानकर, नाजनीन मुलाणी या विद्यार्थ्यांनी आपल्या वक्तृत्व कलेने उपस्थितांची मने जिंकली. यावेळी शिवजयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुणे जैनुद्दीन मुलाणी यांच्याहस्ते बक्षीसे देण्यात आली.  अल्पोपहार व खाऊ वाटपासाठी सहकार महर्षींचे संचालक सुरेश (बापू) पाटील, छावा यंग ग्रुप, टायगर ग्रुप, शिवराय प्रतिष्ठान, यल्लम्मादेवी ग्रुप व ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभले.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संग्राम दळवी यांनी केले तर आभार मुख्याध्यापक शामराव खंकाळ यांनी मानले. या कार्यक्रमासाठी विद्यार्थी, विद्यार्थीनी, शिक्षक, पालक, विविध संस्थांचे व संघटनांचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक शामराव खंकाळ, संग्राम दळवी, विलास घाडगे, बाळासाहेब कांबळे, राजाराम खटके, सत्यवान गायकवाड, विश्वजीत गमे, लोखंडे गुरूजी, संतोष यादव, तुकाराम कचरे, सचिन जाधव, सचिनकुमार कारंडे, अमोल पाटील या शिक्षकांनी परिश्रम घेतले.
फोटोओळ - नवरे (ता.माळशिरस) येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात बक्षीस वितरण करताना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जैनुद्दीन मुलाणी. यावेळी सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुरेश (बापू) पाटील, उपसरपंच अजिनाथ (बापू) पाटील, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मारूती भगत, उपाध्यक्ष हुसेन शेख, पोलिस पाटील पांडुरंग पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष राजू व्यवहारे, व्यवस्थापक व ग्रामपंचायत सदस्य प्रमोद व्यवहारे (नंदूनाना), मुख्याध्यापक शामराव खंकाळ, वृत्तपत्र लेखक संघटनेचे अध्यक्ष धनंजय नाईकनवरे आदि मान्यवर.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget