पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात संपन्न

Pandharpur LIVE 24 February 2019 

   पंढरपूर (प्रतिनिधीकोर्टी (तापंढरपूरयेथील येथील एसकेएनसिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयात २४ फेब्रवारी “माजी विद्यार्थी” मेळावा आयोजित करण्यात आला होता,हा मेळावा मोठ्या उत्सहात संपन्न झाला असल्याची माहिती महाविद्यालयांचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.

   या मेळाव्याचे उद्घाटन महाविद्यालयांचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, डॉ चेतन पिसे, डॉ. रविंद्र व्यवहारे डॉ. संपत देशमुख, प्रा. समीर कटेकर विद्यार्थी प्रतिनिधी वैष्णवी उत्पात, विजय तळेकर आदी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करून  दीप प्रज्वलनानेकार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.
 https://play.google.com/store/apps/details…

➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन सद्या आपले करिअर करीत असलेल्या माजी विद्यार्थी कु. वैष्णवी उत्पात, विजय तळेकर,सागर आवताडे, सुरज डोके, गुरुराज इनामदार,महेंद्र किरकोळ, महेश येडगे, नवनाथ शिंदे आदी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना महाविद्यालयात भवनांना मोकळी वाट करून दिली. महाविद्यालयाने आम्हाला नुसते शिक्षण दिले नाही तर संस्कार हि दिले आहे. या ज्ञानाच्या शिदोरीवर आज पर्यंत आम्ही खूप काही कमवू शकलो आहे.महाविद्यालयात दिलेल्या ज्ञानाच्या जोरावरच आम्ही आमच्या आयुष्याची प्रगती करत आहे. येथील सर्व शिक्षक  शिक्षकेत्तरकर्मचारी हे कमालीचे शिस्तप्रिय असून त्यांच्या मार्गदर्शनामुळे व सहकार्यामुळेच आम्ही आमच्या आयुष्यात यशस्वी वाटचाल करीत आहोत असे मत माजी विद्यार्थ्यांनी सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात बोलताना व्यक्त केले.
  महाविद्यालयाच्या वतीने उपस्थित माजी विद्यार्थ्यांना भोजन देण्यात आले. दुपारच्या सत्रात माजी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिककार्यक्रमांमधून डान्स, गायन समूह डान्स करून, तबला वादन आदी कला सादर करून आनंद घेतला. हा कार्यक्रम यशस्वीकरण्यासाठी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदित्य लाले व गिरीजा दामोदरे यांनी केले, तर आभार प्रा. सर्जेराव महारनवर यांनी मानले. माजी विद्यार्थी मेळावा हा कार्यक्रम प्रा. समीर कटेकर सह रोहित इनामदार, संतोष आगलावे, शिवगणेश डोंबे, सुरज पोहरे आदी सह अनेक विद्यार्थी सह महाविद्यालयातील सर्व शिक्षक  शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget