.
.
.

बंद असलेले वॉटर एटीएम तात्काळ सुरु करण्यात यावे.

पंढरपूर LIVE 16 फेब्रुवारी 2019


 अखिल भारतीय ग्राहक पंचायतीतर्फे विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेल्या वारकर्‍यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय पंढरपूर नगरपालिका व विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती यांच्यामार्फत पाण्याचे एटीएम मशीन्स उभारण्यात आले ते एटीएम मशीन्स बंद असल्य्याचे निदर्शनास आले असुन ते त्वरित चालू करण्यात यावे असे लेखी निवेदन पंढरपूर नगरपालिका व विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती यांना पंढरपूर तालुका सचिव आझाद अल्लापुरकर यांनी  दिले आहे.आज वर्षातील चार मोठ्या यात्रा भरतात यापैकी माघ एकादशी हि एक त्यानिमित्त पंढरपूर मध्ये आज दोन लाख भविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेले असून त्यांना पिण्याच्या पाण्याची सोय पंढरपूर नगरपालिका व विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती यांच्यामार्फत पाण्याचे एटीएम मशीन्स उभारण्यातआले. सध्या बंद आहे गेली तीन दिवस झाले भाविकांची संख्या वाढत आहेत. त्यामुळे उभारण्यात आलेल्या एटीएम बंद अवस्थेत असल्या कारणाने भाविकांना व्यापाऱ्यांनकडून पाण्याच्या बॉटल दहा ते पंधरा रुपयांमध्ये एक लिटर याप्रमणे बाटली याप्रमाणे विकत घ्यावी लागत आहे. आपण उभारण्यात आलेल्या एटीएम मधून एक रुपयाला एक लिटर पाणी अशी सोय करण्यात आली आहे. परंतु ती सद्यस्थितीला बंद असल्या कारणाने त्याचा लाभ भाविक घेऊ शकत नाही. त्याबद्दल भाविकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. भाविकांचे म्हणणे  आहे की, पंढरपूरमध्ये गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी भरपूर सुविधा आम्हाला मिळत असून त्याबद्दल आम्ही आभारी आहोत परंतु पिण्याच्या पाण्याबाबत ते म्हणतात कीअसून अडचण नसून खोळांबा”.


आपण त्वरित या एटीएम मशीन सुरू करून भाविकांना पिण्याच्या पाण्याची सोय करावी त्या एटीएम मशीन पुर्ववत चालू करण्यात याव्यात. अशी मागनी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे तालुका संघटक श्री विनय उपाध्ये व सचिव आझाद अल्लापुरकर यांनी केली आहे.

महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 36 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

-: कार्यालय :-

शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget