सहकारावर भारतीय अर्थव्यवस्था अवलंबून – सहकार भारतीचे संजय पाचपोर

Pandharpur LIVE 21 February 2019

 

    अखिल भारतीय सहकार भारतीचे संघटन मंत्री संजय पाचपोर यांची स्वेरीला सदिच्छा भेट
पंढरपूर- ‘सहकार क्षेत्राचे जाळे संपूर्ण भारतभर पसरले असून सहकाराच्या माध्यमातून भविष्यात आर्थिक उन्नतीसाठी‘विना संस्कार नाही सहकार, विना सहकार नाही उद्धार’ या ब्रीद वाक्याप्रमाणे सहकार क्षेत्रात भारतीय अर्थ व्यवस्था टिकून आहे. भारतात सहकारी संस्थांची चळवळ खूप दशके सुरू आहे. छोट्या गृहनिर्माण संस्था ते साखर कारखानादूध डेअरी अशी विविधांगी रूपे या प्रक्रियेतून आकाराला आली आहेत. केंद्र सरकारने देशभरातील सर्व राज्यांतील सहकार कायद्याला घटनात्मक अधिकार प्राप्त करून दिला.’ असे प्रतिपादन हैद्राबाद मधील अखिल भारतीय सहकार भारतीचे संघटन मंत्री संजय पाचपोर यानी केले.


📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.https://play.google.com/store/apps/details…➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com 
गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये सदिच्छा भेट देण्यासाठी सहकार भारतीचे आखिल भारतीय संघटन मंत्री संजय पाचपोर आले होते. त्यावेळी त्यांच्या समवेत चंद्रकांत धोंडे-पाटील, प्रशांत धोंडे-पाटील, पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री संतोष गायकवाड, सहकार भारतीचे तालुका प्रमुख वासुदेव बडवे यांच्यासह सहकार भरतीचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रारंभी स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. पी.रोंगे यांनी सहकार भारतीचे संघटन मंत्री संजय पाचपोर व सहकार भरतीचे इतर पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले. पुढे बोलताना पाचपोर म्हणाले की, ‘भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून आताच्या तरुण पिढीने सहकाराकडे पाहिले पाहिजे. यासाठी संस्कारीत सहकार कार्यकर्ते निर्माण करणे गरजेचे आहे. 
सहकाराच्या माध्यमातून बचत गट, दुध संकलन, पापड उद्योग अशी मोठी उद्योगधंदे भरभराटीस आलेली आहेत.’ असेही सांगितले. यावेळी मंत्री पाचपोर यांच्यासह उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व शेतकऱ्यांनी स्वेरी अंतर्गत असलेली महाविद्यालये,वसतिगृह, वाचनालय, संशोधन विभाग, येथील शिक्षण पद्धती, विविध विभाग, प्रयोगशाळा आदींची पाहणी करून सविस्तर माहिती जाणून घेतली. यावेळी पंढरपूर पंचक्रोशीतील जेष्ठ नागरिक व प्रगतशील शेतकरी, गोपाळपूरचे सरपंच शिवाजी आसबे, डॉ. विश्वासराव मोरे,संभाजी शिंदे (चळे), स्वेरी कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम.एम.पवार, सांस्कृतिक कार्यक्रम विभागाचे प्रमुख प्रा. करण पाटील,अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग आदी उपस्थित होते.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget