मातोश्री वृध्दाश्रम व गोपाळपूर ग्रामस्थांची नेत्रतपासणी व चश्म्यांचे वाटप... अंधत्व निवारण बहुउद्देशीय संस्थेचा उपक्रम

Pandharpur LIVE 24 February 2019अंधत्व निवारण बहुउद्देशीय संस्था, सोलापूर व डॉ. रवीस् आय क्लिनिक अ‍ॅन्ड ऑक्युप्लास्टी सेंटर, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने  मातोश्री वृध्दाश्रमातील अनेक आजी-आजोबांची व गोपाळपूर येथील अनेक ग्रामस्थांची नेत्रतपासणी करुन आवश्यक त्यांना चश्म्यांचे वाटप करण्यात आले. एकुण 200 जणांची नेत्रतपासणी करण्यात आली. यापैकी 35 जणांच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता असल्याचे आढळून आले तर 165 जणांना चश्म्यांचे वाटप करण्यात आले. लवकरच आवश्यक त्यांच्या डोळ्यांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेच्या वतीने टेक्नीशियन ऑप्टोमॅट्रीक व्यंकटेश रंगनाथ बोगा यांनी दिली. 
📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.
 https://play.google.com/store/apps/details…

➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com 

आज सकाळी 9 वाजता गोपाळपूर येथील ह.भ.प. तनुपरे महाराज संचलित मातोश्री वृध्दाश्रमात या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. टेक्नीशियन ऑप्टोमॅट्रीक व्यंकटेश रंगनाथ बोगा यांनी नेत्रतपासणी केली. कार्यक्रमाचे अध्यक्ष ओंकार बसवंती यांच्या शुभहस्ते आवश्यक त्यांना चश्म्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी वृध्दाश्रम व्यवस्थापक श्री.राक्षे व संध्या साखी यांची प्रमुख उपस्थिती होती.

हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी प्रियंका सावंत, अंजली पवार, अंबिका पाथरुट, उषा गायगवळी, सुवर्णा गोरे, प्रगती जगदाने, रोशन तालीकोटे, पवन पाथरुट इतर यांनी परिश्रम घेतले. 
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget