आजच्या पिढीला शिवाजी महाराजांच्या विचाराची व तत्तवाची गरज -डाँ.संतोष मुंडे

Pandharpur LIVE 21 February 2019


परळी वैजनाथ (प्रतिनिधी)  :- 
आजच्या पिढीला शिवाजी महाराजांच्या विचाराची व तत्तवाची गरज असे उद्गागार राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे. प्रदेश उपाध्यक्ष डाँ.संतोष मुंडे यांनी  शहरातील वडसावित्री भागातील ऊसतोड कामगार शाळा श्री नागनाथ निवासी  विद्यालयात बुधवार दि.20 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करतांना प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

  मराठवाडा ऊसतोड कामगार विकास मंडळ संचलित श्री नागनाथ निवासी विद्यालय मध्ये शिवछत्रपती शिवाजी राजे यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून तरुण ,तडफदार, दिव्यांगाचे वाली डॉ.संतोष मुंडे हे होते .यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये सतराव्या वर्षी स्वराज्य स्थापन करणारे एकमेव जे राजे होऊन गेले ते शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले. कुलपती ,चारित्र्यवान, पर्यावरणावर प्रेम करणारे, विज्ञानवादी ,विरोधकालाही हवेसे वाटणारे अशी शिवाजी महाराजांची ख्याती होती.या शाळे मधून डॉक्टर्स ,वकील, इंजिनिअर जरी होता नाही आले तरी चांगला माणूस नक्कीच व्हालअसा मला  पूर्णपणे आत्मविश्वास आहे .या शाळेतील पदाधिकारी आणि शिक्षक खूप मोठे कार्य करत आहेत असे विचार मांडून अनेक उदाहरणे देऊन मार्गदर्शन केले.


📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.https://play.google.com/store/apps/details…➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com 




यावेळी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.   यावेळी ओम दहिवाळ, भागवत कदम, श्रीनाथ राठोड यांनी शिवाजी महाराजांवर आपले विचार मांडले. तसेच विद्यार्थिनी अनुराधा पौळ, उषा मुंडे ,अश्विनी मुंड, स्वाती गायकवाड यांनी पोवाडे आणि शिवाजी महाराजांच्या विचारावर प्रकाश टाकला.
         यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री चव्हाण सर यांनी केले तर अध्यक्षीय समारोप मुख्याध्यापिका श्रीमती सातभाई आघाव मॅडम यांनी केला .त्यांनी आपल्या अध्यक्षीय समारोप मध्ये शिवाजीमहाराजां पूर्वी जवळजवळ साडेतीनशे वर्ष महाराष्ट्रात स्वराज्य नव्हते महाराष्ट्राचा बराच भाग अहमदनगरचा निजामशहा आणि आदिलशहा या दोन राज्यांनी वाटून घेतला होता. या दोघांचे कधीच जमत नव्हते. नेहमी युद्ध व्हायचे, रयत घबराटीचे, दहशतीच्या वातावरणात समाधानाने जगू शकत नव्हती. भारतीय सण साजरे करता येत नव्हते ,सगळीकडून शोषण होत होते. हे दृश्य पाहून जिजाबाईला राहवले नाही त्यांचे मन जेवढे कणखर होते तेवढेच कोमल ह्रदय गलबलून जात होते .त्यांनी स्वतः विचार करून मनाशी निश्चय केला आणि आपल्या कुलदेवतेला साकडे घातले की "आई ,मी एक वीर माता होऊ इच्छिते .माझ्या पोटी असा शूर वीर ,पुत्र दे जो स्वराज्याची स्थापना करू शकेल .तो देशात माजलेला हल्लाबोल दूर करेल. माझ्या पिढीत रयतेच्या रक्षणासाठी हा प्रसाद रुपी पुत्र माझ्या पोटी जन्माला घाल ".हे सर्व त्या कुलदैवतेने ऐकले आणि शिवाजी महाराजा सारखा वीर शूर योद्धा जन्माला आला आणि असे कार्य करून गेला की साडेतीनशे वर्ष झाले तरी आज आपल्याला शिवाजी महाराज आताचे वाटू लागतात ते त्यांच्या कार्यामुळे असे सांगितले.
             यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. संतोष मुंडे संस्थेचे सचिव अँड. सोनेराव सातभाई वस्तीग्रह अधीक्षिका श्रीमती सविता घुले मुख्याध्यापक श्री चव्हाण सर मुख्याध्यापिका श्रीमती सातभाई मॅडम सांस्कृतिक प्रमुख डीबी मुंडे सर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget