.
.
.

पुलवामा हल्ल्यातील हुतात्म्यांना श्रद्धांजली म्हणून १९ व २० फेब्रुवारी रोजी श्रीनाथ हॉस्पिटलमध्ये करणार मोफत रक्तदाब व मधुमेह तपासणी : डॉ. संतोष मुंडे

Pandharpur LIVE 18 February 2019


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) १४ फेब्रुवारी रोजी पुलवामा येथे हुतात्मा झालेल्या सैनिकांच्या ऋणातून आपण भारतीय नागरिक मुक्त होऊचं शकत नाही. मात्र, त्यांच्याप्रती जनसेवेतून ऋणनिर्देश व्यक्त करत श्रद्धांजली म्हणून येत्या मंगळवारी अर्थात शिवजयंतीचे (१९ फेब्रुवारी) औचित्य तसेच बुधवार (२० फेब्रुवारी) रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेदरम्यान जे कोणी व्यक्ती तपासणीसाठी श्रीनाथ हॉस्पिटलमध्ये जातील त्यांची मोफत रक्तदाब व मधुमेह तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. संतोष मुंडेंनी दिली आहे.

📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.https://play.google.com/store/apps/details…➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com 
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना. धनंजय मुंडेंच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे अत्यल्प प्रमाणात राजकारण व मोठ्या प्रमाणात समाजकारण करत असतात. डॉ. मुंडे सातत्याने दिव्यांग, विधवा, निराधार तसेच आजी-माजी सैनिकांना मदत करण्यासाठी कायम तयार असतात. याचाच एक भाग म्हणून डॉ. मुंडेंनी श्रीनाथ हॉस्पिटलमध्ये हुतात्मा सैनिकांना श्रद्धांजलीपर मोफत करून देण्याचा रक्तदाब व मधुमेह तपासणी करण्याचा संकल्प केला आहे.ज्यांना ज्यांना मोफत रक्तदाब व मधुमेह तपासणी करावयाची आहे त्यांनी त्यांच्या ओळखपत्राची (आधार कार्ड)झेरॉक्स सोबत आणावी. तसेच जे आधीच या किंवा इतर व्याधींनी त्रस्त आहेत त्यांनी त्यांचे जुने वैद्यकीय तपासणी अहवाल सोबत आणावेत असे आवाहन डॉ. संतोष मुंडेंनी केले आहे.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget