.
.
.

पुण्यातील गणेश मंडळांतर्फे पूलवामा हल्ल्यातील जवानांना श्रध्दांजली

पंढरपूर LIVE 16 फेब्रुवारी 2019


 
जय गणेश व्यासपीठ आणि पुण्यातील गणेशोत्सव मंडळांतर्फे जाहीर निषेध

पुणे : भारत माता की जय... जय हिंद अशा घोषणा देत जम्मू-काश्मीरच्या पूलवामा येथील मातृभूमीचे रक्षण करणा-या सीआरपीएफ जवानांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्याचा जय गणेश व्यासपीठ आणि पुण्यातील गणेशोत्सव मंडळांतर्फे जाहीर निषेध करण्यात आला. तसेच यावेळी भारतीय लष्कराच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहू, अशाप्रकारची शपथ देखील घेण्यात आली. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरासमोर पुण्यातील गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी आदरांजली अर्पण केली. परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त सुहास बावचे, विश्रामबाग विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिंदे, नावंदे, फोर्स १ चे जवान, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती मंडळ ट्रस्टचे अशोक गोडसे, सुनील रासने, महेश सुर्यवंशी, नगरसेवक हेमंत रासने, पराग ठाकूर, राजाभाऊ टिकार, आनंद सराफ, प्रवीण परदेशी, विवेक खटावकर, शिरीष मोहिते, रवींद्र अण्णा माळवदकर, नितीन पंडित, अनिरुद्ध गाडगीळ, रवींद्र पठारे, पीयुष शहा यांसह कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. 
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती मंडळ ट्रस्ट, अखिल मंडई मंडळ, कसबा गणपती ट्रस्ट, तांबडी जोगेश्वरी मंडळ, गुरुजी तालीम मंडळ, तुळशीबाग मंडळ, ढोल ताशा महासंघ, सैनिक मित्र परिवार, सेवा मित्र मंडळ ट्रस्ट, साईनाथ मंडळ ट्रस्ट, साखळीपीर मंडळ,  काळभैरवनाथ मंडळ, विंचुरकर वाडा मित्र मंडळ आदी मंडळांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 36 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

-: कार्यालय :-

शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget