करकंब मध्ये चोरट्यांची दहशत... तीक्ष्ण हत्याराने केले वार... दोन महिलांसह तीघेजण गंभीर जखमी... तीन ठिकाणी चोर्‍या... सोन्याच्या दागिण्यांसह एक लाखांची चोरी करुन चोरटे पसार

Pandharpur LIVE 25 February 2019

करकंब मध्ये आज पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी दहशत माजवली असून चोरट्यांनी तीक्ष्ण हत्याराने वार करत दोन महिलांसह तीघांना गंभीर जखमी केले आहे. तीन ठिकाणी चोर्‍या करुन सोन्याचे दागिणे रोख रक्कम मिळून एक लाखांची चोरी करुन चोरटे पसार झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे.   करकंब :-
   करकंब ता पंढरपूर येथील टेंभुर्णी रोड व्यवहारे वस्ती येथे आज पहाटेच्या सुमारास रहिमान इस्माईल कोरबू,अशोक गजेंद्र शेटे  तसेच अनिल अंकुश धायगुडे या वेगवेगळ्या तीन कुठूंबांच्या घरी अज्ञात चोरट्यांनी चोऱ्या करून यातील अनिल घायगुडे यांच्यासह पत्नी अश्विनी धायगुडे व आई विमल धायगुडे यांना गंभीर स्वरूपाची मारहाण केली असल्याची घटना घडली आहे.यामुळे करकंब व परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे
    याबाबातची सविस्तर माहिती अशी की टेंभुर्णी - पंढरपूर रोडवरिल व्यवहारे पाटीच्या दरम्यान वरील तिन्ही कुठूंबे एकमेकांपासून दीड ते दोन किलोमिटरच्या अंतरावर वास्तव्यास आहेत.यातील रहिमान कोरबू यांच्या घरी रात्रीच्या सुमारास घरातील सर्वजन एका खोलीत झोपलेले त्या खोलीला चोरट्यांनी बाहेरून काड्या लावल्या व  दुसऱ्या खोलीचे कड़ी कोयंडा उचकटुन एक तोळा सोन्याचे नेकलेस,गलसर आणि दीड तोळे सोन्याचे घंटन असे ऐकूण साडेतीन तोळे सोन्यासह रोख 15 हजार रु असा एकूण 67 हजार रु किमतिचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे.

📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.
 https://play.google.com/store/apps/details…

➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com 
   तसेच अशोक गजेंद्र शेटे यांच्या घरातील 1 तोळे सोन्यासह 5 हजार रु रोख रक्कम असा एकूण 35 हजार रु किमतिचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे.
   पुढे चोरट्यांनी आपला मोर्चा अनिल अंकुश धायगुडे यांच्या घराकडे वळवून घराचा दरवाजा उचकाटून घरामध्ये झोपलेले अनिल व त्यांच्या आई विमल धायगुडे,पत्नी अश्विनी धायगुडे यांना धारदार शास्त्राने मारहाण करून जखमी केले व चोरट्यांनी पळ काढला त्यानंतर धायगुडे कुटुंबाचा आरडाओरडा ऐकून जवळच असलेले त्यांचे बंधू अशोक घायगुडे यांनी अनिलच्या घराकडे धाव घेतली व घडलेल्या प्रकारची माहिती तेथून एक किमीच्या अंतरावर असलेल्या इतर बंधूंना फोन करून माहिती सांगितली व जखमी अवस्थेत असलेल्या धायगुडे कुटुंबियातील तिघांनाही करकंब येथे खाजगी रुग्णालयात दाखल केले परंतु जखमी असलेल्या तिघांच्याही डोकीत खोलवर जखमा असल्यामुळे प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी सोलापूर येथे हलविण्यात आले.घटनास्थळी करकंब पोलिसांसह,मोबाईल फॉरेन्सिक लॅब,श्वानपथक आणि आय बाइक अशी विविध पथकने दाखल झाली.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget