नाशिकच्या नुतन पोलीस आयुक्तपदी विश्वास नांगरे-पाटील

Pandharpur LIVE 25 February 2019

मुंबई:

नाशिकचे नवे पोलीस आयुक्त म्हणून कोल्हापूर परिक्षेत्राचे महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान आयुक्त रवींद्र सिंघल यांच्या बदलीमुळं रिक्त झालेल्या जागी त्यांची वर्णी लागली आहे. सिंघल यांना औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. नांगरे-पाटलांसह अन्य अनेक अधिकाऱ्यांचा यात समावेश आहे. विश्वास नांगरे-पाटील हे एक बेधडक पोलीस अधिकारी म्हणून ओळखले जातात. मुंबईवरील २६/११च्या हल्ल्यात त्यांनी विशेष कामगिरी बजावली होती. खडतर परिस्थितीतून आयपीएस झालेले नांगरे-पाटील हे त्यांच्या कामामुळं महाराष्ट्रातील तरुणांचे आयकॉन ठरले आहेत. त्यांनी आतापर्यंत मुंबई, ठाणे ग्रामीण, लातूर, अहमदनगर, पुणे ग्रामीण व कोल्हापूर अशा विविध विभागांत महत्त्वाची पदे सांभाळली आहेत.
📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.
 https://play.google.com/store/apps/details…

➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com 


अधिकारीसध्याचे पदनवी जबाबदारी
विश्वास नांगरे पाटीलविशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्रपोलीस आयुक्त, नाशिक शहर
सुहास वारकेपोलीस महानिरीक्षक, मुंबई एटीएसविशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र
रविंदर सिंघलपोलीस आयुक्त, नाशिक शहरविशेष पोलीस महानिरीक्षक, औरंगाबाद परिक्षेत्र
पी. पी. मुत्यालविशेष पोलीस महानिरीक्षक, औरंगाबादविशेष पोलीस महानिरीक्षक, नांदेड परिक्षेत्र
एफ.के. पाटीलविशेष पोलीस महानिरीक्षक, नांदेडपोलीस महानिरीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे
सुनील रामानंदपोलीस महानिरीक्षक, गुन्हे अन्वेषण पुणेपोलीस महानिरीक्षक, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ
Web Title : vishwas nangare-patil will be new police commissioner of nashik (Marathi News from Maharashtra Times , TIL Network)
Follow Maharashtra Times to get today's Latest Marathi News and current Marathi News Headlines from India and around the world. Find all breaking events from Maharashtra, India, business, technology and world.
महत्तवाचा लेख

वर्दीतील ‘दर्दीं’चे कलागुण बहरणार

 | Updated: 25 Feb 2019, 10:36 AM

पोलिस म्हटले की खाकी वर्दीतील तापट स्वभावाची, असंवेदनशील व्यक्ती अशी सर्वसाधारण प्रतिमा जनमानसांत असते; परंतु या वर्दीतही मनुष्य असतो, त्याला संवेदनशील मन असते व प्रत्येकात एक कलाकार दडलेला असतो.

maharashtra times

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई

पोलिस म्हटले की खाकी वर्दीतील तापट स्वभावाची, असंवेदनशील व्यक्ती अशी सर्वसाधारण प्रतिमा जनमानसांत असते; परंतु या वर्दीतही मनुष्य असतो, त्याला संवेदनशील मन असते व प्रत्येकात एक कलाकार दडलेला असतो. पोलिसांमध्ये दडलेल्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. मुंबई, महाराष्ट्र नव्हे तर देशात पहिल्यांदाच मुंबईत पोलिसांचे साहित्य संमेलन आज, सोमवारी होत आहे. यात राज्यभरातील शेकडो पोलिस अधिकारी आणि कर्मचारी सहभागी होत आहेत.

महाराष्ट्र पोलिसांत अनेक कवी, लेखक, विविध विषयांत पारंगत असलेल्यांचा समावेश आहे. कामाचे स्वरूप, कठोर शिस्त यांमुळे त्यांच्यातील या कलागुणांना वाव मिळत नाही. त्यामुळे नाट्य संमेलन, साहित्य संमेलन या धर्तीवर पोलिसांसाठी एक साहित्य संमेलन आयोजित करावे अशी कल्पना राज्य राखीव पोलिस दलाचे उपमहानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर यांना सुचली. त्यांनी ती पोलिस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांच्यासमोर मांडली. पडसलगीकर यांनादेखील ही कल्पना आवडली आणि राज्यातील अशा हौशी पोलिसांची यादी तयार करण्यात आली. त्यानुसार सोमवारी यशवंतराव प्रतिष्ठानच्या रंगस्वर सभागृहात खाकी वर्दीतील दर्दींची साहित्य मैफल रंगणार आहे. सुमारे १२५ पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यावेळी आपली कला सादर करतील. यामध्ये मुंबईतील ३५ पोलिसांचा समावेश


असे असेल नियोजन

कुलाबा येथील राज्य पोलिस मुख्यालयातून सकाळी नऊच्या सुमारास ग्रंथ दिंडी निघेल. यशवंतराव प्रतिष्ठान येथे दिंडी पोहोचल्यानंतर कवी संमेलन, पोवाडे, गझल, कव्वाली, परिसंवाद, प्रगट मुलाखती, साहित्य प्रकाशन, साहित्य प्रदर्शन या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन होणार असून साहित्यिक मधु मंगेश कर्णिक, अशोक नायगावकार, अशोक बागवे हे उपस्थित राहणार आहेत.
Web Title : 1st police literature conference in mumbai (Marathi News from Maharashtra Times , TIL Network)
Follow Maharashtra Times to get today's Latest Marathi News and current Marathi News Headlines from India and around the world. Find all breaking events from Maharashtra, India, business, technology and world.
Open in App
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget