युद्धबंदी केलेल्या सैनिकांचे पुढे काय होतं ?

Pandharpur LIVE 28 February 2019


आज भारतीय सीमा क्षेत्रात पाकिस्तानी लढाऊ विमानांनी घुसखोरी केली. याचे उत्तर देताना भारताने पाकिस्तानचे एक फायटर विमान पाडले. यावेळी पाकिस्तानच्या एका फायटर प्लेनवर पाकिस्तानने हल्ला केला. भारताचा एक पायलट आमच्या ताब्यात असल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. तसेच भारत सरकारनेही एक पायलट बेपत्ता असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. हे प्रकरण सुरू असताना जिनिव्हा कराराची चर्चा देशभरात होत आहे. यानुसार युद्धबंदी असलेल्या कैद्यास धमकावणे, मानवी मुल्ल्यांचे, अधिकारांचे उल्लंघन करणे हा गुन्हा आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर हा कायदा अधिक चर्चेत आला. मानव अधिकारांची जपणूक करणे हे यामगचे मुळ उद्दीष्ट होते. ते जपण्यासाठी काही कलमांचा समावेळ यामध्ये करण्यात आला आहे.


📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.

➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com 

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता रवीश कुमार यांनी काही वेळापुर्वी पत्रकारांना यासंदर्भात माहिती दिली. यामध्ये मिग विमानांनी पाकिस्तानचे एक विमान पाडल्याचा दावा भारताच्या परराष्ट्र मत्रांलयाने केला आहे. भारताने एक विमान गमावल्याची माहितीही यामध्ये देण्यात आली. दरम्यान भारताचा एक वैमानिक आपल्या ताब्यात असल्याचे पाकिस्तानतर्फे सांगण्यात येत आहे. पाकिस्तानला प्रत्युत्तरासाठी भारताचे 6 विमानांचे उड्डाण, 5 विमाने परतल्याचे सांगण्यात येत आहे. विंग कमांडर अभिनंदन आपल्या ताब्यात असल्याचा दावा पाकिस्तानतर्फे करण्यात येत आहे.  दरम्यान 'रेडिओ पाकिस्तान'ने एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय. या व्हिडिओतील व्यक्ती भारतीय वैमानिक अभिनंदन वर्थमान असल्याचं सांगण्यात येतंय. या व्यक्तीला त्याची ओळख विचारल्यानंतर आपला सर्व्हिस क्रमांक २७९८१ असल्याचं त्यानं सांगितलेलं या व्हिडिओत दिसतंय. आपण भारतीय वैमानिक असून आपला धर्म हिंदू असल्याचंही त्यानं म्हटले आहे.   
आंतरराष्ट्रीय जिनिव्हा करारानुसार युद्ध कैद्यांसाठी काही नियम बनवण्यात आले आहेत. यानुसार युद्ध कैद्यांना घाबरवले अथवा धमकावले जाऊ शकत नाही. त्यांचा अपमानही केला जाऊ शकत नाही.  युद्ध कैद्यांना घेऊन जनतेत उत्सुकता देखील तयार केली जाऊ शकत नाही. 

जिनिव्हा करारानुसार युद्धातील कैद्यांवर खटला दाखल केला जाऊ शकतो. अथवा युद्धानंतर त्यांना परत स्वदेशी पाठवले जाईल. पकडले गेल्यानंतर युद्ध कैद्याने आपले नाव, सैन्यातील पद आणि नंबर सांगण्याचे प्रावधान करण्यात आले आहे.

मानवाधिकाराचे घोषणापत्र 

मानवाधिकार जपणे हे अशाप्रकारचे कायदे करण्यामागचा हेतू आहे. सर्व मानवी व्यक्ती जन्मतः स्वतंत्र आहेत आणि त्यांना समान प्रतिष्ठा व समान आधिकार आहेत. त्यांना विचारशक्ती व सदसद्विवेकबुद्धी लाभलेली आहे व त्यांनी एकमेकांशी बंधुत्वाच्या भावनेने आचरण करावे असे यात म्हटले आहे. प्रत्येकास जगण्याचा, स्वातंत्र्य उपभोगण्याचा, सुरक्षित असण्याचा अधिकार आहे. कोणालाही गुलामगिरीत किंवा दास्यात ठेवता कामा नये; सर्व प्रकारच्या गुलामगिरीस व गुलामांच्या व्यापारास मनाई करण्यात आली पाहिजेकोणाचाही छळ करता कामा नये. किंवा त्यास क्रूर, अमानुष किंवा कमीपणा आणणारी वागणूक देता कामा नये. प्रत्येकाला सर्वत्र कायद्याच्या दृष्टीने माणूस म्हणून मान्यता मिळण्याचा अधिकार असल्याचेही या कायद्यामध्ये म्हटले आहे. 
दरम्यान जगातील काही देशांनी या नियमांचे उल्लंघन देखील केले आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर 1949 मध्ये केलेल्या करार आणि नियमांमध्ये जिनेव्हा कराराचा वापर प्रामुख्याने करण्यात आला. युद्धजन्य परिस्थितही मानवी मुल्य टिकवून ठेवण्यासाठी कायदा तयार करणे हे जिनिव्हा कराराचे मुख्य उद्दीष्ट आहे. 
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget