पंढरपूर युवा मुद्रक संस्थे तर्फे जागतिक मुद्रण दिनानिमित्त कॅलेंडरचे प्रकाशन व लकी ड्रॉ

Pandharpur LIVE 26 February 2019


दराची स्पर्धा करण्यापेक्षा क्वालिटी काम करुन व्यवसाय वाढवावा : वा. ना. उत्पात
 
 पंढरपूर युवा मुद्रक संस्थे तर्फे जागतिक मुद्रण दिनानिमित्त कॅलेंडरचे प्रकाशन व लकी ड्रॉ काढण्यात आला. या कार्यक्रमास महाराष्ट्र मुद्रण परिषदेचे माजी अध्यक्ष  श्री. सुरेश शहा यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार सुरक्षा समितीचे अध्यक्ष श्री. रामचंद्र सरवदे होते. तर अध्यक्षस्थानी भागवताचार्य वा. ना. उत्पात हे होते. हा कार्यक्रम पंढरपूर युवा मुद्रक संस्थेचे अध्यक्ष श्री. दत्ताजीराव पाटील यांच्या  संकल्पनेतून साजरा करण्यात आला.

        कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजनाने झाली. पाहुण्यांचे स्वागत श्री. रामकृष्ण बिडकर यांनी केले. तद्नंतर पुलवामा येथे शहीद झालेल्या  जवानांना श्रध्दांजली वाहण्यात आली. तद्नंतर कॅलेंडर प्रकाशन व लकी ड्रॉचे वितरण करण्यात आले. या लकी ड्रॉ मध्ये प्रथम क्रमांक श्री. अमोल चव्हाण, द्वितीर क्रमांक श्री. दिलीप रसाळ व तृतीय क्रमांक श्री. वैभव शेंडगे यांना मिळाला.  यावर्षीचे कॅलेंडर प्रिंटींग प्रिसीजन प्रिंटस् चे श्री. पेठेसाहेब व श्री. महेश दिडी यांनी करुन आम्हास बहुमोल सहकार्य  केले.📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.
 https://play.google.com/store/apps/details…

➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com महाराष्ट्र मुद्रण परिषदेचे माजी अध्यक्ष  श्री. सुरेश शहा यांनी आपल्या मनोगतात पंढरपूर युवा मुद्रक संस्थेचे कौतुक केले. दराबद्दल काँम्पिटीशन करण्यापेक्षा क्वालिटी कामात स्पर्धा करावी असा बहुमोल सल्लाही त्यांनी दिला. त्यांच्या भाषणातून त्यांचे पंढरपूर मुद्रकांबद्दल असलेले प्रेम दिसून आले.पत्रकार सुरक्षा समितीचे अध्यक्ष श्री. रामचंद्र सरवदे रांनी मुद्रण दिनाच्या  शुभेच्छा देवून यथोचित मनोगत व्यक्त  केले.
         कार्यक्रमाचे  अध्यक्ष भागवताचार्य वा. ना. उत्पात यांनी मुद्रण क्षेत्रात होत असलेल्या  बदलांचे स्वरुप सांगितले. बदलते आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करुन मुद्रकांनी यात आपली कसब दाखवून आपला व्यवसाय वाढवावा असे ते म्हणाले. दराची स्पर्धा करण्यापेक्षा क्वालीटी काम करुन व्यवसाय वाढवावा असे ते म्हणाले.
    कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री. सुरेश शहा यांचा सन्मान मुद्रक संघाचे अध्यक्ष श्री. दत्ताजीराव पाटील यांनी केला. श्री. रामचंद्र सरवदे यांचा सत्कार सचिव श्री. प्रदिप भोरकर यांनी केला तर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. वा. ना., उत्पात यांचा सत्कार उपाध्यक्ष श्री.संजय खासनीस यांनी केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन श्री. मंदार केसकर यांनी केले. शेवटी आभार प्रदर्शन श्री. रामकृष्ण बिडकर यांनी केले. तद्नंतर मुद्रक,कामगार यांनी  सहकुटुंब स्नेह भोजनाचा आस्वाद घेतला.
   कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुद्रक संस्थेचे सदस्य-  सर्वश्री सुरज कोठारी, संजय यादव, गोपाळ भट्टड, प्रदिप भोरकर आदिंनी परिश्रम घेतले.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget