ज्यांना मार्केटींगचे कार्य उत्तम जमते ते उद्योगात यशस्वी होतात -उपजिल्हाधिकारी महेश जमदाडे

Pandharpur LIVE 24 February 2019


ट्रेडएक्स्पो २०१९चा आज शेवटचा दिवस

पंढरपूर- ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्वेरीमध्ये उत्कृष्ठ पद्धतीने शिक्षण मिळत असून एम.बी.ए.च्या विद्यार्थ्यांना मार्केटींग करताना आपल्या उत्पादनाचे जेवढ्या उत्कृष्ठ पद्धतीने सादरीकरण करता येईल तेवढ्या पद्धतीने ग्राहकांना सादरीकरणाद्वारे  पटवून द्यावे लागते. हे कार्य ज्यांना उत्तम पद्धतीने जमते तोच विद्यार्थी एम.बी.ए. मध्ये यशस्वी होतो आणि भविष्यात आपल्या उत्पादनाचा ते उत्कृष्ठ पद्धतीने सादरीकरण करून मोठे उद्योजक बनतात.’ असे प्रतिपादन केंद्रीय लोकसेवा स्पर्धा परीक्षेत राज्यात प्रथम आलेले व नूतन उपजिल्हाधिकारी महेश जमदाडे यांनी केले.


📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.
 https://play.google.com/store/apps/details…

➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com 

स्वेरीच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अंतर्गत असलेल्या एम.बी.ए. मधील विद्यार्थ्यांना मार्केटींगचा अभ्यास करण्यासाठी टिळक स्मारक मैदानावरट्रेडएक्स्पो २०१९ हा ग्राहकांसाठी आयोजिलेल्या मेळाव्याच्या उदघाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपजिल्हाधिकारी महेश जमदाडे हे उपस्थितांना मार्गदर्शन करत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सन्मित्र मंडळाचे अध्यक्ष धनाजी देशमुख होते. या तीन दिवसांच्या मेळाव्याला दुसऱ्या दिवशीही प्रचंड गर्दी दिसून आली. आजचा शेवटचा दिवस असल्यामुळे आज देखील प्रचंड गर्दी लोटण्याची चिन्हे दिसत आहेत. प्रास्तविकात एम.बी.ए. चे विभागप्रमुख प्रा. करण पाटील म्हणाले की, ‘शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना स्थानिक बाजारपेठेपासून ते जागतिक बाजारपेठेपर्यंतचे सखोल ज्ञान तसेच, कार्पोरेट उद्योगांना लागणारे मनुष्यबळ, उद्योग सुरु करण्यासाठी व पुढे यशस्वीरीत्या चालू ठेवण्यासाठी लागणारा पैसा यांचे सखोल ज्ञान मिळविण्याच्या हेतूनेट्रेडएक्स्पो २०१९’ च्या माध्यमातून कृषी व ग्राहक मेळाव्याचे आयोजन केले आहे. यामध्ये विक्रेत्यांचा, ग्राहकांच्या फायद्याबरोबरच विद्यार्थ्यांना देखील शिक्षण मिळणार आहे.’ असे सांगितले. हा उपक्रम उत्कृष्ठ पद्धतीने आयोजिल्याबद्धल विद्यार्थी वैभव साळुंखे, संकेत हळणवर, श्रीओंकार सूर्यवंशी यांचा सत्कार केला. उदघाटक तिरुपती कन्स्ट्रक्शन प्रमोटर अँड डेव्हलपर्स चे शार्दुल नलबिलवार म्हणाले की, ‘स्वेरीचे विद्यार्थी म्हणजे ‘शिका, संघटीत व्हा आणि एकजुटीने कार्य करा.’ या उद्धेशाने सर्व विद्यार्थी परिश्रम घेतात. त्यामुळे स्वेरीतील विद्यार्थी निश्चित कौतुकास पात्र असून भविष्यात ते उद्योजक बनतील असे संकेत दिसत आहे. अध्यक्ष स्थानावरून बोलताना देशमुख म्हणाले की, ‘विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान असण्यापेक्षा बदलत्या शिक्षण प्रवाहात प्रात्यक्षिकावर भर देणे गरजेचे आहे. स्वेरीमध्ये चांगला विद्यार्थी घडतो हा इतिहास सर्वांना माहित आहे. त्यामुळे येथील उत्तम पद्धतीच्या शिक्षणातून व्यवहार ज्ञान देखील उत्तमप्रकारे मिळते. त्यातूनच विद्यार्थी हा स्वतःचे स्कील वापरून आपल्या उद्योगात प्रगती साध्य करू शकतो.’ ट्रेडएक्स्पो २०१९ या ग्राहक व कृषी मेळाव्यात विविध कंपन्यांनी आपले प्रोडक्ट विक्री व प्रदर्शनासाठी ठेवले असून यामध्ये आकर्षक व सवलतीच्या दरात शेतीविषयक अवजारे व उत्पादने, टू व्हीलरफोर व्हीलर,इलेक्ट्रॉनिक्स व इलेक्ट्रीकल वस्तू व साहित्य,रेडीमेड कपडेट्रॅक्टरठिबक सिंचनविमा योजनागृहोपयोगी वस्तू, पुस्तकेमोबाईल व त्याचे साहित्य तसेच इतर गरजेचे साहित्य प्रदर्शन व विक्री योजनेत असून मेळाव्याचा आज शेवटचा दिवस असून नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा.’ असे आवाहन केले आहे. यावेळी पंढरपूर शहरातील नागरिक, तिरुपती डिलाईटचे सागर कौलवार व अर्जुन बसटवार, सागर संत, पालक प्रतिनिधी माऊली हळणवर, ग्राहक, स्वेरीचे संस्थापक सचिव आणि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे, विश्वस्त सुरज रोंगे, डॉ. विश्वास मोरे, स्वेरी कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम.एम. पवार, प्राध्यापक वर्ग व एम.बी.ए. मधील विद्यार्थी आदी उपस्थित होते.सूत्रसंचालन प्रा.प्रवीण मोरे यांनी केले तर ओंकार सूर्यवंशी यांनी आभार  मानले.

Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget