.
.
.

स्वेरीत अल्ट्राटेक मार्फत सिव्हील इंजिनीअरकरीता दि.२१ फेब्रुवारी रोजी एकदिवशीय कार्यशाळा

Pandharpur LIVE 18 February 2019

 

अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, सिव्हील इंजिनिअर्स अॅण्ड आर्किटेक्टस् असोशिएशनपंढरपूर आणि स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगपंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने स्वेरीमध्ये येत्या गुरुवारी दि. २१ फेब्रुवारी २०१९ रोजी एकदिवशीय कार्यशाळेचे आयोजन केल्याची माहिती स्वेरीचे संस्थापक सचिव आणि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांनी दिली.

📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.https://play.google.com/store/apps/details…➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com 


नॉन डिस्ट्रक्टीव्ह टेस्टिंग (एन.डी.टी.) ऑफ आरसीसी स्ट्रक्चर्स’ या विषयावर स्वेरीत येत्या गुरुवारी दि. २१ फेब्रुवारी २०१९ रोजी दुपारी २ वाजता स्वेरीमध्ये आयोजिलेल्या कार्यशाळेत अल्ट्राटेकचे अभियंता हेमंत जैन व सिव्हील इंजिनिअरिंग विभागप्रमुख डॉ. प्रशांत पवार यांचे प्रमुख मार्गदर्शन राहणार असून यावेळी सिव्हील इंजिनिअर्स अॅण्ड आर्किटेक्टसचे अध्यक्ष अभियंता शरदचंद्र कुलकर्णी हे उपस्थित राहणार आहेत. या कार्यशाळेत ३० वर्षापूर्वीच्या इमारतींच्या बांधकामांचे स्ट्रक्चरल ऑडिटनॉन डिस्ट्रक्टीव्ह पद्धतीने करण्याबद्धलची माहिती दिली जाईल. सुरवातीला यासाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणाबद्धल माहिती देवून ते कोठे व कशी वापरावी याबद्धल माहिती दिली जाईल. त्यानंतर बांधकाम पद्धतीतील बेस्ट प्रॅक्टिस सांगितल्या जातील व नंतर ही उपकरणे वापरून स्ट्रक्चरल ऑडिट करावयाचे प्रात्यक्षिकेही दाखवली जातील. 


या कार्यशाळेमार्फत मुख्य विषयासोबतच पुढील प्रश्नांची माहिती मिळण्यास मदत होईल. बांधकामाची क्षमतास्लॅबमध्ये अंतर्गत भागात तडा गेला आहे का?, बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या सिमेंटचा दर्जा कसा असावात्यात स्टील आहे किंवा नाहीइमारतीमध्ये स्टील असल्यास त्याचा दर्जा कसा आहे इमारतीचे आयुष्मान किती आहे?अशा इमारतीसंबंधी अनेक प्रश्नांवर मार्गदर्शन होणार असून यावर करावयाचे उपाय यावर देखील चर्चासत्र होणार आहे. या कार्यशाळेत प्रा. अविनाश कोकरे हे डिझीटल रीबाऊंड हॅमरअल्ट्रासोनिक पल्स व्हेलॉसिटीप्रोफोमिटरकव्हर मीटर (रीबार लोकेटर)काँक्रीट कोअर कटर आदी माशिनींचा वापर करून इमारतीची सुरक्षितता कशी वाढवायचीयाबाबत तांत्रिक प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन करणार आहेत. ही कार्यशाळा सुरळीत पार पडण्यासाठी सिव्हील इंजिनिअरिंग विभागातील प्राध्यापकवर्ग परिश्रम घेत आहेत. याकार्यशाळेत बांधकाम क्षेत्राशी निगडीत बिल्डर्स,  ठेकेदारअभियंता आदी उपस्थित राहणार आहेत.अधिक माहितीसाठी या कार्यशाळेचे समन्वय प्रा.अविनाश कोकरे (मोबा. नं. ९७६६१२९१६९)  यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.  
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget