काँग्रेसची लोकसभेची दुसरी यादी आज जाहीर होणार.... हे असतील महाराष्ट्रातील 12 उमेदवार

Pandharpur LIVE 11 March 2019


काँग्रेस पक्षाची लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी आज दुपारी नवी दिल्लीतून जाहीर होणार आहे. यात महाराष्ट्रातील १२ उमेदवार जाहीर होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात काँग्रेस २५ जागा लढविणार आहे. तर राष्ट्रवादी २३ जागा लढविणार आहे. मित्रपक्षांना सोडण्यात येणा-या जागांचे भिजत घोंगडे पडल्याने एकमत झालेल्या १२ जागांवर काँग्रेस आपले उमेदवार जाहीर करणार आहे.
यात सोलापूरमधून सुशीलकुमार शिंदे, नांदेडमधून अमिता चव्हाण, हिंगोलीमधून खासदार राजीव सातव आदी प्रमुख नेत्यांचा समावेश आहे.

काँग्रेसने पहिली यादी मागील आठवड्यात जाहीर केली होती. यात १५ जागांचा समावेश होता. उत्तर प्रदेशमधील ११ तर गुजरातमधील ४ जागांचा यात समावेश होता.


📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.

➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com 
काँग्रेसचे आज जाहीर होणारे १२ संभाव्य उमेदवार
१) मुंबई दक्षिण- मिलिंद देवरा
२) मुंबई उत्तर मध्य – प्रिया दत्त
३) मुंबई दक्षिण मध्य- एकनाथ गायकवाड
४) नंदुरबार- के सी पाडवी
५) धुळे- रोहिदास पाटील
६) वर्धा- चारूलता टोकस
७) यवतमाळ- माणिकराव ठाकरे
८) गडचिरोली- डॉ. नामदेव उसेंडी
९) हिंगोली- राजीव सातव
१०) नांदेड- अमिता चव्हाण
११) रामटेक- मुकुल वासनिक
१२)  सोलापूर- सुशीलकुमार शिंदे


Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget