.
.
.

सलग 24व्या वर्षी साजरी झाली ग्रामस्वच्छतेद्वारा गोळा केलेल्या केरकचर्याची होळी

Pandharpur LIVE 20 March 2019


प्रशांत वाघमारे या प्राथमिक शिक्षकाच्या संकल्पनेतून सलग 24व्या वर्षी ग्रामस्वच्छता करुन गोळा करुन कोणताही लाकूडफाटा व गोवर्या न जाळता केरकचर्याची होळी अक्षरांगण ,जि.प. शाळा घालमेपवारवस्ती (ता.पंढरपूर ) येथे मोठ्या उत्साहाने संपन्न झाली. यावेळी विद्यार्थ्यांनी परिसरातील केरकचरा गोळा केला. प्लँस्टीक कागद खड्यात गाडून टाकले .या आधुनिक होळीची संकल्पना मुख्याध्यापक प्रशांत वाघमारे यांनी समजाविली.यावेळी स्वरांजली घालमेहीने होळीमध्ये कोणताही लाकूडफाटा व गोवर्या न जाळण्याची शपथ दिली. समृद्धी पवार व शुभांगी पवार ह्यांनी होळीमध्ये पोळी न टाकता ती दान देण्याचे अवाहन करुन वाईट विचार चालीरितींचा नायनाट करण्याचे आवाहन केले. आरती पवार व श्रावणी साळुंखे हिने वृक्षारोपन व संवर्धनाचे महत्व पटवून दिले. समर्थ घालमे व सायली मस्के यानी व्यसनांची व दुर्गुणांची होळी करण्याचे अवाहन केले. आकाश पाटिल व प्रांजली घालमेयांनी वातावरणातील बदलाची माहिती देऊन उन्हाळ्यात घ्यावयाची काळजी विषद केली. शंकर कुंभार व ओंकार साळुंखेयांनी पाण्याच्या बचतीचे महत्व सांगितले . होळीचे पुजन वैष्णवी घालमे व मुख्याध्यापक प्रशांत वाघमारे यांनी केले.या अनोख्या आधुनिक होळीसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी आधिकारी डाँ.राजेंद्र भारुड, सभापती राजेंद्र पाटिल , शिक्षणाधिकारी संजय राठोड, गटशिक्षणाधिकारी सुलभा वटारे, विस्तार अधिकारी डाँ.बिभिषण रणदिवे, डाँ.पोपट लवटे यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी घरीही अशीच होळी करणार आसल्याचे सांगितले . या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून सर्वच अशीच आधुनिक केरकचर्याची होळी करणार असल्याचे पालकांनी सांगितले .
📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.

➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget