.
.
.

जगदद्गुरु तुकाराम महाराजांचा 371 वा वैकुंठगमन सोहळा उत्साहात साजरा

Pandharpur LIVE 23 March 2019

जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा ३७१वा वैकुंठगमन सोहळा श्री क्षेत्र देहू येथे शुक्रवारी उत्साहात साजरा झाला. उन्हाची तमा न बाळगता असंख्य वैष्णवांनी 'तुकोबा-तुकोबा' गजर करीत नांदुरकीच्या झाडावर पुष्पवृष्टी करून बीजसोहळा 'याची देही, याची डोळा' अनुभवला.


जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा ३७१वा वैकुंठगमन सोहळा श्री क्षेत्र देहू येथे शुक्रवारी उत्साहात साजरा झाला. उन्हाची तमा न बाळगता असंख्य वैष्णवांनी 'तुकोबा-तुकोबा' गजर करीत नांदुरकीच्या झाडावर पुष्पवृष्टी करून बीजसोहळा 'याची देही, याची डोळा' अनुभवला.


गोपाळपुऱ्याच्या रस्त्यावर दुतर्फा गर्दी लोटली होती. सोहळा अनुभवण्यासाठी वैष्णवांचा मेळा आतुर झाला होता. तळपत्या उन्हाची पर्वा न करता भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. मुख्य मंदिरात आज, शुक्रवारी पहाटे तीनपासून सोहळ्यास प्रारंभ झाला. देवस्थानचे अध्यक्ष पंढरीनाथ मोरे आणि विश्वस्त जालिंदर मोरे यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. त्यानंतर शिळा आणि वैकुंठगमन मंदिरांमध्ये पारंपरिक महापूजा करण्यात आल्या. यानंतर भाविकांसाठी दर्शनबारी खुली करण्यात आली. सकाळी साडेदहाच्या सुमारास सनई-चौघडा आणि ताशांच्या गजरात मंदिरातून पालखी गोपाळपुऱ्याकडे रवाना झाली. या ठिकाणी प्रदक्षिणा घातल्यानंतर पालखी नांदुरकीच्या झाडाखाली ठेवण्यात आली. तुकोबारायांचे वंशज बापूमहाराज मोरे-देहूकर यांचे वैकुंठगमन प्रसंगावर आधारीत किर्तन झाले. त्यानंतर हरिनामाचा गजर करीत भाविकांनी पुष्पवृष्टी केली. दुपारनंतर पालखी पुन्हा मंदिरात प्रवेशली. या ठिकाणी प्रथेप्रमाणे देवस्थानतर्फे दिंडीकरी, फडकरी, मानकरी यांना फेटे व नारळप्रसाद देण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते आरती करण्यात आली. देऊळवाड्यात पालखी आल्यानंतर शिरवळकर फडाचे किर्तन झाले. राम मंदिरापुढे देहूकर महाराज, शिळा मंदिरासमोर टेंभूकर महाराज यांची किर्तनसेवा झाली. रात्री आळंदीकर चोपदारांचा हरिपाठ झाला. आरतीनंतर हैबतबाबा यांचा पहारा झाला. अशाच प्रकारे कार्यक्रम बीज सोहळ्यापासून पुढे सप्तमीपर्यंत चालू राहणार आहेत. लळीताने कार्यक्रमाची सांगता होणार आहे.  

📲 पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन. https://play.google.com/store/apps/details…
➡️ पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165 कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूर Mail- livepandharpur@gmail.com Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget