स्वेरीमध्ये ‘मन की बात’ला अभूतपूर्व प्रतिसाद पंतप्रधान मोदींच्या कार्यावर टाकला प्रकाश

Pandharpur LIVE 1 March 2019 पंढरपूर- आज येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालय (पदवी, पदविका व पदव्युत्तर पदवी) फार्मसी (पदवी, पदविका व पदव्युत्तर पदवी) व एम.बी.ए. विभागातील विद्यार्थ्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्ता हाती घेतल्यापासून साधारण पावणेपाच वर्षातील भारताच्या विकासासाठी केलेल्या महत्वपूर्ण कार्याची माहिती चित्रफितीद्वारे देण्यात आली. या ‘मन की बात’ला  विद्यार्थ्यांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला.


📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.

➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com भाजपचे पंढरपूर शहराध्यक्ष संजय वाईकर यांनी प्रास्तविकात स्वेरीतील विद्यार्थ्यांना ‘भारत के मन की बात मोदी के साथ’ या उपक्रमाची माहिती देवून पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली नोटाबंदी पासून ते पाकिस्तानमधील बालाकोटवरील कालच्या हल्यापर्यंतची केलेली कामगिरी आणि शेतकऱ्यांपासून ते विद्यार्थ्यांपर्यंत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना यावर प्रकाश टाकून ‘भविष्यातील भारत कसा असावा ? या हेतूने जनतेकडून अपेक्षा आणि सूचना घेण्यासाठी भाजपाचे पदाधिकारी स्वेरीत दाखल झाले होते. मोठ्या वाहनावर एल.ई. डी. स्क्रीनच्या सहाय्याने पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली केलेल्या कार्याची झलक प्रसारित केली. 

अध्यक्षस्थानावरून बोलताना ‘मिशन मोदी अगेन पीएम’या महत्वपूर्ण कृतीगटाच्या महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष डॉ. बी. पी. रोंगे म्हणाले की, ‘ प्रत्येक जण मोदी बनले पाहिजे. म्हणजे सतत आपण आखलेल्या कार्यात पंतप्रधान मोदींच्या कार्यप्रणालीप्रमाणे सतत कार्यरत राहिले पाहिजे. आपण २४ तासांपैकी किती तासांचा परिणामकारक वापर करून घेतो हे पहिले पाहिजे. एकूणच त्रयस्त भावनेने पाहिल्यास भविष्यात फायदा होतो. असे सांगितले यावेळी विद्यार्थ्यांनी पंतप्रधान मोदींकडून विद्यार्थ्यासाठी आवश्यक असलेल्या अपेक्षा आणि सूचना लिहून सूचना पेटीत टाकल्या. या सर्व सूचनांवर भाजपाच्या दिल्ली मधील मुख्य कार्यालयाच्या वतीने पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे शहराध्यक्ष वाईकर यांनी सांगितले. यावेळी पंढरपूर शहर भाजपा सरचिटणीस कैलास कारंडे, महिला चिटणीस सौ. वर्षा चंकेश्वरा, पंढरपूर शहर महिला अध्यक्ष सौ. अपर्णा तारके, सदस्य सौ. ज्योती जोशी, कार्यालय प्रमुख अनिल नगरकर, गौरव देशपांडे, तावशीचे माजी सरपंच पाटील, स्वेरी कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम. एम. पवार, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व स्वेरी अंतर्गत असलेल्या चारही महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते. प्रा. यशपाल खेडकर यांनी सूत्रसंचालन केले तर सांस्कृतिक कार्यक्रमाचे प्रमुख प्रा. करण पाटील यांनी आभार मानले.

Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget