वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर सोलापूरातून लढणार

Pandharpur LIVE 11 March 2019


वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आपण सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याची घोषणा अकोल्यात केली. वंचित आघाडीचे नेते लक्ष्मण माने यांनी सोलापूर मतदारसंघातून माझ्या नावाची घोषणा केल्याने मला लढावेच लागेल. आज लढण्याचा निर्णय कायम आहे, मात्र उद्या काय होईल हे मी काय सांगू शकत नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. प्रकाश आंबेडकर यांनी रविवारी अकोल्यात पत्रकार परिषद घेतली त्यावेळी ते बोलत होते.
प्रकाश आंबेडकर हे आपल्या अकोला या गृह लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहेत. सोबतच आता सोलापूरमधून लढण्याचा निर्णय घेतल्याने ते दोन लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार हे निश्चित मानले जात आहे. दरम्यान,  आंबेडकरांच्या निर्णयामुळे सोलापूरात तिरंगी लढत होणार असून, शिंदे यांच्या अडचणीत भर पडणार आहे. तसेच वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस यांच्यात आघाडी होणार नसल्याचेही यामुळे स्पष्ट झाले आहे.
२०१४ साली भाजपचे शरद बनसोडे यांनी सुशीलकुमार शिंदे यांना मोठ्या मताधिक्याने धक्कादायकरित्या पराभव केला होता. मात्र, हे सर्व विसरून सुशीलकुमार शिंदे पुन्हा नव्या जोमाने कामाला लागले आहेत. दरम्यान, भाजपकडून उमेदवार कोण याचा संभ्रम कायम आहे. विद्यमान खासदार शरद बनसोडे यांचे तिकीट कापण्याची शक्यता वर्तविली जात आहे. राज्यसभेचे खासदार अमर साबळे यांच्यासह गौडगाव मठाचे डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांचे नाव भाजपकडून सध्या चर्चेत आहे. या दोघांपैकी एक, प्रकाश आंबेडकर आणि सुशीलकुमार शिंदे अशी तिरंगी लढत होऊ शकते. असे झाल्यास भाजपचे पारडे जड मानले जाऊ शकते.

📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.

➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com 



Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget