माढ्याचा तिढा सुटण्यासाठी प्रभाकर देशमुखांना ऐनवेळी संधी मिळणार?

Pandharpur LIVE 11 March 2019राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी अचानक माढ्यातून माघार घेतल्याने माढ्याचा तिढा कांही अद्याप सुटला नसल्याचे निदर्शनास येत आहे. हा तिढा सुटण्यासाठी ऐनवेळी प्रभाकर देशमुख यांना संधी देण्याबाबत ची खलबतं वरिष्ठ पातळीवरुन सुरु असल्याची चर्चा राष्ट्रवादीच्या गोटात सुरु आहे.राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघाच्या रिंगणातून माघार घेतली आहे. या जागेसाठी विजयसिंह मोहिते पाटील आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या नावावर चर्चा झाली असली तरी आयत्यावेळी माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता राष्ट्रवादीच्या गोटातून व्यक्त केली जात आहे.
माढ्यातील उमेदवारीबाबत विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते-पाटील व माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरु होती. प्रभाकर देशमुख यांनीही उमेदवारी गृहीत धरून जोरदार तयारी केली होती. अल्पावधीतच त्यांनी मतदारसंघ पिंजून काढला होता. त्यांना प्रतिसादही चांगला मिळाला होता. विजयसिंह मोहिते पाटील यांच्याबद्दल असलेल्या नाराजीचा आपल्याला फायदा होईल, असा अंदाज देशमुख यांनी बांधला होता.
📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.

➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com मात्र, विजयसिंह मोहिते-पाटील हे स्वतःच्या उमेदवारीसाठी हटून बसले होते. शेवटी देशमुख- विजयसिंह मोहिते पाटील यांच्या वादात नाईलाजास्तव स्वतः शरद पवार माढ्यातून लढण्यास तयार झाले. पण पुलाखालून बरेच पाणी गेले. मावळमधून पार्थ पवार यांना उमेदवारी देण्याचे निश्चित झाले. एकाच घरातील जास्त उमेदवार नको, असे पवार कुटुंबियांच्या बैठकीत निश्चित करण्यात आले. शरद पवार यांनी माघार घेतल्यानंतर आता कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
राष्ट्रवादीत अनेक गट आहेत. माढा लोकसभा मतदारसंघातही पक्षात चांगलीच गटबाजी आहे. अशा परिस्थितीत मोहिते-पाटलांना उमेदवारी देण्याचा धोका शरद पवार घेणार का? हा प्रश्न आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्वाकांक्षी जलयुक्त शिवारसारखी योजना आणून प्रभाकर देशमुख यांनी प्रशासनात आपला ठसा उमटवला होता. अशी योजना आणणाऱ्या अधिका-याला राष्ट्रवादीत घेऊन पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर सर्जिकल स्ट्राईक केल्याचे मानले जात होते. ही पार्श्वभूमी पाहता माढ्याच्या उमेदवारीची माळ प्रभाकर देशमुख यांच्या गळ्यात पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Labels:

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget